________________
५४०)
महापुराण
(४३-२६३
कृतमङ्गलनेपथ्यां नीत्वा नित्यमनोहरम् । पूजयित्वाहतो भक्त्या सर्वकल्याणकारिणः ॥ २६३ सिद्धशेषां समादाय क्षिप्त्वा शिरसि साशिषम् । स्थिताः प्रतीक्ष्य सल्लग्नं तत्रावृत्याहितादरम् ॥ इतो महीशसन्देशान्नरखेचरनायकाः । स्वास्ते प्रसाधितान्कृत्वाप्रसाधनविदस्तदा ॥ २६५ निजोचितासनारूढाः प्ररूढश्रीसमुज्ज्वलाः । चलच्चामरसम्पत्त्या कात्या चामरसन्निभाः ॥२६६ कुमार्या निजितः कामः प्राक्स्वमेवं विकृत्य किम् । समागंस्त पुनर्जेतुमिति शङ्काविधायिनः ॥२६७ कञ्चिदेकं वृणीतेऽसाविति ज्ञात्वाप्यस्यवः । जेतुं सर्वेऽपि तां तस्थुराशा हि महती नृणाम् ॥ २६८ केरलोकठिनोत्तुङ्गकुचकोटिविलङ्घनम् । श्रमापनीतसामर्थ्यात्परिक्षीणपरिक्रमम् ॥ २६९ माद्यन्मलयमातङ्गकटकण्डूविनोदनात् । क्षतचन्दननिष्यन्दसान्द्रसौगन्ध्यबन्धुरम् ॥ २७०
___ यानंतर तिला मंगलवस्त्रे नेसविली व नित्यमनोहर जिनमंदिराकडे नेले. तेथे संपूर्ण कल्याणमय अशा जिनेश्वराचे भक्तीने पूजन केले. तिच्या मस्तकावर आशीर्वादपूर्वक सिद्ध शेषा दिल्या व आदराने कन्येला घेरून मुहूर्ताची वाट पाहत बसल्या ॥ २६३-२६४ ॥
त्यावेळी इकडे अकम्पनराजाचा संदेश आल्यानंतर भूगोचरीराजे व विद्याधर राजे स्वतःला कसे भूषित करावे हे जाणत असल्यामुळे स्वतःला त्यांनी भूषित केले व ते विवाहमण्डपात जाऊन आपणास योग्य अशा आसनावर बसले. उत्पन्न झालेल्या शोभेने ते उज्ज्वल दिसत होते. हालणाऱ्या चामरांच्या संपदेने व कान्तीने ते देवासारखे भासत होते ॥२६५-२६६।।
या सुलोचनाकुमारीने मला पूर्वी जिंकले होते पण मी आता तिला जिंकीन असा विचार करून जणु तो काम पुनः तिला जिंकावयाला अनेक राजांच्या रूपाने आला आहे अशी शंका त्या राजानी लोकांच्या मनात उत्पन्न केली ॥ २६७ ।।
ही कोणा तरी एका राजाला वरील असे जाणूनही अहंकाराने तिला जिंकण्यासाठी ते सर्व राजे तेथे आले. बरोबरच आहे की, मनुष्यांना फार मोठी आशा असते ॥ २६८॥
केरळ देशातील स्त्रियांच्या कठिण व उन्नतस्तनांच्या अग्रभागाना उल्लंघून येण्याने जो श्रम झाला त्यामुळे सामर्थ्य कमी होऊन ज्यांचे गमन मंद झाले आहे असे व माजलेले जे मलयपर्वतावरील हस्ती त्यांनी गण्डस्थलात उत्पन्न झालेल्या खाजेचे शमन करण्यासाठी मोडलेल्या चन्दनवृक्षापासून निघालेला जो रस त्याच्या दाट सुगंधाने जो मनोहर दिसत आहे; कावेरीनदीत उत्पन्न झालेल्या कमळांच्या भक्षणामुळे आनंदित झालेल्या पक्ष्यानी जी त्या नदीत यथेच्छ क्रीडा केली तेव्हां वर उडालेले जे पाण्याचे स्थूल कण तेच ज्याचे मोत्यांचे भूषण आहे असा, जो विरहरूपी तीक्ष्ण अग्नीला भडकवीत आहे, आणि कोकिळ व भुंगे यांच्या मधुर शब्दांनी जो वाचाल झाला आहे अशा दक्षिण दिशेच्या वाऱ्याला अनुकूल करणारा असा, स्त्रियांच्या मद्याच्या चुळींनी व पैंजणांच्या शब्दानी रमणीय व त्यांच्या डाव्या पायांच्या लाथांनी जो झाडाना देखिल अतिशय कामुक बनवित आहे, आपल्या डाव्या हाताने आपले पुष्पधनुष्य घेऊन व आपल्या उजव्या हाताने आम्रमंजरी घेऊन जो फिरवीत आहे, ज्याने आपल्या वसन्तरूपी सेवकाकडून सर्व फुलेरूपी शस्त्रे आणविली आहेत असा तो मदन सर्व
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org