________________
५४४)
महापुराण
(४३-२९८
समस्तनेत्रसम्पीतमप्य स्यावर्षते तराम् । लावण्यमम्बुधिस्त्यक्तः श्रिया वहतु तत्कथम् ॥ २९८ रत्नाकरत्वदुर्गर्वमम्बुधिः श्रयते वृथा। कन्यारत्नमिदं यत्र तयोरेतद्विराजते ॥ २९९ इति स्तुतात्मसौभाग्यभाग्यरूपादिसम्भृता । जनैः स्वयंवरागारमागमद्गोमिनीव सा ॥ ३०० पराभूतिद्विधा सात्र भाविनी केति वा तदा। प्रीतिशोकान्तरे कञ्चिद्रसं राजकमन्वभूत् ॥ ३०१ स्थित्वा महेन्द्रदत्तोऽपि रत्नमालाधरो धुरि । रथं प्रचोदयामास प्रतिविद्यापराधिपान् ॥ ३०२ दक्षिणोत्तरयोः श्रेण्योर्नमेश्च विनमः सुतौ । पतिः सुनमिरेषोऽयमितः सुविनमिः श्रियः ॥ ३०३ अन्येऽमी च खगाम्नाया विद्याविक्रमशालिनः। पति वृणीष्व त्वं चैषु स्वेच्छामेकत्र पूरय ॥ ३०४ इति कञ्चुकिनिर्दिष्ट नामादाय पृथक् पृथक् । कर्णे कृत्यात्ययात्सर्वान्रुचिश्चित्रा हि देहिनाम् ॥३०५
मी रत्नाकर आहे असा वाईट अभिमान समुद्राने व्यर्थ धारण केला आहे. पण हे सुलोचनारूपी कन्यारत्न जेथे जन्मले त्या दोघांना सुप्रभाराणी व अकम्पन राजा या दोघांनाच रत्नाकर आम्ही आहोत म्हणून गर्व बाळगणे हे त्यानाच शोभते समुद्राला नाही ॥ २९९ ।।
याप्रमाणे लोकाकडून जिचे सौंदर्य, भाग्य-पुण्य व स्वरूप आदिक स्तविले गेले आहे अशी ती गुणांनी भरलेली सुलोचना कन्या लक्ष्मी प्रमाणे स्वयंवर मण्डपांत आली ॥ ३०० ।।
पराभूति परा उत्कृष्ट भूति ऐश्वर्य व पराभूति म्हणजे पराभव प्राप्त होणे अशी पराभूति दोन प्रकारची आहे. त्यापैकी कोणती आम्हाला प्राप्त होईल यांचा विचार करणाऱ्या स्या राजसमूहाला प्रीति व शोक यापैकी कोणता रस उपभोगावा लागेल बरे ? ॥ ३०१ ।।
महेन्द्रदत्त नामक कंचुकी हातात रत्नमाला धारण करून रथांत पुढे बसला होता व त्याने तो रथ विद्याधर राजाकडे चालविला ।। ३०२ ।।
विजयापर्वतावरील दक्षिणश्रेणी व उत्तरश्रेणी या श्रेणीचे स्वामी जे नमि व विनमि विद्याधराधीश आहेत त्याचे हे दोघे पुत्र सुनमि आणि सुविनमि आहेत. हे दोघे राज्यलक्ष्मीचे अधिपति आहेत ।। ३०३ ॥
याचप्रमाणे हे दुसरे राजे ही विद्याधरवंशपरंपरेंत जन्मले आहेत. विद्या व पराक्रम यांनी हे शोभत आहेत. हे कन्ये तू यापैकी एकाला पति म्हणून वर व आपली इच्छा पूर्ण कर ॥ ३०४ ॥
याप्रमाणे बोलून वेगळे वेगळे एक एक नांव घेऊन त्यांचे वर्णन कंचुकीने केले पण ते वर्णन कानांत ठेवून ती त्या सर्वांना उल्लंघून पुढे गेली, बरोबरच आहे की, प्राण्यांच्या रुचि अनेक प्रकारच्या असतात व आश्चर्यकारक असतात ॥ ३०५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org