________________
४२-२०७)
महापुराण
(५०५
इत्युचैर्भरतेशिनानुकथितं सर्वोयमुझेश्वराः । क्षात्रं धर्ममनुप्रपद्य मुदिताः स्वां वृत्तिमन्वैयरुः । योगक्षेमपथेषु तेषु सहिताः सर्वे च वर्णाश्रमाः । स्वे स्वे वर्त्मनि सुस्थिताः धृतिमधुर्धर्मोत्सवैः प्रत्यहम् ॥ २०५ जातिक्षत्रियवृत्तमूजिततरं रत्नत्रयाविष्कृतम् । तीर्थक्षत्रियवृत्तमप्यनुजगौ यच्चक्रिणामग्रणीः । तत्सर्व मगधाधिपाय भगवान्वाचस्पतिौतमो । व्याचल्यावखिलार्थतत्त्वविषयां जैनी श्रुति ख्यापयन् ॥ २०६ वन्दारोभरताधिपस्य जगतां भर्तुः क्रमौ वेधसः । स्तस्यानुस्मरतो गुणान्प्रणमतस्तं देवमाद्यं जिनम् । तस्यैवापचितिं सुरासुरगुरोर्भक्त्या मुहुस्तन्वतः। कालोऽनल्पतरः सुखाद्वयतिगतो नित्योत्सवैः सम्भृतः ॥ २०७
याप्रमाणे भरतेश्वराने सर्वांचे हित करणारा क्षत्रियांचा धर्म उत्तम प्रकारे सांगितला व तो ऐकून सर्व राजे आनंदित झाले व आपले कर्तव्य कोणते आहे हे त्यांनी चांगले जाणून घेतले. त्याप्रमाणे ते वागू लागले. नवीन वस्तूची प्राप्ति तो योग व प्राप्त झालेल्या त्या वस्तूचे संरक्षण करणे हा क्षेम यामध्ये प्रवृत्ति करून आपले हित करणाऱ्या सर्व वर्णाच्या व आश्रमाच्या लोकानी आपआपल्या मार्गात तत्परता ठेवली व आपले हित करून घेतले. प्रत्येक दिवशी ते उत्साहाने धर्माचे आचरण करू लागले. त्यामुळे त्याना मोठा संतोष व हर्ष वाटला ॥ २०५ ॥
चक्रवर्तीमध्ये अग्रणी-मुख्य अर्थात् पहिला चक्रवर्ती श्रीभरतेश्वराने रत्नत्रयाचा आविष्कार ज्यापासून होतो अशा रीतीचे जातिक्षत्रिय व तीर्थक्षत्रिय कसे अतिशय ऊर्जित अवस्थेला पोहचतील त्याचे वर्णन केले अर्थात् जातिक्षत्रियांचा आचार व तीर्थक्षत्रियांचा आचार सगळा भरताने सर्व राजांना सांगितला होता. तो सर्व भगवान वाचस्पति गौतमगणधरांनी श्रेणिकराजाला सांगितला. अर्थात् संपूर्ण जीवादिक पदार्थांचे स्वरूप जिचा विषय आहे अशा द्वादशांगरूप जिनवाणीचे वर्णन करून जातिक्षत्रिय व तीर्थक्षत्रियाचे स्वरूप मगधदेशाच्या स्वामीला श्रेणिकाला प्रत्यक्ष जणु बृहस्पति अशा गौतमगणधरानी सांगितले ॥ २०६ ।।
जो त्रैलोक्याचा स्वामी आहे. अशा प्रजापति वृषभजिनेश्वराच्या चरणांना वंदन करणारा व त्या आदिप्रभूच्या गुणांचे स्मरण वारंवार करणारा व सुरासुरांचा स्वामी अशा त्या आदिभगवंताचे भक्तीने वारंवार पूजन करणारा अशा या भरतेश्वराचा फार मोठा काळ नित्योत्सवांनी भरलेला असा सुखानी व्यतीत झाला ॥ २०७॥
म. ६४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org