Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-२९७)
महापुराण
(५४३
वीज्यमाना विधुस्पद्धिहसांसामलचामरैः । जनानां दृष्टिदोषान्वा धुन्वद्भिदूंरतो मुहुः ॥ २९१ अवधूतः पुरानङगः संप्रति स्वीकृतोऽनया । प्रयोजनवशात्प्राज्ञैः प्रास्तोऽपि परिगृह्यते ॥ २९२ अस्या ग्रह इवानङ्गः सद्यः सर्वाङ्गसङ्गतः । विकारमकरोत्स्वरं भूयो भ्रूनेत्रवक्त्रजम् ॥ २९३ साङ्गो यद्येतयाद्यैवमेकीभावं व्रजामि किम् । इत्यनङ्गोऽप्यनङ्गत्वं स्वं मन्ये साध्वबुध्यत ॥ २९४ लक्ष्मीः सा सर्वभोग्याभूद्रतिव्यङ्गन केवलम् । जितानङगानिमानेषा न्यक्कृत्य जयमाप्स्यति ॥२९५ करग्रहेण लक्ष्मीवान् स्यान्न वा षारिधिर्भुवः । अस्याः करग्रहो यस्य तस्य लक्ष्मीः करे स्थिता ॥२९६ लावण्यमम्बुधौ पुंसु स्त्रीवस्यामेव सम्भृतम् । यत्प्राप्ताः सरितः सर्वास्तमेतां सर्वपार्थिवाः ॥२९७
-----------------
सुलोचनेने प्रथमतः मदनाचा तिरस्कार केला होता. पण आता तिने त्याचा स्वीकार केला आहे. बरोबरच आहे की शहाणे लोक ज्याचा त्याग केलेला असतो त्याचाही स्वीकार प्रयोजनबश होऊन करीत असतात ।। २९१ ॥
पिशाचा प्रमाणे जणु कामदेवाने तत्काळ हिच्या सर्व अंगांत प्रवेश केला व स्वच्छंदाने हिच्या भुवया, नेत्र व मुख या अवयांत त्याने विकार उत्पन्न केला. ॥ २९२ ।।
मी जर सांग- शरीरसहित असतो तर आजच मी हिच्याशी एकरूप कसा झालो असतो मला एकरूप होता आले नसते. म्हणून मदनाने मी अनङग आहे अंगरहित आहे असे असणे हेच उत्तम आहे असे त्याने जाणले ।। २९३ ॥
जी लक्ष्मी ती सर्व भोग्य झाली आहे व रतिही व्यङग-अंगरहित अशा कामाकडून फक्त भोगली जाते. परंतु ही सुलोचना ज्यांनी आपल्या सौंदर्याने मदनाला जिंकले आहे अशा या सर्व राजांना तिरस्कृत करून जयाला - जयकुमाराला प्राप्त करून घेईल ॥ २९४ ॥
करग्रहण करून लक्ष्मीचा हात धरून समुद्र लक्ष्मीवान् होईल किंवा नाही पण या सुलोचनेचा हात ज्याने ग्रहण केला आहे त्याच्या हातांत लक्ष्मी अवश्य राहिली आहे असे समजावे ॥ २९५ ॥
पुरुषामध्ये लावण्य कोणात असेल तर समुद्रांत आहे. व स्त्रियांत लावण्य कोठे असेल तर ते या सुलोचनेत भरलेले आहे. कारण असे नसते तर सर्व नद्या समुद्रालाच का प्राप्त होतात ज्या अर्थी सर्व नद्या समुद्राकडे जातात व ज्या अर्थी सर्व राजे या सुलोचनेकडे आलेले आहेत त्या अर्थी या दोघामध्ये लावण्य आहे. समुद्रामध्ये लावण्य - खारटपणा आहे व सुलोचनेत लावण्य - सौंदर्य आहे ॥ २९६ ॥
__ या सुलोचनेत जे लावण्य आहे ते सर्वाच्या नेत्राकडून प्याले गेले तरी ते अधिक वाढतच आहे. पण लक्ष्मीने त्यागलेला समुद्र त्या लावण्याला सौंदर्याला कसे बरे धारण करू शकेल ? ।। २९७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org