Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-२८)
महापुराण
गुणिनां गुणमादाय गुणी भवतु सज्जनः । असद्दोषसमादानाद्दोषवान्दुर्जनोऽद्भुतम् ॥ २१ सज्जने दुर्जनः कोपं कामं कर्तृमिहार्हति । तद्वैरिणामनाथानां गुणानामाश्रयो यतः ॥ २२ यथा स्वानुगमर्हन्ति सदा स्तोतुं कवीश्वराः । तथा निन्दितुमस्वानुवृत्तं कुकवयोऽपि माम् ॥ २३ कविरेव कवेर्वेत्ति कामं काव्यपरिश्रमम् । वन्ध्या स्तनन्धयोत्पत्तिवेदनामिव नाकविः ॥ २४ गृहाणेहास्ति चेद्दोषं स्वं धनं न निषिध्यते । खलासि प्रार्थितो भूयस्त्वं गुणान्न समाग्रहीः ॥ २५ गुणागुणानभिज्ञेन कृता निन्दाथवा स्तुतिः । जात्यन्धस्येव धृष्टस्य रूपे हासाय केवलम् ॥ २६ । अथवा सोऽनभिज्ञोऽपि निन्दतु स्तोतु वा कृतिम् । विदग्धपरिहासानामन्यथा वास्तु विश्रमः ॥२७ गणयन्ति महान्तः किं क्षुद्रोपद्रवमल्पवत् । दाह्यं तृणाग्निना तूलं पत्युस्तापोऽपि नाम्भसाम् ॥ २८
गुणवान् मनुष्याचे गुण घेऊन मनुष्य गुणी होतो. परंतु नसलेल्या दोषांचे ग्रहण करून मनुष्य दुष्ट बनतो हे आश्चर्य आहे ॥ २१ ॥
___ या जगात सज्जनावर दुर्जन यथेच्छ कोप करण्यास योग्य आहे. कारण दुर्जनांचे जे वैरी आहेत अशा अनाथ गुणाना सज्जन आश्रय देतो तेव्हा तो सज्जन दुर्जनाच्या कोपाला का पात्र होणार नाही ? ।। २२ ।।
__ जसे कवीश्वर-महाकवि आपणास अनुसरणाऱ्याची नेहमी स्तुति करतात तसे आपल्या मागून हा येत नाही म्हणून दुर्जन कवि लोक माझी निंदा करण्यास नेहमी तयार असोत. तात्पर्यउत्तम कवींच्या मार्गावर चालत असल्यामुळे माझी उत्तम कवि जशी स्तुति करतात तसे कुकवींच्या मार्गाचे मी अनुसरण करीत नसल्यामुळे ते माझी निन्दा करतात. करोत बिचारे ॥२३॥
जो कवि आहे त्यालाच काव्य करताना काय परिश्रम होतात हे चांगले समजते पण अकवीला समजत नाही. जसे वांझ स्त्री पुत्र प्रसवण्याच्या वेळी होणान्या दुःखाला जाणत नसते तसे कवीचे श्रम अकवीला समजत नाहीत ।। २४ ।।
हे दुष्टा, या माझ्या काव्यकृतीत जर दोष असतील तर ते तुझेच धन आहे, ते घेण्यास मी तुला मनाई करणार नाही पण मी तुझी वारंवार प्रार्थना केली असताही माझ्या गुणाना घेत नाहीस ॥ २५ ॥
गुण व अगुण-दोष यांची ज्याला माहिती नाही त्याने केलेली निंदा किंवा स्तुति ही एखाद्या अविचारी आंधळ्याने रूपाचे वर्णन केल्याप्रमाणे हास्यास्पद होईल ॥ २६ ॥
____ अथवा तो अज्ञ मनुष्य माझ्या या काव्य कृतीची निन्दा करो अथवा स्तुति करो. जर त्याने असे केले नाही तर विद्वान लोकांना थट्टा करावयाला मग स्थान कोठे मिळेल सांगा बरे ? ॥ २७ ॥
जे मोठे पुरुष असतात ते क्षुद्रानी दिलेली पीडा तुच्छबुद्धीच्या लोकाप्रमाणे आपल्या मनात आणीत नसतात. कापूस हा गवताच्या अग्नीने जळेल पण पाण्याचा फार मोठा साठा असलेला समुद्र त्या अग्नीने तापणार देखील नाही ।। २८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org