Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-९३)
महापुराण
(५६१
आरूढानेकपानेकभूपालपरिवारितः । भेरोनिष्ठुरनिर्घोषभीषिताशेषदिगद्विपः ॥ ८३ चक्रध्वजं समुत्थाप्य सम्यगाविष्कृतोन्नतिः । गजं विजयघोषाख्यमारुह्याद्रिवरोत्तमम् ॥ ८४ अर्ककोतिर्वहिर्भास्ववस्युद्यतभटावृतः । ज्योतिः कुलाचलैर्किश्चचालाभ्यचलाधिपम् ॥ ८५ किंवदन्ती विदित्वैतां भूयोभूत्वाकुलाकुलः । स्वालोचितं च कर्तव्यं विधिना क्रियतेऽन्यथा ॥८६ इति स्वसचिवैः सार्धमालोच्य च जयादिभिः। प्रत्यर्ककीय॑थादिक्षतं सम्प्राप्य सत्वरम् ॥ ८७ कुमार तव कि युक्तमेवं सीमातिलजनम् । प्रसीद प्रलयो दूरं तन्माकार्षोर्मषागमम् ।। ८८ इति सामादिभिः स्वोक्तैरशान्तमवगम्य तम् । प्रत्येत्य तत्तथा सर्वमाश्ववाजीगमन्नुपम् ॥ ८९ काशीराजस्तदाकर्ण्य विषादलिताशयः। महामोहाहितो वासीददुष्कार्ये को न मुह्यति ॥ ९० अत्र चिन्त्यं न वः किञ्चिन्यायस्तेनैव लडषितः । तिष्ठते हैव संरक्ष्य सुनियुक्ताः सुलोचनाम् ॥९१ इदानीमेव दुर्वृत्तं शृङ्खलालिङ्गनोत्सुकम् । शाखामृगमिवानेष्ये बद्ध्वा दारातिताथिनम् ॥ ९२ इत्यदीर्य जयो मेधकुमारविजयाजिताम् । मेघघोषाभिधां भेरी प्रष्ठेनास्फालयद्रुषा ॥ ९३
हत्तीवर बसलेले अनेक राजे अर्ककीर्तीच्या सभोवती होते. नगाऱ्यांच्या कठोर आवाजानी सर्व दिग्गजांना अर्ककीर्तीने घाबरे केले होते. मेरुपर्वताप्रमाणे श्रेष्ठ उत्तम अशा हत्तीवर चढून तो बसला होता. त्याने चक्रध्वज उंच उभा केला होता व त्यामुळे त्याने आपली उन्नति प्रकट केलेली होती. चमकणाऱ्या तरवारी ज्यांच्या हातात आहेत अशा वीरानी तो अर्ककीर्ति घेरलेला होता. जसा तेजस्वी सूर्य कुलाचलानी घेरलेल्या मेरुपर्वताकडे जातो तसा हा अर्ककीर्तिकुमार पृथ्वीपति अकम्पनराजाकडे निघाला ।। ८३-८५ ।।
ही वार्ता ऐकून अकम्पनराजा पुनः अतिशय आकुल झाला " उत्तम विचाराने ठरविलेले कार्य दैव वेगळेच करून टाकते" असा आपल्या प्रधानमंडळीबरोबर व जयकुमार आदिकाबरोबर विचार करून अर्ककीर्तीकडे अकंपनराजाने सत्वर दूत पाठविला ।। ८६-८७ ॥
__तो दूत अर्ककीर्तीजवळ येऊन असे म्हणाला- "हे कुमारा, याप्रमाणे सीमेचे उल्लंघन करणे हे तुला योग्य वाटते कां ? हे कुमारा, प्रसन्न हो अद्यापि प्रलय फार दूर आहे म्हणून तू त्या आगमाला खोटे ठरवू नकोस ? याप्रमाणे सामादिकांच्या भाषणानी त्याला शान्त करण्याचा प्रयत्न केला पण तो अशान्तच झाला हे पाहून तो दूत परत आला व त्याने ही सर्व हकीकत शीघ्र अकम्पन राजाला कळविली ॥ ८८-८९॥
काशीच्या अकम्पन राजाने ती ऐकली. त्याच्या मनात विषाद-खेद उत्पन्न झाला. त्याचे मन अस्थिर झाले. जणु तो महामोहाने - मूर्छने युक्त झाला की काय असा दिसला. बरोबरच आहे की, वाईट कार्य पाहून कोणाला बरे दुःख वाटत नाही, खिन्नता वाटत नाही ? ।। ९० ।।
. त्यावेळी जयकुमाराने याप्रमाणे भाषण केले- अहो काशीराज, आपण याविषयी काही चिन्ता करू नका. न्यायाचे उल्लंघन त्या अर्ककीर्तीकडूनच झाले आहे. आपण येथेच राहून सुलोचनेचे संरक्षण करा. मी आताच साखळीला आलिंगन करण्यात उत्सुक झालेल्या माकडाप्रमाणे त्या दुराचारी व परस्त्रीची अविचाराने अभिलाषा करणाऱ्या अर्ककीर्तीला बांधून आणतो असे जयकुमार बोलला व त्याने मेघकुमारदेवाना जिंकून त्याच्यापासून मिळविलेला मेघघोष नांवाचा नगारा आघाडीच्या मुख्य अधिकाऱ्याकडून वाजविला ॥ ९१-९३ ।।
म. ७१
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org