Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५५२)
महापुराण
इत्यसाध्वी ऋधं भर्तुः स्ववाचैवासृजत्खलः । सदसत्कार्यनिवृत्तौ शक्तिः सदसतोः क्षमा ॥९ तद्वचःपवनप्रौढक्रोधधूमध्वजारुणः । भ्रमद्विकोचनाङ्गारः क्रुधाग्निसुरसन्निभः ॥ १० उज्जगार ज्वलत्स्थूलविस्फुलिङ्गोपमा गिरः । अर्ककोतिद्विषोऽशेषान्दिधक्षुरिव वाचया ॥ ११ मामधिक्षिप्य कन्येयं येन दत्ता दुरात्मना । तेन प्रागेव मूढेन दत्तः स्वस्मै जलाञ्जलिः ॥ १२ अतिक्रान्ते रथे तस्मिन्प्रोत्थितः क्रोधपावकः । तदैव किन्तु कोदाह्य इत्यजानन्नहं स्थितः ॥ १३ नाम्नातिसन्धितो मूढो मन्यते स्वमकम्पनम् । वृद्ध मयि न वेत्तीति कम्पते सधराधरा ॥ १४ मत्खड्गवारिधाराभिरास्तां तावदगोचरः। संहरत्यखिलाशत्रून्बलवेलैव हेलया ॥ १५ प्ररूढशुष्कनाथेन्दुदुवंशविपुलाटवी । मत्क्रोधप्रस्फुरद्वह्निभस्मितास्मिन्न रोक्ष्यति ॥ १६
याप्रमाणे या दुष्टाने आपल्या भाषणानेच स्वामीच्या मनात- अर्ककीर्तीच्या मनात अयोग्य असा क्रोध उत्पन्न केला. बरोबरच आहे की, चांगले व वाईट कार्य करण्यासाठी सज्जन व दुर्जनामध्ये शक्ति समर्थ असते ॥ ९॥
त्या दुष्ट दुर्मर्षणाच्या भाषणरूप वाऱ्याने अतिशय वाढलेल्या क्रोधरूपी अग्नीने जो लालबुंद झाला आहे व ज्याचे नेत्ररूपी निखारे फिरत आहेत व जो क्रोधामुळे अग्निकुमारासारखा दिसत आहे व आपल्या वाणीने सर्व शत्रूना जणु जाळण्याची इच्छा करीत आहे असा तो अर्ककीति-भरतेश्वरपुत्र जळजळित अग्नीच्या मोठ्या ठिणग्यांची ज्याला उपमा आहे असे भाषण करू लागला ।। १०-११ ।।
माझा अपमान करून ज्या दुष्टाने ( अकम्पनराजाने) ही कन्या त्या कुमाराला दिली त्या मुर्खाने पूर्वीच स्वतःला जलाञ्जलि ( मरणानंतर उत्तरक्रियेत पाण्याची ओंजळ ) अर्पण केली आहे ॥ १२॥
तो रथ जेव्हा मला ओलांडून पुढे गेला तेव्हाच माझ्या ठिकाणी क्रोधाग्नि उत्पन्न झाला परन्तु याच्याद्वारे कोणाला जाळावयाचे हे न समजल्याने मी स्वस्थ बसलो आहे ॥ १३ ॥
अकम्पन या नांवाने हा मूर्ख राजा फसवला गेला आहे व स्वतः मी अकम्पन-भयाने न कापणारा असे समजत आहे. परंतु मी रागावलो असता पर्वतासहित असलेली ही धरा-पृथ्वीही कंपित होते हे हा मूर्ख राजा समजत नाही ॥ १४ ।।
माझ्या तरवाररूपी पाण्याच्या धारेचा हा राजा विषय होणे दूरच राहो. पण माझी सेनारूपी पाण्याची लाटच सगळ्या शत्रूचा अनायासे नाश करून टाकील ॥ १५ ॥
वाढलेले जे नाथवंश व चन्द्रवंश (सोमप्रभराजाचा वंश) हेच जणु दुष्ट वेळूचे वाळलेले मोठे जंगल ते माझ्या क्रोधाच्या चमकणान्या अग्नीने जळून भस्म होईल व पुनः ते कधीही उगवणार नाही ॥ १६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org