________________
४३-२६२)
महापुराण
(५३९
न चित्रं तत्र यच्चित्ती सोत्सवोऽन्तर्बहिश्च तत् । तद्वत्स्वभूषया यस्मात्कुड्याद्यपि विचेतनम् ॥२५४ भोक्तशन्यं न भोगाङ्गन भोक्ता भोगजितः। तत्र सन्निहितोऽनङ्गो लक्ष्मीश्चाविष्कृतोदया॥२५५ पश्य पुण्यस्य माहात्म्यमिहापीति तदुत्सवम् । विलोक्य कृतधर्माणः पुरस्थानबहु मेनिरे ॥ २५६ उदसुन्वन्फलं मत्वा धर्मस्य मुनयोऽपि तत् । धर्माधर्मफलालोकात्स्वभावः स हि तादृशाम् ॥ २५७ कन्यागृहात्तदा कन्यामन्यां वा कमलालयाम् । पुरोभूय पुरन्ध्न्यस्तामीषल्लज्जात्तसाध्वसाम् ॥२५८ विवाहविधिवेदिन्यः कृततत्कालसक्रियाम् । समानीय सदैवज्ञां महातूर्यरवान्विताम् ॥ २५९ सर्वमङ्गलसम्पूर्ण मुक्तालम्बूषभूषिते । चतुःकाञ्चनसुस्तम्भे भूरिरत्नस्फुरत्त्विषि ॥ २६० प्रमोदात्सुप्रभादेशाद्विवाहोत्सवमण्डपे । कलधौतमये पट्टे निवेश्य प्राङमुखीं सुखम् ॥ २६१ कलशेर्मुखविन्यस्तविलसत्पल्लवाधरैः । अभिषिच्य विशुद्धचम्बुपूर्णः स्वर्णमयः शुभैः ॥ २६२
त्या नगरीत ज्याअर्थी भिंत वगैरे चैतन्यरहित वस्तु देखिल सर्व बाजूनी आपल्या अलंकारानी आनंदित झाल्याप्रमाणे दिसत होत्या तर चेतनाधारक सर्व प्राणी आतून व बाहेरूनही आनंदित झाले होते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही ।। २५४ ।।
त्या नगरीत कोणतीही भोग्य वस्तु जिचा उपभोग घेणारा कोणी नाही अशी बिलकुल नव्हती व कोणीही भोक्ता भोगवजित असा नव्हताच. कारण तेथे मदन नेहमी सर्वत्र वास करीत होता व लक्ष्मीचाही सर्वत्र खूप प्रकर्षाने उदय झालेला होता ॥ २५५ ।।
या जन्मात देखिल पुण्याचे माहात्म्य पाहा असे म्हणून ज्यानी पुण्य मिळविले आहे अशा लोकांनी या नगरातील लोकांचा तो उत्सव पाहून त्यांना बहुमान दिला. त्यांची फार स्तुस्ति केली ।। २५६ ।। .
मुनिजन देखिल त्या उत्सवाला धर्माचे फल मानून प्रसन्न झाले होते. हे ठीकच आहे, कारण धर्माचे फळ व अधर्माचे फळ पाहून त्याचे त्याप्रमाणे वर्णन करणे हा त्या लोकाचा तसा स्वभावच बनलेला असतो ।। २५७ ॥
___ त्यावेळी विवाहाचा कार्यक्रम जाणणाऱ्या सदाचारी स्त्रिया पुढे होऊन कन्यागृहाकडे आल्या व लज्जेमुळे जिच्या मनात थोडेसे भय उत्पन्न झाले आहे व जी जणु दुसरी लक्ष्मी आहे अशी व जिचा त्यावेळी करण्यास योग्य असा सत्कार केला आहे अशा त्या कन्येला कन्यागृहातून बाहेर आणले. तेव्हां मोठमोठी वाद्ये वाजत होती. कन्येबरोबर ज्योतिषी लोकही बरोबर होते ॥ २५८-२५९।।
____ यानंतर तिला विवाहोत्सव मण्डपाकडे सुप्रभाराणीच्या आज्ञेने त्या सुवासिनी स्त्रियांनी आणिले. तो मण्डप सर्व मंगलानी पूर्ण होता. त्याच्या छताला मोत्यांचे घोस बसविले होते. त्या मण्डपाला चार सुवर्णाचे खांब बसविलेले होते. पुष्कळ रत्ने त्यांत जडविलेली असल्यामुळे त्यांची कान्ति पसरली होती. अशा त्या मंडपात सुवर्णाच्या पाट्यावर त्या कन्येला त्या स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करवून बसविले होते. ज्यांच्या मुखावर उत्तम पाने ठेविली आहेत, ज्यात शुद्ध पाणी भरले आहे अशा सोन्याच्या शुभ चार कुंभानी तिला स्नान घातले ॥ २६०-२६२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org