Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५२८)
( ४३ - १५८
मृदवस्तनवः स्निग्धाः कृष्णास्तस्याः सुकुञ्चिताः । कामिनां केवलं कालबालव्यालाः शिरोरुहाः ॥ भाति तस्याः पुरोभागो भूषितो नयनादिभिः । सुरूप इव पाश्चात्यो बाभाति स्वयमेव सः ॥ १५९. ये तस्यास्तनुनिर्माणे वेधसा साधनीकृताः । अणवस्तृणवच्छेषास्त एव परमाणवः ॥ १६० अतिवृद्धः क्षयासन्नः स्पष्टलक्ष्माहिगोचरः । पूर्णः शेषोऽप्यसम्पूर्णो न तद्ववक्त्रोपमो विषुः ।। १६१ न पश्चान्न पुरा लक्ष्मीर्बोधी पद्मे क्षणे क्षणे । वक्त्यन्यां गृह्णतीं शोभां सा स्याद्वादं तदानने ॥ १६२ चन्द्रे तीव्रकरोत्सना पद्मे शीतकराहता । लक्ष्मीः सान्येव तद्वक्त्रे जयलक्ष्मीकरग्रहात् ॥ १६३
महापुराण
तिचे मस्तकावरचे केश मृदु, बारीक, तुळतुळित काळे व कुरळे होते. ते कामी लोकाना केवळ काळया सापाच्या पिलाप्रमाणे वाटत असत. ते पाहून त्याना कामज्वर येत असे ।। १५८ ।।
तिच्या शरीराचा पुढचा भाग डोळे, नाक वगैरे अवयानी सुशोभित झाला होता पण पाठीचा भाग एखाद्या सुंदर वस्तुप्रमाणे स्वाभाविकच आपोआप अतिशय शोभत होता ।। १५९ ।।
तिच्या शरीराला उत्पन्न करण्यासाठी ब्रह्मदेवाने जे परमाणु साधनरूपाने उपयोगात आणिले तेच परम उत्कृष्ट अणु-सूक्ष्म द्रव्ये या नांवाला धारण करणारे झाले व बाकीचे अणु गवताप्रमाणे तुच्छ होत - निःसार होत ॥ १६० ॥
पूर्ण चन्द्र हा अतिशय वृद्ध भासतो व तो क्षयकाळ ज्याच्याजवळ आला आहे असा भासतो. पूर्ण असताना त्याचा काळा डाग स्पष्ट दिसतो व तो राहूचा विषय होतो व शेष कलांचा चंद्र अपूर्ण असतो म्हणून तो त्या सुलोचनेच्या मुखासारखा नव्हता ।। १६१ ।।
जर कमलाची उपमा दिली जाईल तर तीही योग्य नाही. कारण कमलात विकसित होण्यापूर्वी शोभा नसते व विकसित झाल्यानंतर ती राहत नाही. कारण ती शोभा क्षणोक्षणी बदलत असते. परंतु सुलोचनेच्या मुखावरची लक्ष्मी एक विलक्षण शोभा धारण करीत होती. म्हणून ती स्याद्वादाचे रूप प्रकट करीत होती. तात्पर्य तिच्या मुखाची शोभा नेहमी एकरूप राहूनही क्षणोक्षणी विलक्षण शोभा धारण करीत असे. म्हणून कमलाच्या शोभेपेक्षा ती चांगली होती आणि याप्रमाणे स्याद्वादाचे स्वरूप प्रकट करीत होती. स्याद्वाद हा द्रव्यार्थिकनयाने एकरूप असूनही पर्यायार्थिकनयाने नवीन नवीन रूपाला प्रकट करतो त्याप्रमाणे तिच्या मुखाची शोभा द्रव्यार्थिकनयाने एकरूप असूनही प्रतिक्षणी विलक्षण शोभा धारण करून ती अनेक रूपाची होत असे ॥ १६२ ॥
चन्द्राची शोभा सूर्यापासून नष्ट होते व कमलाची शोभा चन्द्रापासून नष्ट होते. परंतु तिच्या मुखाची शोभा जयकुमाराच्या लक्ष्मीचा हस्तग्रहण करण्याने विलक्षणच झाली होती ॥ १६३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org