Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५३०)
महापुराण
(४३-१७१
शनैर्बालेन्दुरेखेव सा कलाभिरवर्द्धत । वृद्धास्तस्याः प्रवृद्धाया विधुभास्पचिनो गुणाः ॥ १७१ इति सम्पूर्णसर्वाङगशोभां शुद्धान्ववायजाम् । स्मरो जयभयाद्वैतां न तवाप्यकरोत्करे ॥ १७२ कारयन्ती जिनेन्द्रा_श्चित्रा मणिमयीबहूः । तासां हिरण्मयान्येव विश्वोपकरणान्यपि ॥ १७३ तत्प्रतिष्ठाभिषेकान्ते महापूजाः प्रकुर्वती । मुहुस्स्तुतिभिरर्थ्याभिः स्तुवती भक्तितोऽर्हतः ॥ १७४ ददती पात्रदानानि मानयन्ती महामुनीन् । शृण्वती धर्ममाकर्ण्य भावयन्ती मुहुर्मुहुः ॥ १७५ आप्तागमपदार्थांश्च प्राप्तसम्यक्त्वशुद्धिका । अथ फाल्गुननन्दीश्वरेऽसौ भक्त्या जिनेशिनाम् ॥१७६ विधायाष्टाह्निकी पूजामभ्यार्चा यथाविधि । कृतोपवासा तन्वडगी शेषान्दातुमुपागता ॥ १७७ नृपं सिंहासनासीनं सोऽप्युत्थाय कृताञ्जलिः । तद्दत्तशेषानादाय निधाय शिरसि स्वयम् ॥ १७८ उपवासपरिश्रान्ता पुत्रिके त्वं प्रयाहि ते । शरणं पारणाकाल इति कन्यां व्यसर्जयत् ॥ १७९
जशी बालचन्द्राची कोर हळूहळु आपल्या कलानी वाढत जाते त्याप्रमाणे ती आपल्या अवयवानी वाढू लागली. वाढलेल्या त्या सुलोचनेचे चन्द्राच्या कान्तीशी स्पर्धा करणारे गुणही वाढले ॥ १७१ ॥
याप्रमाणे तिच्या ठिकाणी सम्पूर्ण अंगाचे सौन्दर्य वाढले. ती निर्मल वंशामध्ये उत्पन्न झालेली होती. ही आपला पराजय करील या भयामुळे मदनाने आपल्या हाती त्याने तिला घेतले नाही. (तरुणी होऊनही तिला मदनबाधा झालेली नव्हती ) ॥ १७२ ॥
ती जिनेश्वराच्या रत्नखचित अनेक प्रतिमा करवीत असे व त्यांची सर्व उपकरणे छत्त्रत्रयादिक सोन्याचे करवीत असे ॥ १७३ ।।
त्या जिनप्रतिमांच्या प्रतिष्ठेनंतर महाभिषेकाचे वेळी ती महापूजन करीत असे व वारंवार भक्तीने अर्थानी भरलेल्या स्तुतीनी जिनेश्वराची ती स्तुति करीत असे ॥ १७४ ॥ .
ती सत्पात्राना दान देत असे आणि महामुनींचा आदरसत्कार करीत असे व धर्माचे स्वरूप ऐकून वारंवार त्याचे चिन्तन करीत असे ॥ १७५ ॥
सर्वज्ञ जिनेश्वर व त्यानी सांगितलेला आगम व जीवादिक पापपुण्यासह नऊ पदार्थ यांच्यावर तिने श्रद्धान ठेवून निर्मल सम्यग्दर्शन प्राप्त करून घेतले होते. यानन्तर फाल्गुन मासातल्या नन्दीश्वरपर्वात भक्तीने तिने आठ दिवसपर्यन्त नन्दीश्वरव्रताचे पूजन केले. विधिपूर्वक जिनेश्वरांचे पूजन केले व उपवास करून त्या कृशाङ्गीने शेषा देण्यासाठी आपल्या पित्याकडे प्रयाण केले ॥ १७६-१७७॥
तिचा पिता सिंहासनावरून उठला. त्याने हात जोडले व तिने दिलेल्या शेषाना त्याने घेतले व त्या त्याने आपल्या मस्तकावर ठेवल्या ॥ १७८ ॥
व हे पुत्रिके तू उपवासाने थकली आहेस. आता तू घरी जा व पारणे कर असे म्हणून त्याने तिला घरी पाठविले ।। १७९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org