Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-५७)
महापुराण
(५१५
किल तस्मिन्जयो नाम तीर्थेऽभूत्पार्थिवाग्रणीः । यस्याद्यापि जितार्कस्य प्रतापः प्रथते क्षितौ ॥५० यस्य दिग्विजये मेघकुमारविजये स्वयम् । वीरपट्टे समुद्धृत्य बबन्ध भरतेश्वरः ॥५१ पुरुस्तीर्थकृतां पूर्वश्चक्रिणां भरतेश्वरः । दानतीर्थकृतां श्रेयान् किलासौ च स्वयंवरे ॥ ५२ अर्ककोतिः पुरोः पौत्रं सङ्गरे कृतसङ्गरः । जित्वा निगलयामास किलकाको स हेलया ॥ ५३ सेनान्तो वृषभः कुम्भो रथान्तो दृढसञ्जकः । धनुरन्तः शतो देवशर्मा भावान्तदेवभाक् ॥ ५४ नन्दनः सोमदत्ताह्वः सूरदत्तो गुणैर्गुरुः । वायुशर्मा यशोबाहुर्देवाग्निश्चाग्निदेववाक् ॥ ५५ अग्निगुप्तोऽथ मित्राग्निहलभृत्स महीधरः । महेन्द्रो वसुदेवश्च ततः पश्चाद्वसुन्धरः ॥ ५६ अचलो मेरुसज्ञश्च ततो मेरुधनाहयः । मेरुभतिर्यशो यज्ञप्रान्तसर्वाभिधानको ॥५७
त्या आदिभगवंताच्या तीर्थात सर्व राजांचा प्रमुख जय नावाचा राजा झाला. त्याने अर्ककीर्तीला ही जिंकले होते. या जयराजाचा पराक्रम आज देखिल या भूतलावर प्रसिद्ध झाला आहे ॥ ५० ॥
दिग्विजयाच्या वेळी जेव्हां जयकुमाराने मेघकुमारदेवाना जिंकले तेव्हां भरतेश्वरानेभरतचक्रीने स्वतः वीरपट्ट काढून या जयकुमाराच्या मस्तकावर बांधला. भगवान् पुरु-वृषभनाथ हे तीर्थंकरामध्ये पहिले, चक्रवर्तीमध्ये भरतराजा पहिला चक्रवर्ती, दानतीर्थकरात पहिला दानतीर्थंकर श्रेयान् राजा, तसा हा जयकुमार स्वयंवर करण्यामध्ये पहिला आहे ॥ ५१-५२ ॥
__ आदिभगवंताचा नातु जो अर्ककीर्ति त्याला जयकुमाराने याला मी युद्धामध्ये बांधीन अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे त्याने एकट्याने लीलेने जिंकून त्याला बांधले. हा जयकुमार आदिभगवंताचा ७१ वा गणधर झाला आहे. आदि भगवंताचे ८४ गणधर होते. त्यांची नावे याप्रमाणे- ।। ५३ ।।
१) सेनान्त वृषभ म्हणजे वृषभसेन, २) कुंभ, ३) रथान्तदृढ-दृढरथ, ४) धनुरन्तशतशतधनु, ५) देवशर्मा, ६) भावान्त देव म्हणजे देवभाव, ७) नन्दन, ८) सोमदत्त, ९) गुणानी मोठेपणाला पावलेला सूरदत्त, १०) वायुशर्मा, ११) यशोबाहु, १२) देवाग्नि, १३) अग्निदेव, १४) अग्निगुप्त, १५) मित्राग्नि, १६) हलभृत्, १७) महीधर, १८) महेन्द्र, १९) वसुदेव, २०) वसुन्धर, २१) अचल, २२) मेरु, २३) मेरुधन, २४) मेरुभूति यश आणि यज्ञ हे शब्द ज्याच्या शेवटी आहेत असा सर्व शब्द ज्यांचे नाव आहे असे दोघे म्हणजे २५) सर्वयश, २६) सर्वयज्ञ, २७) सर्वगुप्त, प्रिय शब्द ज्याच्या शेवटी आहे असा सर्व म्हणजे २८) सर्वप्रिय, देव शब्द ज्याच्या शेवटी आहे असा सर्व शब्द म्हणजे २९) सर्वदेव, ३०) सर्वविजय, नंतर विजय आदि असलेला गुप्त म्हणजे ३१) विजयगुप्त, ३२) विजयमित्र, ३३) विजयिल, ३४) अपराजित, ३५) वसुमित्र, ३६) विश्वसेन, सेन अन्ती असलेला साधु म्हणजे ३७) साधुषेण, देव अन्ती असलेला सत्य शब्द म्हणजे ३८) सत्यदेव, ३९) सत्य अन्ती असलेला देव म्हणजे देवसत्य, गुप्त शेवटी आहे असा सत्य शब्द, ४०) सत्यगुप्त, सज्जनात श्रेष्ठ असा ४१) सत्यमित्र, गुणांनी युक्त असा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org