Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
त्रिचत्वारिंशत्तमं पर्व |
श्रियं तनोतु स श्रीमान्वृषभो वृषभध्वजः । यस्यैकस्य गतेर्मुक्तिमार्गश्चित्रं महानभूत् ॥ १ विक्रमं कर्मचक्रस्य यः शक्रायचितक्रमः । आक्रम्य धर्मचक्रेण चक्रे त्रैलोक्यचक्रिताम् ॥ २ योsस्मिश्चतुर्थकालावी दिनादौ वा दिवाकरः । जगदुद्द्द्योतयामास प्रोद्गच्छद्वाग्गभस्तिभिः ॥ ३ नष्टमष्टादशाम्भोधिकोटीकोटीषु कालयोः । निर्वाणमागं निर्दिश्य येन सिद्धाश्च वद्धिताः ॥ ४ तीर्थकृत्सु स्वतः प्राग्यो नामादानपराभवः । यमस्मिन्नास्पृशन्नासौ स्वसूनुमिव चत्रिषु ॥ ५ येन प्रकाशिते मुक्तेर्मार्गेऽस्मिन्नपरेषु तत् । प्रकाशितप्रकाशोक्तवैयथ्यं तीर्थकृत्स्वभूत् ॥ ६
ज्यांच्या ध्वजावर बैलाचे चिह्न आहे व ज्यांच्या एकट्याच्या जाण्याने मुक्तीचा मार्ग मोठा झाला असे आश्चर्य घडले ते श्रीमान्- अंतरंग लक्ष्मी केवलज्ञानादिक व बहिरंग लक्ष्मी अष्ट प्रातिहार्य, समवसरणादिक या दोन लक्ष्मींचे धारक असे श्रीवृषभ जिनेश्वर सर्वांच्या लक्ष्मीला वाढवोत ॥ १ ॥
ज्यांचे चरण इंद्रांच्याद्वारे पूजिले गेले आहेत व ज्यांनी आपल्या धर्मचक्राच्या द्वारे कर्मचक्राच्या पराक्रमावर आक्रमण केले व त्रैलोक्याच्या चक्रवर्तीपणाला प्राप्त करून घेतले ते आमच्या लक्ष्मीला वृद्धिंगत करोत ॥ २ ॥
जसे दिवसाच्या प्रारंभी सूर्य आपल्यापासून निघणाऱ्या किरणांनी जगाला प्रकाशित करतो तसे चतुर्थ काळाच्या प्रारंभी आपल्या दिव्यध्वनिरूप किरणानी जगाला आदिभगवंतानी प्रकाशमान् केले ॥ ३॥
या आदिभगवंतानी उत्सर्पिणी व अवसर्पिणीच्या आठरा कोटि सागर वर्षेपर्यंत जो मोक्षमार्ग नष्ट झाला होता त्या मोक्षमार्गाला आदिभगवंतांनी दाखविले व त्यानी सिद्धांना वाढविले ॥ ४ ॥
जसे आपला पुत्र भरत चक्रबर्तीमध्ये पहिलाच चक्रवर्ती असल्यामुळे त्याच्या पूर्वी अन्य चक्रवर्तीचे नाम घेतल्यामुळे होणारा जो पराभव त्याचा स्पर्श त्या भरताला झाला नाही कारण त्याच्या पूर्वी दुसरा कोणीही चक्रवर्ती झालेला नव्हता. म्हणून भरताचेच चक्रवर्ती म्हणून प्रथम नांव घेतले जाते तसे तीर्थकरामध्ये आदिभगवंताच्या पूर्वी अन्य कोणी तीर्थंकर न झाल्यामुळे अन्याचे नांव घेतल्यामुळे होणारा जो पराभव तो भगवंताचा कधीही झाला नाही. कारण भगवंत आदिप्रभूचेच प्रथम नाम घेतले जात होते ॥ ५ ॥
प्रभूंनी आदिभगवंतानी हा जो मुक्तीचा मार्ग प्रकाशित केला तो पूर्वी कोणीही प्रकाशित केला नव्हता पण प्रभूनी प्रकाशित केलेल्या मोक्षमार्गाला प्रकाशिताला पुनः प्रकाशित करण्याचे भय राहिले नाही. पण ते अन्य तीर्थकरांनी प्रकाशिताचे पुनः प्रकाशित करण्याचा दोष झाला. अर्थात् आदिभगवान् हेच प्रथमतः उपदेश करून मोक्षाला गेले ॥ ६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org