________________
५५८)
( ४४-५९
प्राक् समर्थितमन्त्रेण प्रदायास्मै स्वचेतसा । कृतसङ्केतया माला सुतयारोपिता मृषा ॥ ५९ युगादौ कुलवृद्धेन मायेयं सम्प्रवर्तिता । मयाद्य यद्युपेक्षेत कल्पान्ते नैव वार्यते ॥ ६० न चक्रिणोऽपि कोपाय स्यादन्यायनिषेधनम् । प्रवर्तयत्यसौ दण्डं मय्यप्यन्यायवर्त्मनि ॥ ६१ जयोऽप्येनं समुत्सिक्तस्तत्पट्टेन च मालया । प्रतिस्वं लब्धरन्धो मां करोत्यारम्भकं पुरा ॥ ६२ समूलतुलमुच्छिद्य सर्वद्विषममुं युधि । अनुरागं जनिष्यामि राजन्यानां मयि स्थिरम् ॥ ६३ द्विधा भवतु वा मा वा बलं तेन किभाशुगाः । मालां प्रत्यानयिष्यन्ति जयवक्षो विभिद्य मे ॥ ६४ नाहं सुलोचनार्थ्यस्मि मत्सरी मच्छरैरयम् । परासुरधुनैव स्यात्कि मे विधवया तया ॥ ६५ दुराचारनिषेधेन त्रयं धर्मादि वर्धते । कारणे सति कार्यस्य कि हानिर्दृश्यते क्वचित् ॥ ६६
महापुराण
या अकंपनाने पूर्वीच आपला विचार ठरवून ठेवला व आपल्या मनाने ह्या जयकुमाराला आपली कन्या द्यावी असा संकेत केला व मुलीकडून त्याच्या गळ्यात माळ त्याने घातली आहे असा हा लुच्चा आहे ।। ५९ ।।
युगाच्या आरंभी ही माया कुलवृद्ध अशा अकम्पनाकडून चालवली गेली आहे व जर यावेळी उपेक्षा केली तर ती कल्पान्तींही नाहीशी केली जाणार नाही ॥ ६० ॥
यास्तव मी या अन्यायाचा नाश करीन व चक्रवर्ती देखिल माझ्या या कार्याने रागावणार नाही. पण मी जर अन्यायाच्या मार्गात प्रवृत्त झालो तर हा चक्रवर्ती माझ्यावरही दण्ड लादतो, मला देखील शिक्षा करतो ॥ ६१ ॥
भरतचक्रीने याच्या कपाळावर वीरपट्ट बांधल्यामुळे आणि सुलोचनेने याच्या गळयात माळा घातली म्हणून हा जयकुमार देखिल उन्मत्त झाला आहे व अशा रीतीची संधि मिळाल्यामुळे माझ्यावर देखिल हा कपटप्रयोग करीत आहे ।। ६२ ।।
म्हणून सर्वांचा द्वेषी बनलेल्या याचा मी युद्धात मुळापासून नाश करून टाकणारा आहे व राजे लोकांचे माझ्यावर स्थिर प्रेम मी उत्पन्न करीन ॥ ६३ ॥
अशा वेळी सैन्य हे कांही त्या बाजूला व कांही माझ्या बाजूला होवो अथवा न होवो, माझे बाण त्या जयकुमाराचे वक्षस्थल फोडून ती माला परत आणून देतील ॥ ६४ ॥
मला त्या सुलोचनेची इच्छा नाही पण हा जयकुमार माझ्याविषयी मत्सर धारण करीत असल्यामुळे आताच लौकर माझ्या बाणानी मरण पावेल व अशा रीतीने विधवा बनलेल्या त्या सुलोचनेविषयी मला कांही करावयाचे नाही अर्थात् तिला मी आपलीशी करणार नाही ॥ ६५ ॥
तेव्हा अशा रीतीचा दुराचार मी नाहीसा करीन. त्यामुळे धर्म व कामपुरुषार्थ याची वाढ होईल. कारण कारणे सगळी मिळाल्यावर कोठे तरी कार्याचा नाश झाला आहे असे कोठेही आढळून येत नाही ॥ ६६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org