Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५०४)
महापुराण
(४२-१९९
राजा चित्तं समाधाय यत्कुर्यादुष्टनिग्रहम् । शिष्टानुपालनं चैव तत्सामञ्जस्यमुच्यते ॥ १९९ द्विषन्तमथवा पुत्रं निगृह्वन्निग्रहोचितम् । अपक्षपतितो दुष्टमिष्टं चेच्छन्ननागसम् ॥ २०० मध्यस्थवृत्तिरेवं यः समदर्शी समञ्जसः । समञ्जसत्वसद्भावः प्रजास्वविषमेक्षिता ॥ २०१ गुणेनतेन शिष्टानां पालनं न्यायजीविनाम् । दुष्टानां निग्रहं चैव नृपः कुर्यात्कृतागसाम् ॥ २०२ दुष्टा हिंसादिदोषेषु निरताः पापकारिणः । शिष्टास्तु शान्तिशौचादिगुणधर्मपरा नराः ॥ २०३
इत्थं मनुः सकलचक्रभृदादिराजस्तान्क्षत्रियान्नियमयन्पथि सुप्रणीते । उच्चावचैर्गुरुमतैरुचितैर्वचोभिः शास्ति स्म वृत्तमखिलं पृथिवीश्वराणाम् ॥ २०४
राजाने आपल्या मनाची एकाग्रता करून दुष्टाना शासन करणे व शिष्टांचे पालन करणे याला सामंजस्य म्हणतात ॥ १९९ ॥
जो राजा शासन करण्यास योग्य असा शत्रु अथवा पुत्र असो त्याच्याविषयी मनात पक्षपात न धरता तो अपराधरहित व्हावा अशी मनात इच्छा धरतो व त्याना शिक्षा करतो त्याच्या ठिकाणी समञ्जसत्व हा गुण आहे असे समजावे. शत्रुविषयी मनात निर्दयता धारण करणे व पुत्राविषयी प्रेम धारण करणे याला पक्षपात म्हणतात. असा पक्षपात मनात न ठेवता दोघेही निरपराधी व्हावेत म्हणून त्यांना शासन करतो तो राजा समञ्जस होय ॥ २०० ॥
जो राजा याप्रमाणे मध्यस्थवृत्ति असतो तो राजा समदर्शी किंवा समञ्जस होय. आपल्या प्रजेविषयी म्हणजे आपल्या पुत्र मित्रांना व आपल्या प्रजेला पक्षपात सोडून समानपणाने पाहतो त्याच्या ठिकाणी समंजसगुणाचा सद्भाव आहे असे समजावे. असा हा गुण राजामध्ये असेल तर न्यायाने वागणाऱ्या शिष्टांचे तो पालन करू शकतो व जे अपराधी आहेत अशा दुष्टांचा तो निग्रह करू शकेल ॥ २०१-२०२ ॥
जे दुष्ट लोक हिंसा, चोरी वगैरे दोषात तत्पर असतात व पाप करण्यात तत्पर राहतात, पण जे शिष्ट सज्जन लोक असतात ते क्षमा, निर्लोभपणा वगैरे गुणानी युक्त असतात व धर्मात तत्पर राहतात ।। २०३ ।।
याप्रमाणे तो भरतराजा सोळावा मनु होता आणि सकलचक्रवर्ती राजा होता. त्याने सर्व क्षत्रियांना जिनेश्वर वृषभाना मान्य असलेल्या उच्चनीच योग्य भाषणानी सुप्रसिद्ध अशा मार्गात स्थिर केले व सर्व राजांना सर्व सदाचारांचा उपदेश केला. अर्थात् क्षत्रियानी कसे वागावे याचे भरतेश्वराने फार उत्तम विवेचन केले ।। २०४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org