________________
४२-१९८)
महापुराण
(५०३
किमत्र बहुनीक्तेन जैनान्मुक्त्वा द्विजोत्तमान् । नान्ये मान्या नरेन्द्राणां प्रजासामान्यजीविकाः॥१९२ अन्यच्च गोधनं गोपो व्याघ्रचौराद्युपद्रवात् । यथा रक्षत्यतन्द्रालु पोप्येवं निजाः प्रजाः ॥ १९३ यथा च गोकुलं गोमत्यायाते सन्दिदृक्षया। सोपचारमुपेत्यैनं तोषयेद्धनसम्पदा ॥ १९४ भूपोऽप्येवं बली कश्चित्स्वराष्ट्र गद्यभिद्रवेत् । तदा वृद्धः समालोच्य सन्दध्यात्पणबन्धतः॥ १९५ जनक्षयाय सङग्रामो बह्वपायो दुरुत्तरः । तस्मादुपप्रदानाः संधेयोरिबलाधिकः ॥ १९६ इति गोपालदृष्टान्तमुरीकृत्य नरेश्वरः। प्रजानां पालने यत्नं विदध्वान्नयवर्त्मना ।। १९७ प्रजानुपालनं प्रोक्तं पार्थिवस्य जितात्मनः । समञ्जसत्वमधुना वक्ष्यामस्तद्गुणान्तरम् ॥ १९८
गुणानी देखिल विशिष्टपणा तुमच्यात नाही. कारण तुम्ही नामधारी ब्राह्मण आहात पण जे जैन ब्राह्मण आहेत ते व्रतधारक आहेत त्यामुळे तेच गुणधारक आहेत तुम्ही व्रतरहित आहात. म्हणून नमस्कार करण्यास पात्र नाहीत व पशुघाती असल्यामुळे तुम्ही दुष्ट दयारहित आहात. तुमच्या ठिकाणी म्लेच्छाचार आहे म्हणून तुम्ही चांगले धार्मिक ब्राह्मण नाहीत. म्हणून अनक्षर म्लेच्छाप्रमाणे राजा तुम्हाला अक्षरम्लेच्छ म्हणून मानीत आहेत म्हणून इतर प्रजेप्रमाणे तुम्ही धान्यांश देणे वगैरे गोष्टीनी समान आहात ।। १८७-१९१ ।।
आम्ही आता अधिक सांगत नाही. राजाना जैनब्राह्मण हेच श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून मान्य आहेत. दुसरे पशुघातकी ब्राह्मण राजाना मान्य नाहीत ते बाकीच्या प्रजेप्रमाणे पोसण्यास योग्य आहेत ।। १९२ ॥
दुसरे असे येथे सांगावयाचे की, आळसरहित गवळी आपल्या गोधनाचे वाघ, चोर आदिकाच्या उपद्रवापासून रक्षण करतो याप्रमाणे राजाने देखिल निरलस होऊन आपल्या प्रजेचे काळजीने रक्षण करावे ॥ १९३ ।।
जसे राजा गोकुळ पाहण्याच्या इच्छेने आला असता गवळी नजराणा वगैरे घेऊन राजाकडे येऊन त्याचे स्वागत करतो व त्याला धनसंपदेने आनंदित करतो ॥ १९४ ॥
तसेच राजा देखिल बलवान् दुसरा राजा आपल्या राष्ट्रावर येईल तर त्यावेळी आपल्या ज्ञानवृद्ध प्रधानादिकाशी विचार करून त्या राजाबरोबर त्याने संधि करावा ॥ १९५ ।।
कारण त्या बलवान् राजाबरोबर लढण्यापासून आपल्या लोकांचा नाश होईल व त्या लढाईपासून आपले फार नुकसान होईल व त्या नुकसानीची भरपाई होणार नाही. यास्तव त्या शत्रूला धन वगैरे देऊन संधि करावा ॥ १९६ ।।
याप्रमाणे गवळ्याच्या दृष्टान्ताचा स्वीकार करून राजाने नीतीच्या मार्गाने प्रजेचे रक्षण करण्यात नेहमी यत्न करावा ।। १९७ ।।
___ ज्याने आपली इन्द्रिये ताब्यात ठेवली आहेत अशा राजाचे प्रजारक्षणकर्तव्याचे हे वर्णन केले आहे. आता राजाचा समंजसत्व नांवाचा जो दुसरा गुण आहे त्याचे आम्ही वर्णन करतो ॥ १९८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org