Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५३६)
महापुराण
(४३-२३०
अभिगम्य नपः क्षिप्रं स्वयमाविष्कृतोत्सवः । चेतः सौलोचनं तान्प्रीतान्प्रावेशयत्परम् ॥ २३० स्वगेहादिषु सम्प्रीत्या समुद्बद्धोत्सवध्वजः । आकम्पनिभिराविष्कृतादरैः परिवारितः॥ २३१ सांशुमर्कमिवोद्यन्तमर्ककीति सहानुजम् । अकम्पननृपोऽभ्येत्य भरतं वानयत्पुरम् ॥ २३२ स्वादरेणव संसिद्धि भाविनीं तस्य सूचयन् । नाथवंशाप्रणीर्मेघस्वरं चानेतुमभ्ययात् ॥ २३३ ततो महीभृतः सर्वे त्रिसमुद्रान्तरस्थिताः । पुरा इव पयोराशि प्रापुः स्फीतीकृतश्रियः॥ २३४ स्वयमर्षपथं गत्वा केषाञ्चित्सर्वसम्पदा । केषाञ्चिद्गमयित्वान्यान्मान्यान्हेमाङ्गवाविकान् ॥२३५ ये ये यथा यया प्राप्ताः पुरी तांस्तास्था तथा। आह्वयन्तीं पताकाभिर्वोच्छ्रिताभिरवीविशत् ॥२३६ तदा तं राजगेहस्थं नरविद्याधराधिपः । वृतं सुलोचनाकार्षीत् पितरं जितचक्रिणम् ॥ २३७
राजा अकम्पनाने स्वतः उत्सव प्रकट केला होता व त्याने जणु सुलोचनेचे अन्तःकरण की काय अशा आपल्या नगरात त्या आनंदित झालेल्या विद्याधरांना शीघ्र नेले ॥ २३० ।।
अकम्पनराजाने राजमंदिर वगैरे ठिकाणी अतिशय हर्षाने उंच ध्वज वगैरे उभारलेले होते व हेमांगद वगैरे आपल्या पुत्रानी तो मोठ्या आदराने घेरलेला होता ।। २३१ ।।
किरणानी सहित जणु सूर्य अशा आपल्या धाकट्या भावासह आलेल्या अर्ककीर्तीला सामोरे जाऊन भरत चक्रवर्तीप्रमाणे समारंभाने अकंपन राजाने आपल्या नगरात नेले ।। २३२॥
आपण केलेल्या सत्कारानेच त्याची भावी कार्यसिद्धि होईल असे सुचविणारा तो नाथवंशाचा अग्रगण्य असलेला अकम्पन राजा त्या मेघस्वराला नगरात आणण्याकरिता त्याला सामोरे गेला ।। २३३ ।।
नंतर जल संपत्तीला वाढविणारे जलप्रवाह जसे समुद्राकडे जातात तसे तीन समुद्राच्या मध्यभागात राहणारे सर्व राजे त्या ठिकाणी आले ॥ २३४ ॥
तो राजा आपल्या सर्व ऐश्वर्यासह कित्येक राजांचे सामोरे अर्ध्या मार्गापर्यन्त गेला. कित्येकांच्या सामोरे त्याने आपल्या हेमांगद वगैरे मानकरी लोकांना पाठविले ।। २३५ ॥
जे जे राजे जसे जसे या पुरीला आले त्यांना त्यांना ही नगरी आपल्या उंच पताकानी जणु बोलावते अशा त्याना अकंपनराजाने नगरीत आणले ।। २३६ ।।
त्यावेळी राजवाड्यात असलेल्या व नगराधिप विद्याधराधिपानी युक्त अशा आपल्या पित्याला सुलोचनेने चक्रवर्तीला देखिल ज्याने जिंकले आहे असे केले. म्हणजे सुलोचनेच्या निमित्ताने एकत्र जमलेले सर्व राजे व विद्याधर यांच्या योगाने अकम्पनराजा चक्रवर्तीप्रमाणे भाग्यवान् दिसला ॥ २३७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org