Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५५६)
महापुराण
(४४-४२
एतस्य दिग्जये सर्वदृष्टमेवेह पौरुषम् । अनेन यः कृतः प्रेषः स्मर्तव्यो ननु स त्वया ॥ ४२ ज्ञात्वा सम्भाव्यशौर्योऽपि स मान्यो भर्तृभिर्भटः। दृष्टसारः स्वसाध्यर्थे साषितार्थः किमुच्यते॥४३ विना चक्राद्विना रत्न ग्येयं श्रीस्त्वया तदा । जयात्ते मानुषी सिद्धिर्दैवी पुण्योदयाद्यथा ॥ ४४ तृणकल्पोऽपि संवाह्यस्तव नीतिरिर्य कथम् । नाथेन्दुवंशावुच्छेद्यौ लक्ष्म्याः साक्षाद्भुजायितौ ॥४५ बन्धभृत्यक्षयाभूयस्तुभ्यं चयपि कुप्यति । अधर्मश्चायुगस्थायी त्वया स्यात्सम्प्रवर्तितः ॥ ४६ परदाराभिमर्शस्य प्राथम्यं मा वृथा कृथाः । अवश्यमाहृताप्येषा न कन्या ते भविष्यसि ॥ ४७ सप्रतापं यशःस्थास्नु जयस्य स्यादहर्यथा । तव रात्रिरिवाकीतिः स्थायिन्यत्र मलीमसा ॥ ४८ सर्वमेतन्ममैवेति मा मंस्थाः साधनं युधः । बहवोऽप्यत्र भूपालाः सन्ति तत्पक्षपातिनः ॥ ४९
दिग्जयाच्या वेळी या जयकुमाराचे सर्वांनी पौरुष-पराक्रम पाहिलेच आहेत. त्यावेळी या जयकुमाराने जी सैन्यरचना केली व जो पराक्रम केला त्याची आठवण हे युवराजा तू ठेवणे योग्य आहे ॥ ४२ ॥
__ ज्या भटाबद्दल हा शूर होईल असे राजाला वाटते त्याला देखिल राजाने मान दिला पाहिजे. मग ज्याचा पराक्रम सामर्थ्य पाहिले गेले आहे, स्वसाध्य पदार्थात ज्याचा पराक्रम पाहिला गेला आहे, ज्याने कठिण कार्य सिद्ध करून दिले आहे त्याच्याबद्दल तर काही बोलणे नकोच, त्याचा आदर केलाच पाहिजे ॥ ४३ ॥
ही लक्ष्मी त्यावेळी तुला चक्ररत्न, निधि आणि रत्नाशिवाय उपभोग घेण्याला योग्य होईल. ज्याप्रमाणे देवापासून होणारी तुझी इष्टसिद्धि तुझ्या पुण्योदयामुळे आहे त्याप्रमाणे मनुष्यापासून होणारी तुझी इष्टसिद्धि या जयकुमारापासून होणारी आहे ।। ४४ ।।
गवतासारखा तुच्छ जीव देखील रक्षिला पाहिजे अशी नीति आहे. असे असता जे लक्ष्मीचे साक्षात् बाहुसारखे आहेत असे जे नाथवंश व चन्द्रवंश याना तू च्छेदून टाकण्यास योग्य समजत आहेस ही तुझी असली कशी विलक्षण नीति आहे ? ॥ ४५ ॥
कल्याणकारी अशा बंधु व नोकरांचा क्षय झाल्यामुळे चक्रवर्ती देखिल तुझ्यावर रागावेल आणि युगाच्या अन्तापर्यन्त तू हा अधर्ममार्ग चालू केला आहेस असे होईल ॥ ४६ ॥
परस्त्रीची अभिलाषा करण्याच्या कार्यात तू प्रथम क्रम मिळविण्याचा यत्न करू नकोस व या कन्येचे जरी तू हरण केलेस तरी ती तुझी होणार नाही ॥ ४७ ॥
पराक्रमाने युक्त व टिकावू असे जयकुमाराचे यश दिवसासारखे उज्ज्वल आहे व तुझी अकोति जी रात्रीप्रमाणे मळकट आहे ती मात्र चिरकाल टिकणारी होईल ॥ ४८ ॥
हे सर्व मलाच युद्धाचे साधन होतील असे समजू नकोस कारण येथे आलेले पुष्कळसे राजे जयकुमाराच्या पक्षाचे आहेत ।। ४९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org