Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५३४)
महापुराण
(४३-११४
तं निरीक्ष्य क्षितेर्भर्ता लक्ष्मीलीलागृहायितम् । नामात्स्वाङ्गेस सन्तोषात्सन्मित्राकि न जायते॥२१४ अथ प्रादुरभूत्कालः सुरभिर्मत्तमन्मथः । मुदं मदं च सञ्चिन्वन्कामिषु भ्रमरेषु च ॥ २१५ ववो मंदं गजोद्घष्टचन्दनद्रवसारभृत् । एलालवङ्गसंसर्गपडगुलो मलयानिलः ॥ २१६ मलयानिलमाश्लेष्टुं सम्बन्धिनमुपागतम् । लताद्रुमाःसुशाखानां प्रसारणमिवादधुः ॥ २१७ यमसम्बन्धिदिक्त्यागं रविर्भात इवाकरोत् । मदेन कोकिलाः काले कूजन्ति स्म निरङकुशम् ॥२१८ पुष्पमार्तवमाप्ता नः शाखा न स्पृशतेति तान् । अलोन्वासं निषिध्यन्तश्चम्पकाश्चलपल्लवैः॥२१९ वसन्तश्रीवियोगो वा सशोकोऽशोकभूरुहः । सत्पुपष्पल्लवो नाम सार्थतत्सङ्गमावचधात् ॥ २२०
___ लक्ष्मीच्या क्रीडास्थानाप्रमाणे असलेला तो स्वयंवरप्रासाद पाहून तो अकंपन राजा आनंदाने आपल्या अंगात मावला नाही. बरोबरच आहे की चांगल्या मित्रापासून कोणते कार्य होत नाही बरे ? ॥ २१४ ॥
नंतर ज्यात मदन मत्त होतो अशा प्रकारचा आणि कामिजनाना आनंदित करणारा व भुंग्याना मस्ती उत्पन्न करणारा वसन्तऋतूचा काल आला ॥ २१५ ॥
हत्तीनी घासलेल्या चन्दनवृक्षाचा पातळ उत्तम सुगंधित सार धारण करणारा व वेलदोडे, लवंगा यांच्या संसर्गाने जणु पांगळा झालेला असा मलयवात मंद मंद वाहू लागला ॥ २१६ ॥
जसा एखादा संबंधी मनुष्य आला असता त्याला भेटण्यासाठी माणसे आपले हात पसरतात तसे मलयाच्या वान्याला भेटण्यासाठी जणु वेली व वृक्ष आपआपल्या शाखा पसरू लागले ॥ २१७ ॥
सूर्याने जणु भिऊन यमसंबधी दिशेचा- दक्षिणदिशेचा त्याग केला अर्थात् दक्षिणायनाचा त्याग करून उत्तरायणाचा आश्रय घेतला व कोकिल वसंतऋतूमध्ये मदयुक्त होऊन निष्प्रतिबंधक गर्वाने शब्द करू लागले ॥ २१८॥
सोनचाफ्याचे वृक्ष आपल्या हलणाऱ्या पानानी जणु भुंग्याना असे म्हणाले या आमच्या शाखा ऋतुसंबंधी पुष्पाला धारण करीत आहेत जणु ऋतुमती झाल्या आहेत त्याना शिवू नका' असे जणु म्हणू लागले. चाफ्याच्या फुलाला भुंगे स्पर्श करीत नाहीत असा लोकप्रवाद आहे ।। २१९ ॥
अशोकवृक्ष वसन्तलक्ष्मीचा वियोग झाल्यामुळे जणु सशोक झाला होता तो आता वसन्तलक्ष्मीचा संयोग झाल्यामुळे अशोक झाला अर्थात् उत्तम फुलानी व पालवीनी युक्त झाला, शोभू लागला ॥ २२० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org