Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-११३)
महापुराण
(५२१
तासां किमुच्यते कोपः प्रसादोऽपि भयंकरः। हन्त्यधीरान्प्रविश्यान्तरगाधसरितां यथा ॥ १०६ जालकरिन्द्रजालेन वञ्च्या ग्राम्या हि मायया।ताभिः सेन्द्रो गुरुर्वञ्च्यस्तन्मायामातरः स्त्रियः॥१०७ ताः श्रयन्ते गुणा नैव नाशभीत्या यदि श्रिताः। तिष्ठन्ति न चिरं प्रान्ते नश्यन्त्यपि च ते स्थिताः॥ दोषाः किं तन्मयास्तासु दोषाणां कि समद्भवः । तासां दोषेभ्य इत्यत्र न कस्यापि विनिश्चयः ॥१०९ निर्गुणान्गुणिनो मन्तुं गुणिनः खलु निर्गुणान् । नाशकत्परमात्मापि मन्यन्ते ता हि हेलया ॥ ११० मोक्षो गुणमयो नित्यो दोषवत्यः स्त्रियश्चलाः । तासां नेच्छन्ति निर्वाणमत एवाप्तसूक्तिषु ॥१११ लक्ष्मीः सरस्वती कोतिर्मुक्तिस्त्वमिति विश्रुताः। दुर्लभास्तासु वल्लीषु कल्पवल्ल्य इव प्रिये ॥११२ इत्येतच्चाह तच्छ्रुत्वा तं जिघांसुरहिस्तदा। पापिना चिन्तितं पापं मया पापापलापतः ॥ ११३
..................
अगाधनद्यांचे स्वच्छ किंवा गढूळ पाणी भितया मनुष्याला बुडवून मारते तसे त्यांचा कोपच भयंकर असतो असे नाही तर त्यांची प्रसन्नता देखिल भयंकर असते व हे दोन्हीही मनुष्याचा घात करितात ।। १०६ ॥
जे फसविणारे गारुडी असतात ते आपल्या गारुडीविद्येने ग्राम्य-अडाणी लोकांना फसवितात. पण स्त्रियांनी आपल्या मायेने इन्द्रासहित बृहस्पतीलाही फसविले आहे म्हणून स्त्रिया ह्या फसविणाऱ्या मायेच्या माता आहेत ।। १०७ ॥
सद्गुण स्त्रियांचा आश्रय करीत नाहीत. आम्ही कोणाचा आश्रय केला नाही तर नष्ट होऊ या भीतीने जर स्त्रियांचा त्यांनी आश्रय केला तर ते फार वेळ राहत नाहीत व आश्रय घेऊन शेवटी नाश पावतातच ॥ १०८ ॥
काय दोष हे स्त्रीरूपाने उत्पन्न झाले आहेत? किंवा दोष त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाले आहेत? किंवा त्यांची दोषापासून उत्पत्ति झाली आहे ? या विषयी कोणाचाच कांही निर्णय झालेला नाही ॥ १०९ ॥
गुणरहित मनुष्याला गुणी मानणे व गुणयुक्ताला निर्गुण मानणे ही गोष्ट परमेश्वरालाही शक्य नाही. पण स्त्रिया मात्र तसे सहज मानतात ।। ११० ॥
मोक्ष गुणांनी भरलेला आहे व नित्य आहे व स्त्रिया दोषांनी भरलेल्या आणि चंचल आहेत. म्हणून त्यांना सर्वज्ञाच्या आगमात मोक्ष सांगितला नाही ॥ १११ ।।
हे प्रिये ! लक्ष्मी, सरस्वती, कीर्ति, मुक्ति आणि तू (श्रीमति राणी) या सर्व प्रसिद्ध स्त्रिया वेलीमध्ये कल्पवल्ली जशी दुर्लभ असते तशा तुम्ही चौघीजणी सर्व स्त्रियात दुर्लभ आहात ॥ ११२ ॥
___ या प्रकारे जयकुमाराने भाषण केले. व ते ऐकून त्याला मारण्याची इच्छा करणारा नाग मी पाप्याने पापी स्त्रीच्या भाषणावरून ही पाप उत्पन्न करणारी गोष्ट मनात आणिली हे अयोग्य झाले असे चिन्तन करू लागला असे म्हणाला- ॥ ११३ ॥
म.६६
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org