Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५४६)
महापुराण
(४३-३१५
आत्मसम्पद्गुणैर्युक्तः समेतश्चाभिगामिकैः । प्रज्ञोत्साहविशेषैश्च ततोऽयमुदितोदितः ॥ ३१५ चित्रं जगत्रयस्यास्य गुणाः संरज्य साम्प्रतम् । व्यावृत्ताः सर्वभावेन तव भावानुरञ्जने ॥ ३१६ अयमेकोऽस्ति दोषोऽस्य चतस्रः सन्ति योषितः । श्रीः कीतिर्वीरलक्ष्मीश्च वाग्देवी चातिवल्लभाः ॥ जितमेघकुमारोऽयमेकः प्राक्त्वज्जयेऽधना । च्यतधैर्य इवालक्ष्ये यत्सहायीकृतः स्मरः ॥ ३१८ बलिनोर्युवयोर्मध्ये वर्तमानो जिगीषतोः । द्वैधीभावं समापन्नः षाड्गुण्यनिपुणः स्मरः ॥ ३१९ कोतिः कुवलयालादी पद्मावादी प्रभास्य हि । सूर्याचन्द्रमसौ तस्मादनेन हतशक्तिकौ ॥ ३२० कोतिर्बहिश्चरा लक्ष्मीरतिवृद्धा सरस्वती । जीर्णेतरापि शान्तेव लक्ष्यते क्षतविद्विषः ॥ ३२१
ज्यांच्या योगाने आत्मस्वरूप असलेली ज्ञानरूपी सम्पत्ति प्राप्त होते अशा गुणांनी हा युक्त आहे व आदर करण्यायोग्य अशा इतर गुणानीही हा युक्त आहे. तसेच बुद्धि आणि उत्साह यांच्या अधिकपणाने हा उत्तरोत्तर उत्कर्षाला पावलेला आहे ॥ ३१५ ॥
या जयकुमाराचे गुण या सगळ्या तीन जगातील जीवांना संतुष्ट करून यावेळी सर्व प्रकारे तुझ्या अन्तःकरणाला अनुरक्त करण्यासाठी परतून आले आहेत. याचे आम्हाला मोठे आश्चर्य वाटते ॥ ३१६ ॥
याच्या ठिकाणी एक दोष आहे तो असा की श्री, कीर्ति, वीरलक्ष्मी आणि वाग्देवी-सरस्वती या अत्यंत प्रिय अशा याला चार पत्नी आहेत ।। ३१७ ।।
जेव्हां याने मेधकुमार देवांना जिंकले तेव्हा हा एकटाच होता पण आता तुला जिंकण्यासाठी हा धैर्यरहित झाला आहे म्हणून याने मदनाला आपला सहायक केला आहे ।। ३१८ ।।
तुम्ही दोघे बलवान् एकमेकाना जिंकण्याची इच्छा करीत आहात. शत्रूला जिंकण्यासाठी सामदामादि सहा गुणानी चतुर असलेला मदन तुम्हा दोघापैकी कोणाला कोणत्या गुणाने जिंकावे याविषयी संशययुक्त झाला आहे, त्याला काही कळेनासे झाले आहे ।। ३१९ ॥
या जयकुमाराची कीर्ति कुवलयाह्लादी-रात्री विकसणान्या कमलाला आनंदित करणारी आहे व कुवलयाला भूमंडळाला आनंदित करणारी आहे. तसेच याची प्रभा अंगकान्ति पद्म-दिनविकासी कमलाला प्रफुल्ल करणारी आहे व पद्मा-लक्ष्मीला आनंदित करणारी आहे. म्हणून याने सूर्य व चंद्र या दोघांना ही आपल्या या दोन कार्यानी सामर्थ्यरहित केले आहे ।। ३२० ॥
या जयकुमाराची कीर्तिरूपो स्त्री नेहमी बाहेर भटकत असते व लक्ष्मीरूपी पत्नी अतिशय म्हातारी झाली आहे. ज्याने शत्रूचा संहार केला आहे अशा या जयकुमाराची तिसरी पत्नी सरस्वती हीही जीर्ण झाली आहे. अर्थात् वृद्धावस्थेमुळे शिथिल शरीराची बनली आहे. पक्षी परिपक्व झाली आहे. यामुळे या तिधीवर जयकुमाराचे खास प्रेम नाही व चौथी पत्नी वीरलक्ष्मी आहे. जरी ती तरुण आहे व नेहमी त्याच्याजवळ राहते पण ती आता शान्त झाल्यासारखी आहे. शृङगारादिकाकडे तिची प्रवृत्ति नाही. पक्षी क्षमायुक्त शूरवीरता तिची आहे, यामुळे या चौघीवरती या जयकुमाराचे प्रेम नाही ॥ ३२१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org