Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
चतुश्चत्वारिंशत्तमं पर्व । अथ दुर्मषंणो नाम दुष्टस्तस्यासहिष्णुकः । सर्वानुद्दीपयन्पापी सोऽर्ककीर्त्यनुजीवकः ॥ १ अकम्पनः खलु क्षुद्रो वृथैश्वर्यमदोद्धतः । मृषा युष्मान्समाहूय श्लापमानः स्वसम्पदम् ॥ २ पूर्वमेव समालोक्य मालामासञ्जयज्जये । पराभूति विधित्सुर्वः स्थायिनीमायुगान्तरम् ॥ ३ इति अवाणः सप्प्राप्य सवीडं चक्रिणः सुतम् । इह षट्खण्डरत्नानां स्वामिनौ त्वं पिता च ते ॥४ रत्नं रत्नेषु कन्यैव तत्राप्येषैव कन्यका । तत्त्वां स्वगृहमानीय दौष्टयं पश्यास्य दुर्मतेः॥५ जयो नामात्र कस्तस्मै दत्तवान्मृत्युचोदितः । तेनागतोऽस्मि दौर्वृत्यं तदेतत्सोढुमक्षमः ॥ ६ प्रकृतोऽपि न सोढव्यः प्राकृतैरपि कि पुनः । त्वादृशैः स्त्रीसमुद्भूतो मानभङ्गो मनस्विभिः ॥ ७ तदा दिश दिशाम्यस्मै पदं वैवस्वतास्पदम् । दिशाम्यादेशमात्रेण समालां तेऽपि कन्यकाम् ॥८
.................
यानंतर जयकुमाराला सुलोचनेने वरल्यानन्तर पुढील वृत्त घडले- अर्ककीतीचा दुर्मर्षण नांवाचा एक दुष्ट व जयकुमाराचा उत्कर्ष न सहन करणारा पापी नोकर होता. त्याने सर्व राजाना भडकावले ॥ १ ॥
हा अकम्पन राजा क्षुद्रविचाराचा आहे व ऐश्वर्याच्या गर्वाने उद्धत बनला आहे. आपल्या संपत्तीची प्रशंसा करून तुम्हाला व्यर्थ ही त्याने बोलाविले आहे ॥ २॥
तुम्हा सर्वांचा दुसऱ्या युगापर्यन्त अपमान व्हावा असा त्याने प्रथमच विचार ठरविला होता व पूर्वीच विचार करून सुलोचनेकडून जयकुमाराच्या गळ्यात त्याने माला घालविण्याचा बेत केला होता ॥ ३ ॥
असे बोलून लज्जित झालेल्या चक्रवर्तीच्या मुलाकडे तो आला व त्यास म्हणाला की, हे अर्ककीर्ते तूं आणि तुझे वडील असे आपण दोघे येथे षट्खंडातील असलेल्या सर्व रत्नांचे स्वामी आहात ॥ ४ ॥
रत्नामध्ये कन्या ही रत्न व त्यातही ही सुलोचना कन्याच रत्न आहे. पण हे प्रभो, आपणास घरी बोलावन ही कन्या आपणास त्याने दिली नाही. हा याच्या दुर्मतीचाही दुष्टपणा पाहावा ॥ ५ ॥
__ या जयकुमाराची काय योग्यता आहे ? तो एक क्षुल्लक मनुष्य आहे पण मृत्यूने ज्याला प्रेरिले आहे अशा या अकम्पनाने त्याला आपली मुलगी दिली आहे. त्याचा हा दुष्टपणा मला सहन झाला नाही म्हणून मी आपणाकडे आलो आहे ॥ ६ ॥
जर क्षद्र लोक लहानसा देखिल मानभङ्ग सहन करीत नाहीत तर तुमच्यासारख्या स्वाभिमान्यानी हा स्त्रीपासून उत्पन्न झालेला मानभङ्ग कसा सहन करावा ? ॥ ७ ॥
म्हणून हे प्रभो, मला आपण आज्ञा द्या, मी आपल्या फक्त आज्ञेनेच या अकम्पन राजाला वैवस्वताचे स्थान - यमाचे स्थान दाखवितो व मालेसहित ही कन्या आपल्यासाठी मी देऊ शकेन ॥ ८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org