________________
५१२)
काष्ठजोsपि दहत्यग्निः काष्ठं तं तु प्रवर्धयेत् । प्रदीपायितमेताभ्यां सदसद्भावभासने ॥ २९ स्तुतिनिन्द कृति श्रुत्वा करोतु गुणदोषयोः । ते तस्य कुरुतः कीर्तिमकर्तुरपि सत्कृतेः ॥ ३० सत्कवेरर्जुनस्येव शराः शब्दास्तु योजिताः । कर्ण दुस्संस्कृतं प्राप्य तुदन्ति हृदयं भृशम् ।। ३१ प्रवृत्तेयं कृतिः कृत्वा गुरून् पूर्व कवीश्वरान् भाविनोऽद्यतनाश्चास्या विदध्युः शुद्धयनुग्रहम् ॥ ३२ मतिर्मे केवलं सूते कृति राज्ञीव तत्सुताम् । धियस्तां वर्तयिष्यन्ति मा गृहीषुः पृथग्जनाः ॥ ३३ इदं बुधा ग्रहिष्यन्ति मा गृहीषुः पृथग्जनाः । किममौल्यानि रत्नानि क्रीणन्त्यकृतपुण्यकाः ॥ ३४ हृदि धर्ममहारत्नमागमाम्भोधिसम्भवम् । कौस्तुभादधिकं मत्वा दधातु पुरुषोत्तमः ॥ ३५ श्रोत्रपात्राञ्जल कृत्वा प्रीत्या धर्मरसायनम् । अजरामरतां प्राप्तुमुपयुङग्ध्वमिदं बुधाः ॥ ३६
महापुराण
लाकडापासून उत्पन्न झालेला अग्नि त्या लाकडाला जाळून टाकतो पण ते लाकूड त्या अग्निला वाढवीत असते. लाकूड व अग्नि या दोघानी सुबुद्धि व कुबुद्धि याचा खुलासा करण्यासाठी मोठ्या दिव्याचे काम केले आहे ।। २९ ।।
(४३-२९
माझ्या कृतीचे श्रवण करून नंतर तीत असलेल्या गुण व दोषांची स्तुति व निंदा तो दुर्जन खुशाल करो. त्याने केलेली स्तुति व निंदा चांगले कार्य न करणाऱ्या दुर्जनाची देखिल चोहोकडे कीर्ती पसरवितील ॥ ३० ॥
जसे अर्जुनाचे सोडलेले बाण ज्याच्यावर वाईट संस्कार झाले आहेत अशा कर्णाकडे येऊन त्याच्या मनाला फार त्रास देत होते. तसे उत्तम कवीने आपल्या काव्यात योजलेले शब्द दुष्ट लोकांच्या कानाजवळ येऊन त्यांच्या हृदयाला अतिशय पीडा देतात ॥ ३१ ॥
प्राचीन महाकवींना गुरुस्थानी मानून मी माझी काव्यकृति प्रारंभिली आहे. पुढे होणारे व आज विद्यमान असलेले कवि हिला शुद्ध करण्याचा अनुग्रह करतील अशी आशा आहे ||३२|| राणी जशी आपल्या कन्येला फक्त जन्म देते पण दाया त्या कन्येचे पालनपोषण करतात तसे माझ्या बुद्धीने या काव्यकृतीला जन्म दिला आहे व कवीश्वरांच्या बुद्धि दाईप्रमाणे आता तिचे योग्य रक्षण करतील ॥ ३३ ॥
या माझ्या काव्याला विद्वान घेतील व त्याचा आदर करतील. जे दुर्जन आहेत ते याचा स्वीकार करणार नाहीत. बरोबरच आहे की, ज्यानी पुण्य संपादन केले नाही असे लोक अमूल्य रत्ने कशी विकत घेऊ शकतील ॥ ३४ ॥
Jain Education International
जसे समुद्रापासून उत्पन्न झालेले कौस्तुभरत्न श्रीपुरुषोत्तम कृष्ण आपल्या हृदयावर धारण करतो तसे हे धर्मरूपी कौस्तुभरत्न आगम- जैनशास्त्ररूपी समुद्रापासून उत्पन्न झाले आहे. व याला श्रेष्ठ पुरुषाने कौस्तुभापेक्षा श्रेष्ठ मानून आपल्या हृदयावर धारण करावे ।। ३५ ।। अहो विद्वज्जनहो आपण कानरूपी पात्र ओंजळीप्रमाणे करा व मोठ्या प्रीतीने हे धर्म रसायन आपण भक्षण करा. हे धर्म रसायन तुम्हाला अजर व अमर करील ।। ३६ ।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org