Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५२० )
महापुराण
सञ्जातानुशया सापि धृत्वा धर्मं हृदि स्थिरम् । भूत्वा प्रिया स्वनागस्य राज्ञा स्वमृतिमब्रवीत् ॥९६ नागामरोऽपि तां पश्यन्कोपादेवममन्यत । दर्पात्तेनखलेनेषा वराकी हा हता वृथा ॥ ९७ विधवेति विवेदाधीनेदृक्षं मामिमं धवम् । तत्प्राणान्न हरे यावद्भुजङ्गः केन वास्म्यहम् ॥ ९८ इत्यतोऽसौ दिदंस्तं जयं तद्गृहमासदत् । न सहन्ते ननु स्त्रीणां तिर्यञ्चोऽपि पराभवम् ॥ ९९ वासगेहे जयो रात्रौ श्रीमत्याः कौतुकं प्रिये । शृण्वेकं दृष्टमित्याख्यत्तद्भुजङ्गीविचेष्टितम् ॥ १०० आभिजात्यं वयो रूपं विद्यां वृत्तं यशः श्रियम् । विभुत्वं विक्रमं कान्तिमैहिकं पारलौकिकम् ॥ १०१ प्रीतिमप्रीतिमादेयमनादेयं कृपां त्रपाम् । हानिं वृद्धि गुणान्दोषान् गणयन्ति न योषितः ॥ १०२ धर्मः कामश्च सञ्चयो वित्तेनायं तु सत्पथः । क्रीणन्त्यर्थं स्त्रियस्ताभ्यां धिक्तासां वृद्धगृध्नुताम् ॥ वृश्चिकस्य विषं पश्चात्पन्नगस्य विषं पुरः । योषितां दूषितेच्छानां विश्वतो विषमं विषम् ॥ १०४ सत्याभासैर्न तैः स्त्रीणां वञ्चिता ये न धीधनाः । दुःश्रुतीनामिवैताभ्यो मुक्तास्ते मुक्तिवल्लभाः ॥ १०५
(४३-९६
जिला आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप झाला आहे अशी ती नागीण देखिल आपल्या मनात धर्माला स्थिर धारण करून मरण पावली व आपल्या नागाची ती प्रिया झाली. व त्याला तिने राजाने मला ठार मारले असे सांगितले ।। ९६ ।।
तिला पाहून त्या नागदेवाने देखिल कोपाने असा विचार केला ' अरेरे त्या दुष्ट राजाने त्या गरीब नागिणीला उन्मत्तपणाने व्यर्थ मारले.' मी हिचा देवजातीचा समर्थ पति असताही त्या मूर्खाने हिला विधवा मानले काय ? बरे मी त्याचे जोपर्यन्त प्राणहरण करणार नाही तोपर्यन्त मी स्वतःला सर्प समजणार नाही ।। ९७-९८ ।।
याप्रमाणे विचार करून त्या जयकुमारास दंश करण्याच्या इच्छेने त्याच्या घरी आला. बरोबर आहे की तिर्यंच देखिल आपल्या स्त्रीचा अपमान कोणी केल्यास तो सहन करीत नाहीत ॥ ९९ ॥
तो जयकुमार देखिल रात्री आपल्या शयनगृहात श्रीमती नावाच्या आपल्या स्त्रीला असे म्हणाला हे प्रिये मी एक कौतुकाची गोष्ट पाहिली ती तुला सांगतो ऐक असे म्हणून त्याने त्या नागिणीचे चरित्र तिला सांगितले ।। १०० ।।
उत्तम कुल, वय, रूप, विद्या, आचार, यश, सम्पत्ति, प्रभुत्व-अधिकार, पराक्रम, तेज, ऐहिक व पारलौकिक, प्रीति व अप्रीति, संग्राह्य व त्याज्य, दया धर्म आणि काम या दोहोंचा संचय धनाने करावा हा सन्मार्ग आहे पण या स्त्रिया धर्म आणि काम यांच्याद्वारे धनाचा संचय करितात म्हणून त्यांच्या वाढलेल्या या हावरेपणाला धिक्कार असो. विंचवाचे विष मागे असते, सर्पाचे विष पुढे असते. पण ज्यांच्या इच्छामध्ये दुष्टता भरली आहे अशा स्त्रियांच्या सर्व शरीरात विष भरलेले असते ।। १०१-१०४ ॥
Jain Education International
वरून सत्य भासणान्या स्त्रियांच्या त्या नम्र वचनानी जे बुद्धिमान फसविले गेले नाहीत, ते त्यांच्यापासून मुक्त झालेले पुरुष मुक्तिलक्ष्मीचे प्रिय होतात ॥ १०५ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org