________________
४३-४२)
महापुराण
(५१३
नूनं पुण्यं पुराणाब्धेमध्यमध्यासितं मया। तत्सुभाषितरत्नानि सञ्चितानीति निश्चितिः ॥ ३७ सुदूरपारगम्भीरमिति नात्र भयं मम । पुरोगा गुरवः सन्ति प्रष्ठाः सर्वत्र दुर्लभाः ॥ ३८ पुराणस्यास्य संसिद्धिर्नाम्ना स्वेनैव सूचिता । निर्वक्ष्याम्यत्र नो वेति ततो नास्म्यहमाकुलः ॥३९ पुराणं मार्गमासाद्य जिनसेनानुगा ध्रुवम् । भवाब्धेः पारमिच्छन्ति पुराणस्य किमुच्यते ॥ ४० अर्थो मनसि जिह्वाने शब्दः सालकृतिस्तयोः । अतः पुराणसंसिद्धर्नास्ति कालविलम्बनम् ॥४१ आकरेष्विव रत्नानामूहानां नाशये क्षयः । विचित्रालङ्कृतेः कर्तुःर्गत्यं कि कवेः कृतेः ॥ ४२
........................................
__खरोखर मी या पुराणरूपी समुद्राचा पुण्यकारक असा मध्यभाग प्राप्त करून घेतला आहे म्हणून त्यातील सुभाषितरूपी रत्ने मी गोळा केली आहेत असा माझा निश्चय आहे ।।३७॥
या पुराणाचा किनारा फार दूर गम्भीर आहे तरी पण मला त्याचे भय मुळीच वाटत नाही. कारण पुढे माझे गुरु गेले आहेत व अशा श्रेष्ठ पुरुषाची प्राप्ति होणे सर्वत्र दुर्लभ आहे, गुरु या शास्त्राच्या-महापुराणाच्या परतीरास गेले आहेत तसा मीही जाईन व यात मला भय मुळीच वाटत नाही ।। ३८ ।।
या पुराणाची उत्तम अशी सिद्धि याच्या स्वतःच्या नांवानेच 'महापुराण' या नांवानेच सूचित झाली आहे. म्हणून मी याचे उत्तम विवेचन करू शकेन किंवा नाही याविषयी मला कांही आकुलता वाटत नाही ॥ ३९ ॥
भगवज्जिनसेनाचार्यांना अनुसरणारे त्यांचे शिष्य पुराणमार्गाचे-उत्कृष्ट आत्महिताच्या मार्गाचे अवलंबन करून संसारसमुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्याची इच्छा करतात मग या पुराणाच्या शेवटाला ते पोहोचण्याची इच्छा करतीलच याविषयी सांगण्याची काय आवश्यकता आहे ॥ ४० ॥
मनात अर्थ आहे अर्थात् या पुराणाचा सर्व विषय हृदयात आहे व जिभेच्या शेंड्यावर शब्द आहेत आणि अर्थ व शब्द यांचे अलंकार-उपमादिक अर्थालंकार आणि यमक अनुप्रासादिक शब्दालंकार हेही मनात आहेत मग या पुराणाची संसिद्धि होण्यास कालविलंब नाहीच अर्थात् या पुराणाची पूर्णसिद्धि निश्चयाने होईल ।। ४१ ॥
खाणीमध्ये जसे रत्नांचा क्षय असत नाही त्यांचा खूप साठा असतो तसा मनात काव्याच्या विचारांचा अक्षय साठा भरलेला आहे व नाना प्रकारच्या चमत्कारिक अलंकाराची रचना करणाऱ्या या कवीच्या या कृतीला दारिद्रय कोठून प्राप्त होणार आहे ? ।। ४२ ।। म. ६५
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org