Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
(५२९
रात्राविन्दुदिवाम्भोजं क्षयोन्दुग्र्लानि बारिजम् । पूर्णमेव विकास्येव तद्वक्त्रं भात्यर्हानशम् ॥ १६४ लक्ष्मीस्तस्येक्षितुस्तेन वीक्षितस्यापि निश्चिता । कि पद्मे तादृशं येन तद्वक्त्रमुपमीयते ॥ १६५ कुमार्या त्रिजगज्जेता जितः पुष्पशरासनः । स वीरः कः परो लोके यो न जय्योऽग्रतोऽनया ।। १६६ कुमार्यैव जितः कामो बीरः पश्चाज्जयो जितः । स्त्रीसृष्टिः कियती नाम विजयेऽस्याः सह श्रिया ॥ मृगाङकस्य कलङकोऽयं मन्येऽहं कन्ययानया । स्वकान्त्या निर्जितस्याभूद्रोगराजश्च चिन्तया ॥१६८ साधं कुवलयेनेन्दुः सह लक्ष्म्या सरोरुहम् । तद्वक्त्रेण जितं व्यक्तं किमन्यनेह जीयते ॥ १६९ जलाब्जं जलवासेन स्थलाब्जं सूर्यरश्मिभिः । प्राप्तुं तद्वक्त्रजां शोभां मन्येऽद्यापि तपस्यति ॥ १७०
४३-१७०)
महापुराण
रात्री चंद्र खूप सुंदर दिसतो व दिवसा कमळ फार शोभते. पण चन्द्राला कृष्णपक्षात क्षय असतो व कमल कान्तिहीन होऊन सुकून जाते. परन्तु या सुलोचनेचे मुखकमल रात्रंदिवस पूर्ण आणि विकासयुक्तच असते ।। १६४ ।।
सुलोचनेच्या मुखाला जो पाहतो त्याची शोभा वाढत असे व सुलोचनेचे मुख ज्याला पाहत असे त्याची शोभा देखिल निश्चित वाढत असे. पण कमलात काय असा गुण आहे ? म्हणून सुलोचनेच्या मुखाची उपमा कमलाला देता येत नाही ।। १६५ ।।
या कुमारीने त्रैलोक्याला जिंकणारा पुष्याचे धनुष्य ज्याचे आहे अशा मदनाला जिंकले होते. तेव्हा आता असा कोणी वीर राहिला आहे ज्याला ही पुढे तारुण्यावस्थेत जिंकील बरे ? अर्थात् आता सर्वं पृथ्वी निर्बीर झाली आहे. सर्वाना तिने जिंकले ॥ १६६ ॥
या सुलोचनेने कुमारी अवस्थेतच मदनाला जिंकले होते व यानंतर हिने तरुणावस्थेत जयकुमारालाही जिंकले होते. मग लक्ष्मीबरोबर सगळ्या स्त्रियांची सृष्टि जिंकण्याला कितीशी उरली होती ? अर्थात् हिने लक्ष्मी आदिक उत्तम स्त्रियानाही जिंकले होते ।। १६७ ।।
या कन्येने जेव्हा स्वतःच्या कान्तीने चन्द्राला जिंकले तेव्हा त्याच्या ठिकाणी कलंक उत्पन्न झाला व त्याच्या मनात चिन्ता उत्पन्न होऊन रोगांचा राजा क्षयरोगही त्याला जडला ।। १६८ ॥
या सुलोचनेच्या मुखाने रात्रिविकासी कमलाबरोबर चन्द्राला जिंकले आणि लक्ष्मीसह दिनविकासी कमलाला जिंकले. आता या कुमारीच्या मुखाने जे जिंकले नाही असे दुसरे काय राहिले आहे बरे ? ।। १६९ ।।
या सुलोचनेच्या मुखकमलाची शोभा प्राप्त करून घेण्यासाठी जलकमल पाण्यात राहून तपश्चरण अद्यापि करीत आहे व जे जमिनीवरचे कमळ आहे तेही सूर्याच्या किरणाना धारण करून अद्यापि तपश्चरण करीत आहे असे मला वाटते ॥ १७० ॥
म. ६७
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org