Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५२६)
महापुराण
(४३-१४३
काञ्चीस्थानं तदालोच्येवोरू स्थूले सुसङ्गते । कामगर्भगृहद्वारस्तम्भयष्टयाकृती कृते ॥ १४३ वेदिकेव मनोजस्य शिरो वा स्मरदन्तिनः । सानुर्वानङ्गशैलस्य शुशभेऽस्याः कटीतटम् ॥ १४४ कृत्वा कृशं भृशं मध्यं बद्धं भङ्गभयादिव । रज्जुभिस्तिसृभिर्धात्रा बलिभिर्गाढमाबभौ ॥ १४५ नाभिकूपप्रवृत्तास्या रसमार्गसमुद्गता । श्यामा शाद्वलमालेव रोमराजिय॑राजत ॥ १४६ भिन्नी युक्तौ मृदू स्तब्धावृष्णो सन्तापहारिणौ स्तनौ विरुद्धधर्माणौ स्याद्वादस्थितिमूहतुः ॥ १४७ सह वक्षोनिवासिन्या समाश्लिष्य जयः श्रिया। स्वीकृतौ यदि चेत्ताभ्यां वयेते तद्भुजौ कथम् ॥१४८ बीरलक्ष्मीपरिष्वक्तजयदक्षिणबाहुना । स वामेन परिष्वक्तस्तत्कण्ठस्तस्य कोपमा ॥ १४९ निःकूपो पेशलौ श्लक्ष्णौ तत्कपोलो दिलेसतुः । कान्तौ कलभदन्ताभौ जयवक्त्राब्जदर्पणौ ॥ १५०
त्या सुलोचनेचे कमरपट्टा घालण्याचे स्थान-कंबर जणु पाहून ब्रह्मदेवाने तिच्या मांड्या पुष्ट एकमेकीस चिकटलेल्या व मदनाच्या घराच्या दरवाजाच्या दोन खांबाच्या आकारासारख्या बनविल्या होत्या ॥ १४३ ।।
तिचे कटीतट-ढुंगण जणु मदनाचा बसण्याचा कट्टा किंवा मदनरूपी हत्तीचे जणु मस्तक की काय ? अथवा मदनरूपीपर्वताचा तट आहे की काय असे शोभत होते ॥ १४४ ॥
तिचा मध्यभाग अर्थात् कंबर ती ब्रह्मदेवाने अतिशय कृश अर्थात् बारीक बनविली व ती मोडेल या भयाने जणु पोटावर असलेल्या ज्या त्रिवळ्या हेच जणु जाड दोरखंड त्यांनी ती त्याने बांधली आहेत अशी शोभली ।। १४५ ।।
नाभिरूपी विहिरीतून निघालेली अशी या सुलोचनेच्या पोटावरील बारीक रोमपंक्ति अशी सुंदर दिसत होती की जणू ती पाण्याच्या मार्गापासून उगवलेली हिरवीगार व लहान गवताची तृणपंक्ति आहे अशी भासत होती ।। १४६ ।।
__या सुलोचनेचे दोन स्तन भिन्न असूनही एकमेकाशी संबद्ध झालेले होते. मोठे असल्यामुळे अन्योन्य मिळालेले होते. मृदुस्पर्शाने युक्त असूनही उन्नत व कठोर दृढ होते व गरम असूनही काम संताप नष्ट करणारे होते. अर्थात् विरुद्ध स्वभाव धारण करणारे असल्यामुळे स्याद्वादाच्या स्थितीला- स्वरूपाला त्यांनी धारण केले होते ॥ १४७ ॥
या सुलोचनेच्या दोनही बाहूंनी वक्षःस्थलावर निवास करणाऱ्या लक्ष्मीला आलिंगन देऊन जयकुमाराला स्वीकारले होते म्हणून त्यांचे वर्णन करणे कवीला कसे शक्य होईल बरे? ॥ १४८ ॥
___ या सुलोचनेचा कंठ वीरलक्ष्मीने सुशोभित अशा उजव्या व डाव्या हाताने जयकुमाराकडून आलिंगिला गेला असल्यामुळे त्याचे कोणत्या उपमेने वर्णन केले जाईल बरे ? ॥ १४९ ॥
___या सुलोचनेचे गाल ज्याना खळगी पडत नाही असे सुन्दर, स्निग्ध असे शोभत होते व ते हत्तीच्या दाताप्रमाणे कान्ति युक्त होते व ते जयकुमाराला मुख पाहण्यास दर्पणाप्रमाणे वाटत होते ।। १५० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org