________________
५३८)
महापुराण
(४३-२४७
रञ्जिताञ्जनसन्नेत्रा मालाभारिशिरोरुहा । संस्कृतभूलतोपेता सविशेषललाटिका ॥ २४७ मणिकुण्डलभारेण प्रलम्बश्रवणोज्ज्वला । सचित्रकरविन्यस्तपत्रचित्रकपोतिका ॥ २४८ ताम्बूलरससंसर्गाद्विगुणारुणिताधरा । मुक्ताभरणभाभारभासिबन्धुरकण्ठिका ॥ २४९ सच्चन्दनरसस्फारहारवक्षःकुचाञ्चिता । महामणिमयूरवाभाभास्दद्भुजलतातता ॥ २५० रशनारज्जुविभ्राजिसुविशालकटीतटी। मणिनू पुरनिर्घोषभत्सिताब्जक्रमाब्जिका ।। २५१ जितामरपुरीशोभा सौन्दर्यात्सा पुरी तदा । प्रसाधनमयं कायमषिताचिन्त्यवैभवम् ।। २५२ उत्सवो राजगेहस्य नगरेणैव वणितः । अगाधो यदि पर्यन्तो मध्यमब्धौ किमुच्यते ॥ २५३
--------........................................
या नगरीच्या स्त्रियांनी आपल्या डोळ्यात उत्तम अंजन घातले होते. आणि आपल्या मस्तकावरील केशात स्त्रियानी फुलांच्या माळा धारण केल्या होत्या व भुवयांनी व कुंकुमतिलकाने स्त्रियांचा भालप्रदेश शोभत होता. अशा स्त्रियानी या नगरीला फार शोभा प्राप्त झाली होती ।। २४७ ॥
रत्नकुण्डलाच्या ओझ्याने थोडे लांब झालेल्या कानांनी त्या स्त्रिया उज्ज्वल दिसत होत्या. चित्रकाराकडून ज्यांच्या गालावर वेलबुट्टी काढलेली आहे अशा स्त्रियांनी त्या नगराला शोभा आलेली होती ॥ २४८ ॥
त्या नगरीतील स्त्रियांचे ओठ लाल होते पण तांबूल रसाच्या सेवनाने ते दुप्पट लाल झालेले होते. मोत्यांच्या अलंकारांच्या शुभ्र कान्तिसमूहानी त्या नगरस्त्रियांचे गळे फार सुन्दर दिसत होते ॥ २४९ ॥
त्यांनी आपल्या छातीला व स्तनांना उत्तम चन्दनाची उटी लाविली होती व त्यावर शुभ्र हार घातले होते. यामुळे त्यांचे स्तन व छाती फार शुभ्र वाटत असत. इन्द्रनील मण्याच्या किरणकान्तीनी त्यांच्या भुजलता शोभत होत्या ॥ २५० ।।
त्यांच्या कंबरेचे विशाल तट कमरपट्टयांच्या सुंदर साखळ्यानी फार शोभत होते. रत्नांच्या पैंजणाच्या आवाजानी त्यांचे दोन पदकमल कमलांची निंदा करीत होते. अर्थात् कमलापेक्षाही त्यांचे दोन पाय अधिक सुंदर होते ।। २५१ ॥
त्या वाराणसीनगरीने आपल्या सौंदर्याने स्वर्गनगरीचे सौंदर्य जिंकले होते. म्हणून त्या नगरीने आपले शरीर सर्वालंकारांनी पूर्ण व अचिंत्यवैभवानी युक्त असे धारण केले होते ॥ २५२ ॥
येथपर्यन्त सुलोचनेच्या विवाहोत्सवाविषयी नगरात केवढा मोठा उत्साह होता याचे वर्णन झाले. त्यावरून राजमंदिराच्या उत्सवाचे वर्णन आपोआपच झाले. समुद्राचा किनारा जर अगाध असेल तर समुद्राच्या मध्यभागाच्या अगाधतेचे वेगळे वर्णन करण्याची आवश्यकता कोठे राहिली ? अर्थात् राजवाड्यात विवाहाचा उत्सव अत्यंत मोठा होता ॥ २५३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org