________________
५२४)
(४३-१२९
नहर्ता केवलं दाता न हन्ता पाति केवलम् । सर्वास्तत्पालयामास स धर्म विजयी प्रजाः ॥ १२९ परमात्म्ये पदे पूज्यो भरतेन यथा पुरुः । गृहाश्रमे तथा सोऽपि सा तस्य कुलवृद्धता ॥ १३० तस्यासीत्सुप्रभादेवी शीतांशोर्वा प्रभा तया । मुमुदे कुमादाबोधं विदधत्सकलाश्रयः ।। १३१ न लक्ष्मीरपि तत्प्रीत्यै सती सा सुप्रजा यथा । सत्फला इव सद्वल्ल्यः पुत्रवत्यः स्त्रियः प्रियाः ॥ तस्यां तन्नाथवंशाग्रगण्यस्येवांशवो रवेः । प्राच्यां दीप्त्याप्तदिक्चक्राः सहस्रमभवत्सुताः ॥ १३३ हेमाङ्गदसुकेतुश्री सुकान्ताद्याह्वयैः स तैः । वेष्टितः संव्यदीपिष्ट शक्रः सामानिकैरिव ।। १३४ हिमवत्पद्ययोर्गङ्गासिन्धू इव ततस्तयोः । सुते सुलोचना लक्ष्मीमती चास्तां सुलक्षणे ।। १३५ सुलोचनासौ बालेव लक्ष्मीः सर्वमनोरमा । कलागुणैरभासिष्ट चन्द्रिकेव प्रवद्धता ॥ १३६
महापुराण
तो राजा फक्त प्रजेपासून कर वसूल करीत होता असे नाही तर तिला तो देतही होता. तो प्रजेला केवळ शिक्षाच करीत होता असे नाही तर तिचे रक्षणही करीत होता. - याप्रमाणे धर्माने विजय मिळविणारा तो राजा आपल्या सर्व प्रजांचे पालन करीत असे ॥ १२९ ॥ परमात्मपदात मुक्तिमार्गात श्री आदिभगवंत जसे भरत राजाकडून पूजिले जात असत तसे गृहस्थाश्रमात हा अकंपन राजा भरताकडून पूज्य मानला जात असे. ही त्याची अकम्पनराजाची कुलवृद्धता होती अर्थात् कुलामुळे या राजाला वडीलपणा प्राप्त झाला होता ॥ १३० ॥
चंद्राची जशी प्रभा तशी त्या अकम्पनराजाची सुप्रभा नामक राणी होती व कुमुदाबोध-कमलांना प्रफुल्ल करणारा आणि कलाश्रय सोळा कलांचा आधार अशा चंद्राप्रमाणे कुमुदाबोध - पृथ्वीवर मुदाआनंद व बोघ ज्ञान यांची वृद्धि करणारा तो राजा तिच्यासह सुप्रभा राणीबरोबर आनंद पावत असे ।। १३१ ॥
सुप्रजा - जिला चांगले पुत्र व कन्या झाले आहेत अशी ती सुप्रभा राणी राजाला फार आवडत असे पण लक्ष्मी देखिल त्याला तितकी आवडत नव्हती. ज्यांना चांगली फळे येतात अशा वेली जशा लोकप्रिय होतात तशा पुत्रवती स्त्रिया पतिप्रिय होतात ॥ १३२ ॥
जसे पूर्वदिशेत आपल्या तेजांच्या द्वारे संपूर्ण दिशाना प्रकाशित करणारे किरण सूर्यापासून उत्पन्न होतात तसे त्या सुप्रभाराणीमध्ये नाथवंशाचा अग्रणी अशा अकम्पन राजापासून हजार सुपुत्र उत्पन्न झाले ॥ १३३ ॥
जसा सामानिक देवांनी वेष्टिलेला इन्द्र शोभतो तसा तो अकम्पन राजा हेमाङगद, सुकेतु, श्रीकान्त इत्यादि नांवाच्या पुत्रानी शोभत होता ।। १३४ ॥
हिमवान् पर्वत व पद्मसरोवर या दोघांच्या संबन्धापासून जशा गंगा आणि सिन्धू या दोन नद्या उत्पन्न झाल्या तशा या अकंपन राजा व सुप्रभा राणीला सुलक्षणी अशा सुलोचना व लक्ष्मीमती नांवाच्या दोन कन्या झाल्या ।। १३५ ।।
ही सुलोचना कन्या बाललक्ष्मीप्रमाणे सर्व जनांच्या मनाला आनंदित करणारी होती. कलागुणांनी वाढविलेल्या चंद्राच्या कान्तीप्रमाणे सद्गुणानी वृद्धिंगत केलेली अशी अतिशय शोभत होती ।। १३६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org