________________
४३-३३८)
महापुराण
भास्वत्प्रभाप्रसरणप्रतिबुद्धपद्मः । प्राप्तोदयः प्रतिविधाय परप्रभावम् । बन्धुप्रजाकुमुदबन्धु रचिन्त्य कान्तिर्भातिस्म भानुशशिनोविजयी जयोऽयम् ॥ ३३६ प्रियदुहितरमेनां नाथवंशाम्बरेन्दोरयमनुनयति स्म स्पष्टसौभाग्यलक्ष्मीः । ज्वलितमहसमन्यां वीरलक्ष्मीं च कीर्तिम् । कथयति नयनीतिप्रातिभज्ञानमुच्चैः ॥ ३३७
एतत्पुण्यमयं सुरूप महिमा सौभाग्यलक्ष्मीरियम् । जातोऽस्मिञ्जनकः स योऽस्य जनिका सेवास्य या सुप्रजा ॥
पूज्योऽयं जगदेकमङ्गलमणिश्चूलामणिः श्रीभृतामित्युक्तिर्जयभाक्जयं प्रतिजनजतोत्सवैर्जल्पिता ॥ ३३८
Jain Education International
(५४९
आपल्या दैदीप्यमान कान्तीच्या प्रसाराने ज्याने पद्मांचा - दिनविकासी कमलांचा व पद्मचा- लक्ष्मीचा विकास केला आहे, असा उदयाला प्राप्त होऊन ज्याने परभाव - नक्षत्राच्या व पर शत्रूंच्या प्रभावाचे सामर्थ्याचा नाश केला आहे, जो आपले बन्धु-भाऊ वगैरे व प्रजाजन हेच कोणी कुमुद - रात्रिविकासी कमळे त्याना प्रफुल्ल करणारा, त्याना हर्ष देणारा, ज्याची कान्ति अचिन्त्य आहे, अपार आहे असा हा जयकुमार सूर्य व चन्द्र या दोघांचाही पराभव करून विजयी झाला आहे, शोभत आहे ।। ३३६ ॥
ज्याची सौभाग्यरूपी लक्ष्मी अतिशय स्पष्ट उदयाला आली आहे अशा या जयकुमाराने नाथवंशरूपी आकाशाला प्रकाशित करण्यास जो चन्द्र आहे अशा अकम्पनराजाच्या प्रिय कन्येशी-सुलोचनेशी आपला विवाह करून घेतला आहे व हे ठीकच झाले कारण प्रतिभाशाली मनुष्याचे ज्ञान लोकाना असेच सांगते की अतिशय चमकणाऱ्या प्रतापाला धारण करणाऱ्या पुरुषासच अपूर्व वीरलक्ष्मी व कीर्ति प्राप्त होत असते ।। ३३७ ।।
त्यावेळी ज्याना आनन्द वाटला अशा लोकानी जयकुमाराला जो विजय प्राप्त झाला - त्याविषयी असे उद्गार काढले - या जगात हेच पुण्य आहे व हीच उत्तमरूपाची महिमा आहे व हीच पुण्यलक्ष्मी आहे. ज्याच्या पोटी हा जन्मला तोच खरोखर श्रेष्ठ पिता होय व जिने याला जन्म दिला तीच खरोखर जिची संतति उत्तम निपजली अशी माता होय. अर्थात् या चांगल्या पुत्राची माता ती झाली असे आम्ही म्हणतो व हाच लक्ष्मीवान् पुरुषामध्ये चूडामणि जन्मला व जगाचे कल्याण करणारा हाच एक अपूर्व रत्न आहे व हाच जयकुमार सर्वाना पूज्य आहे. अशी त्या जयकुमाराचा उत्कर्ष दाखविणारी वाणी ज्याना अत्यंत हर्ष झाला अशा त्या लोकानी जयकुमाराबद्दल उच्चारली ।। ३३८ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org