Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-१५७)
महापुराण
बिम्बप्रवालादि नोपमेयमपीष्यते । अधरस्यातिदूरत्वाद्वर्णाकार रसादिभिः ॥ १५१ चिताः सिताः समाः स्निग्धाः वन्ताः कान्ताः प्रभान्विताः । अन्तः करोति तद्वक्त्रं तानेव कथमन्यथा ॥ कुतः कृता समुत्तुङ्गा स्वादमानास्यसौरभम् । मध्येवक्त्रं किमध्यास्ते न सती यदि नासिका ॥१५३ कर्णान्तगामिनी नेत्रे वृद्धे नरशरोपमे । सोमवंशस्य कः क्षेपः पद्मोत्पलजये तयोः ॥ १५४ तत्कर्णावेव कर्णेषु कृतपुण्यौ प्रियाज्ञया । तत्प्रेमालापगीतानां पात्रं प्रागेव तौ यतः ॥ १५५ तद्भूशरासनः कामस्तत्कटाक्षशरावलिः । स्वरूपेणाजितं मत्वा जयं मन्ये व्यजेष्ट सः ॥ १५६ तस्या लालाटिको नैकः कामो वीराग्रणीः स्वयम् । जयोऽपि नोन्नतिः कस्माल्ललाटस्य श्रितश्रियः ॥
(५२७
वडाचा नवीन अंकुर, तोंडले व कोवळे पान वगैरे वस्तु उपमा देण्याला योग्य आहेत तरी ही रंग, आकार आणि गोडी इत्यादिकानी तिचा अधरोष्ठ फारच अधिक असल्यामुळे वरील वस्तूंची उपमा देण्यात उपयुक्तता वाटत नाही ॥ १५१ ॥
ज्यात अन्तर नाही असे व शुभ्र व सम लांबी-रुंदीचे, स्निग्ध-गुळगुळित, सुंदर व प्रभा - कान्तियुक्त चमचमणारे असे तिचे दात होते व असे ते असल्यामुळे तिच्या मुखाने त्यानाच आपल्या आत स्थान दिले. ते तसे नसते तर त्याने त्याना स्थान दिले नसते ।। १५२ ।।
मुखातील सुगन्ध अनुभवणारे व उंच असलेले तिचे नाक जर चांगले नसले तर ते तिच्या मुखावर मध्यभागी राहिले नसते ।। १५३ ।।
अर्जुनाचे बाण जसे त्याचा शत्रु जो कर्ण तेथपर्यन्त पोहोचतात तसे तिचे नेत्र कर्णान्तगामी - कानापर्यंत पोहोचलेले होते व ते वृद्ध-विशाल होते व त्या तिच्या दोन नेत्रांनी दिनविकासि पद्म-कमलाला व रात्रविकासि उत्पलाला - नीलकमलाला जिंकले होते. म्हणून आता चन्द्रवंशावर कोणता आक्षेप करणे बाकी राहिले होते बरे ? अर्थात् सोमप्रभ वंशात उत्पन्न झालेल्या जयकुमारावर कटाक्ष फेकण्याचे कार्य बाकी राहिले होते ॥ १५४ ॥
या सुलोचनेचेच दोन कान जगातील सर्व कानापेक्षा पुण्यवान् होते. कारण तिचा प्रिय जो जयकुमार त्याच्या आज्ञेने त्याने जी तिच्या सुलोचनेसंबंधी केलेली जी प्रिय भाषणे तो ज्यात गोवलेली आहेत अशी गाणी ऐकण्यास ते पूर्वीच पात्र झालेले, योग्य झालेले होते ॥ १५५ ॥
आपल्या सौन्दर्याने आपण जयकुमाराचा पराभव करू शकलो नाही असे मदनाला वाटले म्हणून सुलोचनेच्या भुवया हेच ज्याचे धनुष्य आहे व तिचे कटाक्ष हेच ज्याची बाणपंक्ति आहे अशा मदनाने त्या जयकुमाराला जिंकले असे वाटते ।। १५६ ॥
Jain Education International
तिच्या ललाटाकडे-कपाळाकडे पाहून तिच्या मनातील अभिप्राय ओळखणारा दास-नोकर फक्त एकटा मदनच होता असे नाही तर सर्व वीरपुरुषात श्रेष्ठ असलेला स्वतः जयकुमारही तिचा दास होता. यावरून सौन्दर्याचा आश्रय ज्याने केला आहे अशा तिच्या कपाळाची उन्नतिउंचपणा किंवा विशालपणा का बरे असू नये. अर्थात् तिचे कपाळ विस्तृत होते ।। १५७ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org