Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-४१)
महापुराण
(५५५
मध्येमहाकुलीनेष कञ्चिदेकं समीप्सितम् । सलक्ष्मीकमलक्ष्मीकं गुणिनं गुणदुर्गतम् ॥ ३४ विरूपं रूपिणं चापि वृणीतेऽसौविषेर्वशात् । न तत्र मत्सरः कार्यः शेषैायोऽयमीदृशः ॥ ३५ लङध्यते यदि केनापि न्यायो रक्ष्यस्त्वयैव सः । नेदं तवोचितं क्वापि पाता स्यात्परिपन्थकः ॥३६ भवत्कुलाचलस्योभौ नाथसोमान्वयौ पुरा । मेरोनिषधनीलौ वा सत्पक्षौ पुरुणा कृतौ ॥३७ सकलक्षत्रियज्येष्ठः पूज्योयं राजराजवत् । अकम्पनमहाराजो राजेव ज्योतिषां गणः ॥ ३८ निविशेषं पुरोरेनं मन्यते भरतेश्वरः । पूज्यातिलङ्घनं प्राहुरुभयत्राशुभावहम् ॥ ३९ पश्य तादृश एवात्र सोमवंशोऽपि कथ्यते । धर्मतीथं भवद्वंशाहानतीथं ततो यतः ॥ ४० . पुरःसरणमात्रेण श्लाघ्यं चक्रं विशां विभोः । प्रायो दुःसाध्यसंसिद्धौ श्लाघते जयमेव सः ॥ ४१
..........................................
ती स्वयंवरकन्या महाकुलीन घराण्यात उत्पन्न झालेल्या सधनाला किंवा निर्धनाला जो तिला पसंत वाटला त्याला वरील. तो पसंत पडलेला वर गुणी किंवा गुणरहित, विरूप किंवा सुरूप-सुंदर अशा त्या व्यक्तीला कर्मवंश होऊन वरील, त्यावेळी बाकीच्या लोकानी मत्सर करू नये. असा हा न्याय आहे ।। ३४-३५ ॥
जर कोणी या नीतीचे उल्लंघन करील तर त्यावेळी या न्यायाचे रक्षण हे युवराजा तू केले पाहिजे. म्हणून यावेळी विरोध करणे तुला योग्य नाही. कारण तू न्यायाचा रक्षक आहेस, तू त्याचा शत्रू होऊ नकोस ॥ ३६ ॥
___ ज्याप्रमाणे मेरुपर्वताला निषध व नील हे दोन पर्वत पक्ष आहेत- सहायक आहेत त्याप्रमाणे तुझ्या कुलरूपी पर्वताला नाथवंश व सोमवंश हे दोन वंश आदिभगवंतानी पक्षसहायक बनविले आहेत ।। ३७ ॥
जसे नक्षत्र तारका आदिकानी चंद्र हा पूज्य मानला आहे तसा हा अकम्पन महाराजा राजराजभरताप्रमाणे पूज्य आहे कारण हा भरताप्रमाणे सर्व क्षत्रियात ज्येष्ठ व पूज्य आहे ॥ ३८ ॥
तुझा पिता भरत या अकम्पनराजाला आदिभगवंतापेक्षा निराळेपणा मानीत नाही. म्हणून पूज्य व्यक्तीचा अतिक्रम-अपमान करणे, त्याना पूज्य न मानणे हे इहपरलोकी अकल्याण करणारे होते ॥ ३९ ॥
___ याचप्रमाणे सोमवंश देखिल तसाच तितक्याच योग्यतेचा आहे असे सांगितले जाते. तुमच्या वंशातून धर्मतीर्थाची उत्पत्ति झाली तशी या सोमवंशापासून दानतीर्थाची उत्पत्ति झाली आहे ॥ ४० ॥
राजांचा प्रभु अशा भरतेश्वराचे हे चक्ररत्न पुढे गमन करण्याने मात्र प्रशंसनीय मानले जात आहे. पण दुःसाध्य कार्य सिद्ध करण्याच्या कामी भरतमहाराज हे जयकुमारालाच प्रायः प्रशंसनीय समजतात ॥ ४१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org