Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५१४)
(४३-४३
विचित्र पदविन्यासा रसिका सर्वसुंदरी । कृतिः सालङ्कृतिर्न स्यात्कस्येयं कामसिद्धये ॥ ४३ सञ्चितस्यैनसो हन्त्री नियंत्री चागमिष्यतः । आमन्त्रिणी च पुण्यानां ध्यातव्येयं कृतिः शुभा ॥४४ संस्कृतानां हिते प्रीतिः प्राकृतानां प्रियं प्रियम् । एतद्धितं प्रियं चातः सर्वान्सन्तोषयत्यलम् ॥ ४५ इदं निष्पन्नमेवात्र स्थितमेवायुगान्तरम् । इत्याविर्भावितोत्साहः प्रस्तुते प्रस्तुतां कथाम् ॥ ४६ अथातः श्रेणिकः पीत्वा पुरोः सुचरितामृतम् । आसिस्वादयिषुः शेषं हस्तालग्नमिवोत्सुकः ॥ ४७ समुत्थाय सभामध्ये प्राञ्जलिः प्रणतो मनाक् । पुनविज्ञापयामास गौतमं गणनायकम् ॥ ४८ त्वत्प्रसादाच्छ्तं सम्यक् पुराणं परमं पुरोः । निवृत्तोऽसौ यथास्यान्ते तथाहं चातिनिर्वृतः ॥ ४९
महापुराण
विचित्र पदविन्यासा - जी गमतीने पावले टाकीत ठुमकत चालत आहे, जी रसिकशृंगारादिरसानी भरलेली आहे व सर्व अवयवांनी सुंदर आहे व अनेक अलंकारांनी भूषणांनी नटलेली आहे अशी स्त्री कोणा पुरुषाच्या इच्छेची सिद्धि-तृप्ति करीत नाही बरे ? अर्थात् अशी स्त्री जशी पुरुषाला सुखदायक होते तशी ही काव्यकृति देखिल विचित्र पदविन्यासाचमत्कार उत्पन्न करणाऱ्या शब्दाच्या रचनेने युक्त आहे, रसिका शृंगार, वीर, करुणा आदिक रसानी भरली आहे, मनोहर शब्दांच्या रचनेने सर्व सुंदरी आहे व अलंकारांनी भरलेली आहे, उपमादिक अलंकारांनी नटलेली आहे, म्हणून ही कवीची कृति कोणा विद्वानाच्या इच्छेची तृप्ति करणारी नाही बरे ? ॥ ४३ ॥
ही या कवीची शुभकृति संचित झालेल्या पातकांचा नाश करणारी आहे व पुढे उत्पन्न होणाऱ्या पापाला प्रतिबंध करणारी आहे व पुण्याला बोलावणारी आहे. अशा या कवीच्या कृतीचे नेहमी आत्महितेच्छु शहाण्या मनुष्यानी चिन्तन करावे ॥ ४४ ॥
जे विद्येने संस्कृत झाले आहेत अशा लोकांना परिणामी हितकारक अशी वस्तु प्रिय वाटते. जे प्राकृत अज्ञ आहेत त्यांना तत्काल संतोष देणारी वस्तु प्रिय वाटते. हे काव्य विद्वानाना हितकर व अज्ञजनाना प्रिय असे आहे. म्हणून हे काव्य सर्वांना अधिक सन्तुष्ट करणारे आहे ।। ४५ ।।
आता हे पुराण तयार झालेच व या जगात हे युगान्तापर्यंत स्थिर राहणारच आहे. याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी उत्साह प्रकट झाला आहे असा मी (भगवद्गुणभद्राचार्य) प्रस्तुत कथा सांगत आहे. ही पीठिका झाली ॥ ४६ ॥
यानंतर श्रेणिक राजा आदिभगवंताचे उत्तम चरित्ररूपी अमृत पिऊन जणु हाताला चिकटलेल्या अमृताप्रमाणे बाकी उरलेली कथा आस्वादण्याची उत्सुकता धारण करता झाला. नंतर तो सभेमध्ये उठून उभा राहिला. थोडे नम्र होऊन त्याने हात जोडले व गणांचा नायक अशा गौतम मुनीशाला त्याने पुनः विनंती केली ।। ४७-४८ ॥
हे महामुने, आपल्या प्रसादामुळे मी आदिभगवंताचे उत्तम पुराण चांगले ऐकले. हे भगवंता जसे, या पुराणाचे शेवटी श्री आदिभगवान् मुक्त होऊन सुखी झाले तसा मीही अत्यन्त सुखी झालो आहे ।। ४९.।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org