Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-७४)
महापुराण
(५५९
व्ययो मे विक्रमस्यास्तां शरस्याप्यत्र न व्ययः । वषे प्रत्युत धर्मः स्यादुष्टस्यांहः कुतो भवेत् ॥६७ कोतिविख्यातकीर्तेर्मे नार्ककीर्तेविनंक्ष्यति । अकोतिरनिवार्या स्यादग्यायस्यानिषेधनात् ॥ ६८ तस्य मे यशसः कोर्तेर्भवद्भिर्ययुदाहृतम् । भवेत्तत्सत्यसंवादि शीतकोऽस्म्यत्र यद्यहम् ॥ ६९ यूयमाध्वं ततस्तूष्णीमुष्णकोऽहमिदं प्रति । धर्नामर्थ्य यशस्यं च मा निषेधि हितैषिभिः ॥७० एवं मन्त्रिणमुल्लडघ्य कुधीर्वादुम्रहाहितः । सेनापति समाहूय प्रत्यासन्नपराभवः ॥ ७१ कथयित्वा महीशानां सर्वेषां रणनिश्चयम् । भेरीमास्फालयामास जगत्त्रयभयप्रदाम् ॥ ७२ अनुभेरिरवं सद्यः प्रत्यावासं महीभुजाम् । नटद्भटभुजास्फोटचटुलारावनिष्ठुरः ॥ ७३ करिकण्ठस्फुटोद्घोषघण्टाटङ्कारभैरवः । जितकण्ठीरवारावहयहेषाबिभीषणः ॥ ७४
-----------
.........
__ या कार्यात पराक्रमाचा ध्यय - नाश तर व्हावयाचा नाही पण बाणांचाही होणार नाही आणि दुष्टांचा नाश करण्यात पाप कोठून होईल ? उलट धर्मच होईल ॥ ६७ ॥
ज्याची कीर्ति प्रसिद्ध आहे असा जो मी अर्ककीति आहे त्या माझ्या कीर्तीचा नाश बिलकुल व्हावयाचा नाही. उलट मी अन्यायाचा निषेध केला नाही तर अकीति होईल व तिचे निवारण मात्र करता यावयाचे नाही ॥ ६८ ॥
तुम्ही माझ्या कीर्तीचा नाश होईल व जयकुमाराची कीर्ति वाढेल याविषयी जे वर्णन केले त्याविषयी माझे म्हणणे असे आहे- जर मी या कार्याविषयी शीतल-थंड बसून राहीन तर तुमचे म्हणणे खरे होईल ।। ६९ ।।
यास्तव तुम्ही स्वस्थ बसा. या कार्याबद्दल मी अतिशय सन्तप्त झालो आहे. कल्याण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकानी धर्माला अविरुद्धकार्य सिद्ध करून देणारे व यश वाढविणारे जे कार्य असते त्यात कधीही अडथळा आणू नये ॥ ७० ॥
याप्रमाणे तो कुबुद्धीचा अर्ककीति दुष्टपिशाचाने झपाटल्यासारखा झाला. त्याने मंत्र्याच्या वचनाला मानले नाही. ज्याची पराजय होण्याची वेळ जवळ आली आहे अशा त्याने मंत्र्याला जवळ बोलावले व सर्व राजाना युद्ध करण्याचा निश्चय कळविला आणि त्रैलोक्याला भीति उत्पन्न करणारा नगारा त्याने वाजविला ॥ ७१-७२ ॥
नगान्यांच्या शब्दाला अनुसरून राजाच्या प्रत्येक निवासाच्या स्थानी आनंदाने नाचणाऱ्या शूर पुरुषानी आपल्या बाहूंचे एकमेकावर ताडन केले अर्थात् त्यांनी आपले दंड थोपटले त्यामुळे जो तीव्र आवाज उत्पन्न झाला व नगाऱ्याच्या शब्दात त्यामुळे निष्ठुरता उत्पन्न झाली ॥ ७३ ।।
हत्तीच्या कंठातून उत्पन्न होणारी गर्जना व घंटाचा टंकार यामुळे तो आवाज भीति उत्पन्न करणारा वाटला. याचप्रमाणे सिंहाच्या गर्जनेला जिंकणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळण्यानी नगाऱ्याच्या शब्दात भयानकपणा अधिकच उत्पन्न झाला ॥ ७४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org