________________
५३२)
महापुराण
(४३-१९२
श्रुत्वा सर्वार्थवित्सवं सर्वार्थः प्रत्युवाच तम् । भूमिगोचरसम्बन्धः स नः प्रागपि विद्यते ॥ १९२ अपूर्वलाभः श्लाघ्यश्च विद्याधरसमाश्रयः । विचार्य तत्र कस्मै चियेयमिति निश्चितम् ॥ १९३ सुमतिस्तं निशम्याथं युक्तानामाहयुक्तवित् । न युक्तं वक्तुमप्येतत्सर्व वैरानुबन्धकृत् ॥ १९४ ।। कि भूमिगोचरेष्वस्या वरो नास्तीति चेतसि । चक्रिणोऽपि भवेत्किञ्चिद्वरस्यं प्रस्तुतश्रुतेः ॥१९५ दृष्टः सम्यगुपायोऽयं मयात्रकोऽविरोषकः । श्रुतः पूर्वपुराणेषु स्वयंवरविधिर्वरः ॥ १९६ संप्रत्यकम्पनोपक्रमं तदस्त्वायुगावधि । पुरुतत्पुत्रवत्सृष्टिख्यातिरस्यापि जायताम् ॥ १९७ दीयतां कृतपुण्याय कस्मैचित्कन्यका स्वयम् । वेधसा विप्रियं नोऽमा माभूद्भभुत्सु केनचित् ॥ १९८ इत्येवमुक्तं तत्सर्वैः सम्मतं सह भभुजा । न हि मत्सरिणः सन्तो न्यायमार्गानसारिणः ॥ १९९ तान्सम्पूज्य विसाभूभूभृत्सत्कार्यतत्परः । स्वयमेव गृहं गत्वा सर्व तत्संविधानकम् ॥ २०० निवेद्य सुप्रभायाश्च दृष्टो हेमाङगदस्य च । वृद्धः कुलमायातैरालोच्य च सनाभिभिः ॥ २०१ अकेषां निसृष्टान्मितार्थानपरानपि । परेषां प्राभूतान्तःस्थपत्रशासनहारिणः ॥ २०२ सदानमानैः सम्पूज्य निवेद्यतत्प्रयोजनम् । समानेतुं महीपालान्सर्वदिक्कं समादिशत् ॥ २०३
हे सिद्धार्थाचे सर्व भाषण ऐकून नंतर सर्वार्थमंत्री असे म्हणाला-हे प्रभो, भूमिगोचरी राजाशी हा विवाहसंबन्ध पूर्वीपासून आहेच पण विद्याधरसम्बंधाचा आश्रय करणे योग्य आहे कारण तो अपूर्वलाभ आहे व प्रशंसनीय आहे म्हणून याचा विचार करावा व विद्याधरापैकी कोणा तरी वराला निश्चित करून या कन्येचे दान आपण करावे ।। १९२-१९३ ॥
यानंतर तेथे बसलेल्या विद्वानांचा अभिप्राय जाणून सुमति मंत्र्याने असे म्हटले. वर जे मंत्र्याने भाषण केले अर्थात् योग्य विद्याधर वराला आपली कन्या द्यावी हे म्हणणे योग्य नाही कारण ते वैराच्या संबंधाला कारण होईल. काय भूमिगोचरी राजामध्ये हिला योग्य वर मिळाला नसता असा प्रश्न चक्रवर्तीला मनात उत्पन्न होऊन त्यालाही हे कार्य आवडले नसते स्याच्या मनात आपणाविषयी विरस अप्रीति उत्पन्न होईल. प्रस्तुत विवाहवार्ता ऐकून चक्रवर्तीचे मनही आपल्याविषयी अप्रीतियुक्त होईल ॥ १९४-१९५ ॥
मी याविषयी एक अविरोधक उत्तम उपाय पाहिला आहे तो मी तुम्हाला सांगतो. पूर्वी पुराणामध्ये स्वयंवरविधि श्रेष्ठ म्हणून ऐकला आहे. आता तो अकम्पन महाराजाकडून चालू केला जावा व तो युगाच्या अन्तापर्यन्त राहो आणि भगवान वृषभनाथ व त्यांचा पुत्र भरत यांच्या सृष्टीची ज्याप्रमाणे पुरुसृष्टि, भरतसृष्टि म्हणून प्रसिद्धि झाली तशी या स्वयंवराची सृष्टिही प्रसिद्ध होवो. म्हणून या कन्येने आपण होऊनच आपले दान एखाद्या पुण्यवान् राजपुत्राला करावे म्हणजे हिचा पति निश्चित करणाऱ्या ब्रह्मदेवाशीही आमचा विरोध होणार नाही व राजसमूहामध्ये देखिल कोणाशी विरोध होणार नाही. याप्रमाणे सुमतिमंत्र्याने भाषण केले व ते राजासह सर्वाना पसन्त पडले. बरोबरच आहे की, न्यायमार्गाला अनुसरणारे जे सज्जन असतात ते मत्सरस्वभावाचे नसतात ॥ १९६-१९९ ॥
अकम्पन राजाने त्या मंत्र्यांचा सत्कार करून त्याना पाठवून दिले. नंतर तो या स्वयंवराच्या सत्कार्यात तत्पर झाला. स्वतः तो घरी गेला व ती सर्व हकीकत त्याने सुप्रभाराणीला व हेमाङ्गदनामक वडील मुलाला त्याने हर्षाने कळ विली व आपल्या कुलक्रमाला
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org