Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५२२)
महापुराण
(४३-११४
आर्याणामपि वाग्भूयो विचार्या कार्यवेदिभिः। वायाः किं पुनर्नार्याः कामिनां का विचारणा॥११४ भवेऽस्मिन्नेव भव्योऽयं भविष्यति भवान्तकः । तन्नास्य भयमन्येभ्यो भयमेतद्धयैषिणाम् ॥ ११५ अहं कुतः कुतो धर्मः संसर्गादस्य सोऽप्यभूत् । ममेह मुक्तिपर्यन्तो नान्यत्सत्सङगमाद्धितम् ॥ ११६ इत्यनुध्याय निःकोपः कृतवेदी जयं स्वयम् । रत्नरनयॆः सम्पूज्य स्वप्रपञ्चं निगद्य च ॥११७ मां स्वकार्ये स्मरेत्यक्त्वा स्वावासं प्रत्यसौ गतः। हन्ताजितपुण्यानां भवत्यभ्यदयावहः॥ ११८ स चक्रेण सहाक्रम्य दिक्चक्रं व्यक्तविक्रमः। क्रमान्नियम्य व्यायाम संयमीव शमं श्रितः ॥ ११९ ज्वलत्प्रतापः सौम्योऽपि निर्गुणोऽपि गुणाकरः । सुसर्वाङ्गोऽप्यनङ्गाभः सुखेन स्वपुरे स्थितः ॥१२०
जे आर्य आहेत त्यांच्या देखिल भाषणाचा कार्यज्ञ लोकांनी विचार केला पाहिजे. मग जी त्याज्य आहे अशा स्त्रीच्या भाषणाचा विचार केला पाहिजे हे सांगायलाच नको. पण कामी पुरुषाला एवढा विचार कोठून असणार ? ॥ ११४ ॥
हा जयकुमार राजा भव्य आहे व याच भवात तो संसाराचा नाश करून मुक्त होणारा आहे. म्हणून याला इतरापासून भय नाही पण याला भय उत्पन्न करावे अशी इच्छा करणायांना मात्र भय उत्पन्न होईल ॥ ११५ ॥
मी कोठे व धर्म कोठे पण मला याच्या संगतीपासून त्या धर्माची प्राप्ति झाली व हा धर्म निश्चयाने मुक्ति प्राप्त करून देणारा आहे. बरोबर आहे की, सज्जनांच्या संगमापासून हितच होते, अहित केव्हांच होत नाही ॥ ११६ ॥
__ असा विचार करून तो कृतज्ञ नागकुमार कोपरहित झाला व त्याने जयकुमाराचा अमूल्य अशी रत्ने भेट देऊन आदर केला. मी आपणास मारण्यासाठी आलो होतो. ही सर्व हकीकत त्याने त्याला सांगितली आणि तुझ्या एकाद्या कार्याविषयी माझे स्मरण कर असे त्याने त्याला सांगितले. तो आपल्या स्थानी निघून गेला. ज्यांच्याजवळ अत्युत्कृष्ट पुण्य आहे अशांना मारण्यास आलेली व्यक्ति त्यांच्या कल्याणाला कारण होते ॥ ११८-११७ ॥
इकडे जयकुमाराने चक्ररत्न बरोबर घेऊन सर्व दिशांचे त्याने उल्लंघन केले अर्थात् सर्व दिशा त्याने जिंकल्या व आपला पराक्रम त्याने प्रकट केला. यानंतर ते सर्व दिशाचे आक्रमण त्याने बंद केले व संयमीप्रमाणे तो शान्त झाला ॥ ११९ ॥
हा जयकुमार सौम्य असून देखिल जळजळित पराक्रमी होता व निर्गुण असूनही गुणांचा समूह धारण करीत होता. गुणवान् असूनही निर्गुण होता याचा परिहार- तो जयकुमार दिग्विजय करण्यात चक्राला सहायक झाला म्हणून निर्गुण होता पण स्वतः अनेक गुणांचा साठा होता. सुसर्वाङग असूनही तो अनंगाभ होता हे म्हणणे विरुद्ध आहे. पण परिहार असा- त्याची सर्व अंगे सुंदर होती व अनङगाभ-मदनाप्रमाणे सुंदर होता असा तो जयकुमार राजा सुखाने आपल्या नगरात राहिला ॥ १२० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org