________________
४३-२४६)
महापुराण
(५३७
.......
वाराणसी जितायोध्या स्वनाम्ना तां निराकरोत् । कन्यारत्नात्परं नान्यदित्यत्राहुःप्रभत्यतः ॥२३८ तास्वयंवरशालायामर्ककीर्तिपुरःसरान् । निवेश्य प्रीणयामास कृताभ्यागतसक्रियः ॥ २३९ पुरोपाजितसद्धर्मात्सर्वमेतत्ततः पुरा । धर्म एष समभ्यर्च्य इति सञ्चिन्त्य विद्वरः॥ २४० कृत्वा जैनेश्वरी पूजां दीनानाथवनीपकान् । अनथिनः समाश सर्वत्यागोत्सवोद्यतः ॥ २४१ तां लक्ष्मीमक्षयां मत्वा सफलां चाप्तसन्चयात् । स तदाभूत्क्षितेरेकभोग्यः क्षितिरिवात्मनः ॥२४२ एवं विहिततत्पूजः प्रकृतार्थ प्रचक्रमे । प्रारम्भाः सिद्धिमायान्ति पूज्यपूजापुरःसराः ॥ २४३ आस्फालिता तदा भेरी विवाहोत्सवशंसिनी। व्याप्नोत्प्रमोदः प्राक्चेतः पश्चात्कर्णेषु तद्ध्वनिः॥ पुष्पोपहारिभूभागा नृत्यत्केतुनभस्तला । निजिताब्धिमहातूर्यध्वानाध्मातदिगन्तरा ॥ २४५ विशोधितमहावीथिदेशा प्रोबद्धतोरणा । पुनर्नवसुधाक्षोदधवलीकृतसौधिका ॥ २४६
जिने अयोध्या जिंकली आहे अशी ती वाराणसीनगरी आपल्या नांवाने तिचा तिरस्कार करू लागली म्हणून त्यावेळेपासून लोक कन्यारत्नाहून दुसरे रत्न श्रेष्ठ नाही असे म्हणू लागले ॥ २३८ ।।
___ज्याने आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला आहे अशा त्या अकम्पनराजाने स्वयंवर शाळेत अर्ककीर्ति आदिक राजाना स्थान दिले व तो त्यांच्यावर फार प्रेम करू लागला ॥२३९।।
पूर्वी मिळविलेल्या उत्तम धर्माचेच हे फल आहे म्हणून प्रथमतः धर्माचेच पूजन केले पाहिजे असा त्या विद्वच्छेष्ठराजाने मनात विचार केला ।। २४० ॥
___ आणि त्याने जिनेश्वराची पूजा केली व त्याने दीन अनाथ व याचक लोकाना ते याचना न करतील असे केले व सर्वांचा त्याग करणेरूप उत्सव करण्यास तो उद्युक्त झाला ॥ २४१ ॥
चांगल्या कार्यात् लक्ष्मीचा व्यय करून तो राजा आपली लक्ष्मी अक्षय व सफल झाली असे मानू लागला व जशी पृथ्वी आपली उपभोग्य आहे तसे आपणही सर्व जनांचे उपभोग्य आहोत असे त्याने स्वतःस मानले ॥ २४२ ॥
याप्रमाणे त्याने जिनपूजा करून आपल्या प्रकृतकार्यास प्रारम्भ केला. बरोबरच आहे की, जे पूज्य आहेत त्यांची पूजा केली असता प्रारंभिलेल्या कार्याची सिद्धि होते ॥ २४३ ॥
ज्यावेळी विवाहोत्सवाची प्रशंसा करणारा नगारा वाजू लागला तेव्हां प्रथमतः लोकांचे मन आनन्दाने व्यापले व नंतर नगान्याच्या ध्वनीने लोकांचे कान व्यापले ॥ २४४ ।।
त्या नगरीचा भूप्रदेश पुष्पसमूहाने शोभत होता व आकाश नाचणाऱ्या ध्वजानी व्याप्त झाले होते. ज्यानी समुद्राच्या गर्जनेला जिकिले आहे अशा महावाद्यांच्या ध्वनींनी सर्व दिशांचा प्रदेश दुमदुमला होता ॥ २४५ ॥
या नगरीचे मोठे रस्ते स्वच्छ केलेले होते व त्यावर तोरणे बांधलेली होती आणि पुनः नवीन चुना लावून या नगरीतील वाडे शुभ्र केले होते त्यामुळे ती नगरी शोभत होती ॥२४६॥ म. ६८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org