Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-२४)
महापुराण
(५५३
वीरपट्टस्तदा सोढो भवो भर्तुर्भयान्मया । कथमद्य सहे मालां सर्वसौभाग्यलोपिनीम् ॥ १७ सद्यशः कुसुमम्लानमालेवास्त्वायुगावधि । जयलक्ष्म्या सहायैतां हरेयं जयवक्षसः॥ १८ जलदान्पेलवाञ्जित्वा मरुन्मात्रविलायिनः । अद्य पश्यामि दृप्तस्य जयस्य जयमाहवे ॥ १९ इति निभिन्नमर्यादा कार्याकार्यविमढधीः । अनिवार्यो विनिजित्य कालान्तजलधिध्वनिम । अनलस्यानिलो वास्य साहाय्यमगमंस्तदा । केऽपि पापक्रियारम्भे सुलभाः सामवायिकाः ॥ २१ तदा सर्वोपधाशुद्धो मन्त्री जनपवादिभिः । अनवद्यमति म लक्षितो मन्त्रिलक्षणः ॥ २२ धर्म्यमर्थ्य यशःसारं ससौष्ठवमनिष्ठुरम् । सुविचार्य वचो न्याय्यं पथ्यं प्रोक्तुं प्रचक्रमे ॥ २३ मही व्योम शशी सूर्यः सरिदीशोऽनिलोऽनलः । त्वं त्वपिता घनाःकालो जगत् क्षेमविधायिनः ॥२४
पूर्वी पृथ्वीचे स्वामी अशा माझ्या पित्याच्या भयाने मी या जयकुमाराला बांधलेला वीरपट्ट सहन केला पण माझ्या सर्वसौभाग्याचा नाश करणारी ही माला आज मी कशी सहन करू शकेन बरे ? ॥ १७ ॥
फुलांच्या टवटवीत मालेप्रमाणे माझे हे यश युगाच्या शेवटापर्यन्त राहो. आज मी या जयकुमाराच्या वक्षःस्थानापासून त्याच्या जयलक्ष्मीबरोबर या मालेचे हरण करतो ॥ १८ ॥
केवळ वाऱ्यानेही वितळून जाणाऱ्या या कोमल मेघाना जिंकून हा जयकुमार गर्विष्ठ झाला आहे, आज मी युद्धात याचा कसा जय होतो ते पाहतो ॥ १९ ॥
तो अर्ककीति ज्याने मर्यादा सोडली आहे असा झाला, कार्य व अकार्य कोणते याचा निर्णय करण्यास त्याची बुद्धि असमर्थ झाली व त्याचे निवारण करणे अशक्य झाले. त्याने कल्पान्तकालाच्या समुद्राच्या ध्वनीला आपल्या गंभीरस्वराने जिंकले ।। २० ।।
अग्नीला जसा वारा सहाय करतो तसे त्याला कित्येक राजानी साहाय्य केले. बरोबरच आहे की, वाईट कार्य करण्याला साहाय्य करणारे कोणीही सहज मिळतात ।। २१ ॥
त्यावेळी धर्म, अर्थ, काम आदि पुरुषार्थाचे शुद्ध सेवन करणारा अर्थात् धार्मिक न्याय्य आचरण करणारा, उत्तम देशात जन्मलेला, राजमान्य व लोकमान्य व मंत्र्याच्या लक्षणानी युक्त, अनवद्यमति या नांवाचा मंत्री अर्ककीर्तीकडे आला व त्याने याप्रमाणे उपदेश केला ॥ २२ ॥
__ त्याचे भाषण धर्मानुकूल, अर्थपूर्ण, कीर्तीचे सारभूत, उत्तम, कठोरतारहित, निष्ठुरतारहित, न्यायाला-नीतीला अनुसरणारे, पथ्य असे होते. अर्थात् वरील गुणानी युक्त असे भाषण करावयाला त्याने सुरुवात केली ॥ २३ ॥
हे युवराज, पृथ्वी, आकाश, चंद्र, सूर्य, नद्यांचा पति- समुद्र, वायु, अग्नि, तू व तुझा पिता भरतचक्री, मेघ, काल हे सर्व पदार्थ जगाचे हित-कल्याण करणारे आहेत ॥ २४ ॥
म. ७०
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org