Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५१८)
महापुराण
(४३-७८
तस्य लक्ष्मीमनाक्षिप्य वक्षःस्थलनिवासिनी । लक्ष्मीरियं द्वितीयेति प्रेक्ष्या लक्ष्मीवती सती ॥ ७८ तयोर्जयोऽभवत्सूनः प्रज्ञाविक्रमयोरिव । तन्वन्नाजन्मतः कीति लक्ष्मीमिव गुणाजिताम् ॥ ७९ सुताश्चतुर्दर्शास्यान्ये जज्ञिरे विजयादयः । गुणैर्मनून्व्यतिक्रान्ताः सङख्यया सदृशोऽपि ते ॥ ८० प्रवद्धनिजतेजोभिस्तैः पञ्चदशभिर्भृशम् । कान्तः कलाविशेषैर्वा राजराजो रराज सः ॥ ८१ राजाराजप्रभो लक्ष्मीवती देवी प्रियानुजः । श्रेयान न्यायान् जयः पुत्रस्तद्राज्यं पूज्यते न कैः ।।८२ स पुत्रविटपाटोपः सोमकल्पाङध्रिपश्चिरम् । भोग्यः सम्भृतपुण्यानां स्वस्य चाभूत्तदभुतम् ॥ ८३ अथान्यदा जगत्कायभोगबन्धून्विधुप्रभः । अनित्याशुचिदुःखान्यान्मत्वा याथात्म्यवीक्षणः ॥ ८४ विरज्य राज्ये संयोज्य घुर्ये शौर्योजिते जये। अजादार्यवीर्यादिप्राज्यराज्यसमुत्सुकः ॥ ८५
___त्या राजाला लक्ष्मीचा तिरस्कार न करता त्या राजाच्या वक्षःस्थलावर-हृदयावर राहणारी व अतिशय प्रिय अशी जणु दुसरी लक्ष्मी आहे असे भासणारी प्रेक्ष्या-दर्शनीय-सुंदर अशी लक्ष्मीवती नांवाची राणी होती ।। ७८ ।।
बुद्धि व विक्रम-पराक्रम या दोघापासून जसा जय उत्पन्न होतो त्याप्रमाणे या दोघापासून सोमप्रभ राजा व लक्ष्मीवती राणीपासून जय नांवाचा मुलगा झाला. तो सद्गुणानी मिळविलेल्या लक्ष्मीप्रमाणे संपत्तीप्रमाणे जन्मापासूनच कीर्तीला वाढविणारा होता ॥ ७९ ॥
या सोमप्रभ राजाला विजय वगैरे नांवे ज्यांची आहेत असे जयकुमाराशिवाय आणखी चौदा पुत्र होते. हे सगळे संख्येने मनुसारखे असले तरीही त्यांनी आपल्या गुणांनी मनूना उल्लंघिले होते ॥ ८० ॥
___ अतिशय सुन्दर विशेषकलांनी जसा चन्द्र सुन्दर दिसतो तसा आपल्या तेजाला वाढविणारे अतिशय सुन्दर व विशेष कलांना धारण करणारे अशा पंधरा पुत्रानी तो राजाधिराज सोमप्रभ विशेष शोभत होता ॥ ८१ ।।
ज्या राज्याचा राजा सोमप्रभ होता व लक्ष्मीमती राणी होती व धाकटा भाऊ श्रेयान् हा ज्याला प्रिय होता व जयकुमार हा ज्याचा वडिल पुत्र होता असे त्या सोमप्रभ राजाचे राज्य कोणाकडून आदरणीय झाले नव्हते बरे ? ।। ८२ ॥
याप्रमाणे पुत्ररूपी शाखांचा विस्तार धारण करणारा हा सोमप्रभराजारूपी कल्पवृक्ष ज्यांनी पुण्यसंचय धारण केला आहे अशा अन्य पुरुषांना व स्वतः आपणासही भोग्य झाला होता हे आश्चर्य आहे. तात्पर्य- हा सोमप्रभ राजा पुत्रांनी सुखी झाला होता व अन्य सर्व लोक देखील या राजापासून सुखी झाले होते ।। ८३ ।।
यानंतर कोणे एकेवेळी पदार्थांचे यथार्थ स्वरूप जाणणारा हा सोमप्रभ राजा हे जग, शरीर, भोगाचे पदार्थ व आप्त नातलग हे सर्व अनित्य, अपवित्र आणि दुःखस्वरूप व आपणापासून भिन्न आहेत असे मानून विरक्त झाला व आपल्या राज्यावर शूर, धुरन्धर अशा जयकुमाराला त्याने बसविले व केव्हाही नाश न पावणारे, अनन्तसुख वीर्यादि गुणानी श्रेष्ठ अशा उत्तम मुक्ति राज्याविषयी तो उत्सुक झाला ।। ८४-८५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org