Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-५८)
महापुराण
(५५७
पुरुषार्थत्रयं पुम्भिर्दुष्प्रापं तत्त्वयाजितम् । न्यायमार्ग समुल्लजच्य वृथा तत्कि विनाशयः॥५० अकम्पनस्य सेनेशो जयः प्रागिव चक्रिणः । वीरलक्षम्यास्तुलारोहं मुधा स्वं किं विषास्यसि ।। ५१ नन न्यायेन बन्धोस्ते बन्धुपुत्री समागता । उत्सवे का पराभूतिरक्षमात्र पराभवः ॥ ५२ कन्यारत्नानि सन्त्येव बहून्यन्यानि भूभुजाम् । इह तानि सरत्नानि सर्वाण्यद्यानयामि ते ॥ ५३ इति नीतिलतावृद्धिविधाय्यपि वचःपयः । व्यधात्तच्चेतसः क्षोभं तप्ततैलस्य वा भृशम् ॥ ५४ सर्वमेतत्समाकर्ण्य बुद्धि कर्मानुसारिणीम् । स्पष्टयन्निव दुर्बुद्धिरिति प्रत्याह भारतीम् ॥ ५५ अस्ति स्वयंवरः पन्थाः परिणीतौ चिरन्तनः। पितामहकृतो मान्यो वयोज्येष्ठस्त्वकम्पनः ॥ ५६ किन्तु सोऽयं जयस्नेहात्तस्योत्कर्ष चिकीर्षुकः । स्वसुतायाश्च सौभाग्यप्रतीति प्रविधित्सुकः ॥५७ सर्वभूपालसन्दोहसमाविर्भावितोदयात् । स्वयं चक्रीयितुं चैव व्यधत्त कपटं शठः ॥ ५८
पुरुषानी मिळविण्यास कठिण असे धर्म, अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ तू मिळविले आहेस व नीतिमार्गाचे उल्लंघन करून तू त्यांचा व्यर्थ का बरे नाश करीत आहेस? ॥ ५० ॥
हा जयकुमार पूर्वी भरतचक्रीचा सेनापति होता. आता तो अकम्पनराजाचा सेनापति झाला आहे. हे युवराज तू व्यर्थच वीरलक्ष्मीला तुलेवर आरोहण करावयास लावीत आहेस, अर्थात् या युद्धात तुला जय मिळणे शक्य नाही ॥५१॥
तुझे हित करणाऱ्या बंधूची म्हणजे अकम्पनराजाची कन्या तुझे ज्याने हित केले त्या जयकुमाराला या उत्सवात न्यायाने प्राप्त झाली आहे. यामुळे तुझा पराभव किंवा अपमान झाला कोठे? आता तूं जयकुमाराविषयी मत्सर करीत आहेस हा मात्र तुझा पराभव आहे ।। ५२ ।।
इतर राजांच्याही पुष्कळ कन्यारत्ने आहेत येथे त्यांना रत्नांच्या नजराण्यासह आणतो त्यांचा तू स्वीकार कर ॥ ५३ ॥
याप्रमाणे नीतिलतेला वाढविणारे असेही त्याचे वचनरूपी जल तापलेले तेल ज्याने क्षोभ उत्पन्न करते तसे अर्ककीर्तीच्या मनाला त्याने अधिक क्षुब्ध केले ॥ ५४ ॥
हे सर्व मंत्र्याचे भाषण ऐकून बुद्धि ही पूर्वकर्माला अनुसरून उत्पन्न होते हे जणु स्पष्ट करणारा तो दुर्बुद्धि अर्ककीर्ति याप्रमाणे बोलू लागला ॥ ५५ ।।
विवाहाकरिता माझ्या आजोबानी श्रीवृषभजिनेश्वरानी सांगितलेला स्वयंवर नांवाचा भेद प्राचीनकालापासून चालत आला आहे व हा अकम्पनराजाही वयाने वडील आहे हेहि मला मान्य आहे ॥ ५६ ॥
परन्तु हा अकम्पनराजा- जयकुमारावरील स्नेहामुळे त्याचा उत्कर्ष करण्याची इच्छा करीत आहे व आपल्या कन्येच्या सौभाग्याची प्रसिद्धि करावी अशी इच्छा करीत आहे व सर्व राजांचा समूह आपण एकत्र केला म्हणजे आपला उत्कर्ष वाढेल व आपण चक्रवर्ती होऊ असा या धर्त अकम्पनाने विचार केला व अशा रीतीने त्याने कपट केले आहे ।। ५७-५८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org