Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-१९१)
महापुराण
(५३१
तां विलोक्य महीपालो बालामापूर्णयौवनाम् । निविकारां सचिन्तः सन् तस्याः परिणयोत्सवे ॥१८० शुभे श्रुतार्थसिद्धार्थसर्वार्थसुमतिश्रुतीन् । कोष्ठादिमतिभेदान्वा दिने व्याहूय मन्त्रिणः ॥ १८१ वण्वते सर्वभूपालाः कन्यां नः कुलजीवितम् । ब्रूत कस्मै प्रदास्यामो विमृश्यमा सुलोचनाम् ॥ १८२ इत्यप्राक्षीत्तदा प्राह श्रुतार्थः श्रुतसागरः । अत्र सद्वन्धुसम्बन्धो जामातात्र महान्वयः ॥ १८३ सर्वस्वस्थव्ययोऽत्राथ जन्मराज्यफलं चनः । ततः सञ्चिन्त्यमेवैतत्कायं नयविशारदैः ॥ १८४ बन्धवः स्युनपाः सर्वे सम्बन्धश्चक्रवतिना । इक्ष्वाकुवंशवत्पूज्यो भवद्वंशश्च जायते ॥ १८५ कुलरूपवयोविद्यावृत्तश्रीपौरुषादिकम् । यद्वरेषु समन्वेष्यं सर्व तत्तत्र पिण्डितम् ॥ १८६ ततो नास्त्यत्र नश्चच्यं दिगन्तव्याप्तकीर्तये । जितार्कमतये देया कन्यषेत्यर्ककीर्तये ॥ १८७ सिद्धार्थोऽत्राह तत्सर्वमस्तु किञ्च पुराविदः । कनीयसोऽपि सम्बन्धं नेच्छन्ति ज्यायसा सह ॥१८८ ततः प्रतीतभूपालपुत्रा वरगुणान्विताः। प्रभञ्जनो रथवरो बालवज्रायुधाह्वयः ॥ १८९ मेघस्वरो भीमभुजस्तथान्येऽप्युदितोदिताः । कृतिनो बहवःसन्ति तेषु यत्राशयोत्सवः ॥ १९० शिष्टान्पृष्ट्वा च दैवज्ञानिरीक्ष्य शकुनानि च । सहितः समसम्बन्धस्तस्मै कन्येति दीयताम् ॥१९१
जिच्या ठिकाणी पूर्णयौवन उत्पन्न झाले आहे अशा त्या निर्विकार सुलोचना कन्येला पाहून तो अकम्पन राजा तिच्या विवाहोत्सवाची मनात चिन्ता करू लागला ॥ १८० ॥
कोष्ठबुद्धि, बीजबुद्धि आदि महद्धिधारी मुनीप्रमाणे विद्वान अशा श्रुतार्थ, सिद्धार्थ, सर्वार्थ आणि सुमति अशा विद्वान चार मंत्र्याना शुभदिवशी राजाने बोलाविले ।। १८१ ॥
ही आमची सुलोचना कन्या आमच्या कुलाचा जणु प्राण आहे, तिला वरण्याची सर्व राजे इच्छा करतात. हे मंत्र्यानो, आपण ही कोणाला द्यावी याविषयी विचार करून मला सांगा. असे विचारल्यावर ज्ञानसमुद्र असा श्रुतार्थ मन्त्री याप्रमाणे बोलू लागला. या विवाहात चांगल्या व्याह्याशी सम्बन्ध येणार, जावई मोठ्या वंशाचा कुलशीलवान् पाहिजे, आपल्या धनाचा देखिल पुष्कळ खर्च होईल. आपल्या जन्माचे व राज्य प्राप्तीचेही फल आपणास प्राप्त होईल. म्हणून नयनिपुण अशा आपणाकडून या कार्याचा चांगला विचार व्हावा ॥१८२-१८३॥
सर्व राजे आपले बन्धु हितकर्ते होतील व चक्रवर्ती भरताबरोबर या विवाहात सम्बन्ध होईल व त्यामुळे इक्ष्वाकुवंशाप्रमाणे आपला वंश पूज्य होईल. वरामध्ये कुल, रूप, वय, विद्या, सदाचार, सम्पत्ति, पौरुष आदिक ज्या गोष्टी असावयास पाहिजेत त्या सर्व वरात एकत्र झाल्या आहेत. म्हणून येथे काही चिन्ता करण्यासारखे नाही. भरतचक्रवर्तीचा मुलगा अर्ककीर्ति आहे व त्याची कीति सर्व दिशात व्याप्त झाली आहे त्याने सूर्यालाही जिंकले आहे. अशा अर्ककीर्तीला ही कन्या द्यावी असे वाटते. याप्रमाणे श्रुतार्थ मंत्र्याने आपला अभिप्राय सांगितला ॥१८४-१८७॥
येथे सिद्धार्थ मंत्री असे म्हणाला- पूर्वीचे विद्वान् लोक असे म्हणत असत- अल्पयोग्यतेचे धारक लोक महान् योग्यतेच्या लोकाशी विवाह सम्बन्ध इच्छित नाहीत. यास्तव आपल्या माहितीचे जे राजपुत्र वराच्या गुणानी युक्त आहेत जसे प्रभञ्जन, रथबर, बलि, वज्रायुध, मेघस्वर, भीमभुज व अन्यही ज्यांचे ऐश्वर्य वाढत्याप्रमाणाचे आहे असे जे पुण्यवान् राजपुत्र आहेत त्यापैकी, ज्याच्याबरोबर विवाह सुलोचनेचा व्हावा असे आपणास वाटते त्याच्याशी हा विवाहसंबन्ध करावा. याविषयी अनुभवी लोकांचा विचार ऐकावा. ज्योतिषी विद्वानाना विचारावे. शकुने पहावीत व हितकर असा समानसंबन्ध पाहून त्याला आपली कन्या द्यावी ॥ १८८-१९१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org