Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५०६)
महापुराण
(४२-२०४
जैनीमिज्यां वितन्वनियतमनुदिनं प्रोणयन्नथिसार्थम् । शश्वद्विश्वम्भरेशरवनितलसन्मौलिभिः सेव्यमानाः ।
मां कृत्स्नामा पयोधेरपि च हिमवतः पालयनिःसपत्नाम् ।
रम्यः स्वेच्छाविनोदैनिरविशषिराड्भोगसारं दशाङ्गम् ॥ २०८ इत्यारे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहे भरतराजवर्णाश्रमस्थितिप्रतिपादनं नाम द्विचत्वारिंशत्तमं पर्व समाप्तम् ॥ ४२ ॥
हा भरतचक्रवर्ती नेहमी प्रतिदिवशी जिनेश्वराची पूजा करीत असे आणि याचकसमूहाला नेहमी दान देऊन सन्तुष्ट करीत असे. ज्यांनी भूतलावर आपले किरीट टेकविले आहेत असे राजे लोक या भरताची नेहमी सेवा करीत असत, हिमवान् पर्वतापासून लवण समुद्रापर्यंत निष्कण्टक अशा या पृथ्वीचे भरतेश्वराने नेहमी पालन केले व रम्य मनोहर अशा इच्छानुरूप नाना विनोदानी उत्कृष्ट साररूप अशा दशाङ्गभोगाचा याने दीर्घकाळपर्यन्त उपभोग घेतला ॥ २०८ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत आर्षत्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहामध्ये मराठी भाषेत भरतराजाने वर्णाश्रमधर्माच्या स्थितीचे प्रतिपादन करणारे
बेचाळीसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org