Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-३३९)
महापुराण
कुवलयपरिबोधं सन्दधानः समन्तात् । सततविततदीप्तिः सुप्रतिष्ठः प्रसन्नः। परिणतनिजशौर्येणार्कमाक्रम्य दिक्षु । प्रथितपृथुलकोा वर्धमानो जयः स्तात् ॥ ३३९ इति समुपगताश्रीः सर्वकल्याणभाजम् । जिनपतिमतभाक्त्वात्पुण्यभाजं जयं तम् । तदुरुकृपमुपाध्वं हे बुधाःश्रद्दधानाः । परमजिनपदाब्जद्वन्द्वमद्वन्द्ववृत्त्या ॥ ३४०
इत्याचे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे सुलोचनास्वयंवरमालारोपणकल्याणं नाम त्रिचत्वारिंशत्तमं पर्व।
___ चोहीकडे कुवलयांना-कमलाना व भूमंडलाना विकसित करणारा, समृद्ध करणारा, ज्याची कान्ति सतत पसरली आहे, ज्याची प्रतिष्ठा निर्दोष आहे व जो नेहमी प्रसन्न आहे, ज्याने वाढलेल्या आपल्या शौर्याने सूर्यावरही आक्रमण केले आहे, जो सर्व दिशात पसरलेल्या मोठया कीर्तीने उत्तरोत्तर उत्कर्षवान् झाला आहे असा तो जयकुमार दीर्घकाल नांदो ॥३३९ ।।
जिनेश्वराच्या मताला दृढ धारण केल्यामुळे जो पुण्यवान् झाला आहे व सर्व कल्याणांना पात्र झाला आहे अशा या जयकुमाराला याप्रमाणे लक्ष्मीची प्राप्ति झाली म्हणून जिनमतावर श्रद्धान करणान्या हे विद्वज्जनहो, तुम्ही निःसंशय अन्तःकरणाच्या प्रवृत्तीने ज्याची महादया आहे अशा श्रीजिनेश्वराच्या चरणकमलाला शरण जा ॥ ३४० ।।
याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीत अर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या मराठी अनुवादांत सुलोचनेने स्वयंवरमाला जयकुमाराच्या गळ्यात घातली या कल्याणकारक कथेचे वर्णन करणारे हे त्रेचाळिसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org