________________
४३-७७)
महापुराण
(५१७
यत्प्रष्टुमिष्टमस्माभिः पृष्टं शिष्टं त्वयैव तत्। चेती जिह्वा त्वमस्माकमित्यस्तावीत्सभा च तम् ॥७१ गणी तेनेति सम्पृष्टः प्रवृत्तस्तदनुग्रहे । नाथिनो विमुखान्सन्तः कुर्वते तद्धि तव्रतम् ॥ ७२ श्रुणु श्रेणिक सम्प्रश्नस्त्वयात्रावसरे कृतः । नाराधयन्ति कान्वा ते सन्तोऽवसरवेदिनः ॥ ७३ इह जम्बूमति द्वीपे दक्षिणे भरते महान् । वर्णाश्रमसमाकीर्णो देशोऽस्ति कुरुजाङ्गलः ॥७४ धर्मार्थकाममोक्षाणामेको लोकेऽयमाकरः । भाति स्वर्ग इव स्वर्गे विमानं वामरेशितुः ॥ ७५ हास्तिनाख्यं तत्र विचित्रं सर्वसम्पदा । सम्भवं मृषयद्वार्धी लक्षम्याः कुलगृहायितम् ॥ ७६ पतिःपतिर्वा ताराणामस्य सोमप्रभोऽभवत् । कुर्वन्कुवलयालादं सत्करैः स्वैर्बुधाश्रयः ॥७७
" हे शिष्टा, हे शहाण्या श्रेणिका, जे आम्ही विचारण्याला योग्य होते नेमके तेच तुझ्याकडून विचारले गेले आहे. त्यामुळे तूच आमचे मन व जिह्वा-जीभ झाला आहेस" अशी सभेने त्याची स्तुति केली ।। ७१ ।।
याप्रमाणे ज्याना प्रश्न विचारला अशा गौतमगणधरानी त्याच्यावर उपकार करण्याची प्रवृत्ति केली. बरोबरच आहे की सज्जन लोक गरजू लोकाना विमुख करीत नसतात. कारण गरजू लोकांना विमुख न करणे त्यांची इच्छा पूर्ण करणे हे त्यांचे-सज्जनांचे व्रतच असते ॥७२॥
हे श्रेणिकराजा ऐक. तू या योग्यवेळी हा चांगला प्रश्न आम्हाला विचारला आहेस. कारण योग्य वेळ - योग्य प्रसंग जाणणारे सज्जन कोणाला बरे प्रसन्न करीत नाहीत, वश करीत नाहीत बरे ? अर्थात् ते सर्वाना आनंदित करतात. मी तुझ्या या प्रश्नाने आनंदित होऊन तुला मी कुमाराची कथा सांगतो ती तू ऐक ।। ७३ ॥
या जंबूद्वीपात दक्षिणेकडच्या भरतक्षेत्रात क्षत्रियादि चार वर्ण व ब्रह्मचर्यादिक चार आश्रमाचे आचार पाळणारे लोक जेथे नांदत आहेत असा कुरुजाङ्गल नामक देश आहे ॥ ७४ ।।
या जंबूद्वीपात हा देश धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची जणु खाण असा आहे. त्यामुळे तो स्वर्गाप्रमाणे किंवा देवाचा स्वामी असलेल्या इन्द्राच्या विमानाप्रमाणे शोभत आहे ।। ७५ ॥
त्या कुरुजाङ्गल देशात. सर्व प्रकारच्या संपत्तीनी लोकांना आश्चर्यचकित करणारे व समुद्रामध्ये लक्ष्मीची उत्पत्ति झाली आहे अशी लोकसमज खोटी आहे असे जणु दाखविणारे व लक्ष्मीचे माहेर घर हेच नगर आहे असे व्यक्त करणारे हे हास्तिनपुर आहे ।। ७६ ॥
नक्षत्रांचा स्वामी असा चन्द्र आपल्या सत्करानी-चांगल्या किरणानी कुवलयांना रात्री विकसणाऱ्या कमलाना आनंद देणारा व बुधाश्रयः बुध नांवाच्या ग्रहाला आश्रय देणारा असतो. त्याप्रमाणे या कुरुजांगल देशाचा पति स्वामी सोमप्रभ नांवाचा राजा होता व तो आपल्या सत्करानी सर्व लोकाना सुख देणाऱ्या करानी सर्व पृथ्वीला आनंदित करीत होता व बुधाश्रय पंडित विद्वान् लोकांना आश्रय देत असे ॥ ७७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org