Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-३१४)
महापुराण
(५४५
पश्चात्सर्वानिरीक्ष्यषा कञ्चित्तु विवरिष्यते । तथैवेति खगास्तस्थुः किं वाशा नावलम्बते ॥३०६ पश्चाज्जग्लुर्मुखाब्जानि तद्रथाद्वयकसन्पुरः । रवेरिवोदये राज्ञां संसृतेः स्थितिरीदशी ॥ ३०७ उच्चाद्वादुद्रुवनिम्नमभिभूमि च तद्रथः । कञ्चुकी कथयामास नामभिस्तान्नुपांस्तदा ॥ ३०८ निराकृत्यार्ककीादीन् साजेया जयमागमत् । हित्वा शेषान्द्रमांश्चूतं मधौ मधुकरी यथा ॥३०९ गृहीतप्रग्रहस्तत्र कञ्चुको चित्तवित्तदा । वचो व्यापारयामास जयव्यावर्णनं प्रति ॥ ३१० प्रदीपः स्वकुलस्यायं प्रभुः सोमप्रभात्मजः । श्रीमानुत्साहभेदैर्वा जयोऽयमनुजैर्वृतः ॥ ३११ न रूपमस्य व्यावण्यं तदेतदतिमन्मथम् । स दर्पणोऽर्पणीयः किं करकङ्कणदर्शने ॥ ३१२ जित्वा मेघकुमाराख्यानुत्तरे भरते सुरान् । सिंहनादः कृतोऽनेन जिततन्मेघनिःस्वनः ॥ ३१३ वीरपट्ट प्रबद्धयास्य स्वभुजाभ्यां समद्धतम् । न्यधायि निषिनाथेन हृष्ट्वा मेघस्वराभिधा ॥ ३१४
ही सर्वांना आधी पाहील व नंतर कोणाला तरी ही वरील असा विचार करून ते विद्याधर सर्व थांबले. बरोबरच आहे की, आशा कशावर अवलंबून राहात नाही बरे ? ॥३०६।।
पूढे रथ गेला म्हणजे पाठीमागच्या राजांची मुखे म्लान होत व पुढच्या राजांची मुखे विकसित होत असत. जसा सूर्योदय झाल्यावर कमळे विकसित होतात व तो अस्ताला गेला असता मिटतात. संसारातील सर्व प्राण्यांची स्थिति अशी आहे ॥ ३०७ ॥
तिचा तो रथ उंच भूमीवरून खाली भूमीवरच्या प्रदेशाकडे आला अर्थात् भूमिगोचर राजाकडे आला. तेव्हां कंचुकीने त्या त्या राजांची नांवे घेऊन सुलोचनेला त्यांची माहिती दिली ।। ३०८ ॥
जसे भुंगी सगळया झाडाना सोडून वसंतऋतूमध्ये आम्रवृक्षाकडे येते तशी ती अजेय सुलोचना कुमारी अर्ककीर्ति वगैरे राजांना ओलांडून जयकुमाराकडे आली ॥ ३०९ ॥
त्यावेळी कुमारीचे चित्त जाणणाऱ्या त्या कंचुकीने घोड्यांचे लगाम ओढून धरले व जयकुमाराच्या वर्णनास त्याने सुरुवात केली ।। ३१० ॥
हा सोमप्रभ राजाचा मुलगा प्रभुजयकुमार. हा स्वतःच्या कुलाला प्रकाशित करणारा जणु प्रदीप आहे. हा लक्ष्मीसंपन्न राजा उत्साहाचे जणु अनेक भेद अशा आपल्या अनेक धाकट्या भावांनी घेरलेला येथे शोभत आहे ॥ ३११ ॥
याचे सौन्दर्यवर्णन करणे नको, कारण ते मदनाच्या रूपालाही उल्लंघणारे आहे. हातातील कांकण पाहण्यास आरसा घ्यावा लागतो काय ? ॥ ३१२ ॥
उत्तरेकडील भरतक्षेत्रात मेघकुमार नामक देवांना जिंकून त्या देवांच्या कृत्रिम मेघांच्या गर्जनेला जिंकणारा सिंहनाद या जयकुमाराने केला होता ।। ३१३ ॥
___ त्यावेळी निधिपति भरतेश्वराने आनंदित होऊन आपल्या दोन बाहूंनी उचलून घेतलेला वीरपट्ट याला बांधला आणि 'मेघस्वर' नामक पद याला दिले ।। ३१४ ॥
म.६९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org