Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२-१७९)
महापुराण
(५०१
क्रोणाति शकुनादीनामवधारणतत्परः । कुलपुत्रान्नृपोऽप्येवं क्रीणीयात्सुपरीक्षितान् ॥ १७१ क्रीतांश्च वृत्तिमूल्येन तान्यथावसरं प्रभुः । कृत्येष विनियुञ्जीत भृत्यः साध्यं फलं हि तत् ॥१७२ यथैव प्रतिभूः कश्चिद्गोक्रये प्रतिगृह्यते । बलवान्प्रतिभूस्तद्वद्ग्राह्यो भृत्योपसङग्रहे ॥ १७३ याममात्रावशिष्टायां रात्रावुत्थाय यत्नतः । चारयित्वोचिते देशे गाः प्रभूततृणोदके ॥ १७४ प्रातस्तरामथानीय वत्सपीतावशिष्टकम् । पयो दोग्धि यथा गोपो नवनीतादिलिप्सया ॥ १७५ तथा भूयोऽप्यतन्द्रालुभक्तग्रामेष कारयेत् । कृषि कर्मान्तिकर्बोजप्रदानाधरुपक्रमः ॥ १७६ देशेऽपि कारयेत्कृत्स्ने कृषि सम्यक् कृषीवलैः। धान्यानां संग्रहाथं च न्याय्यमंशं ततो हरेत् ॥१७७ सत्येवं पुष्टतन्त्रः स्याद्भाण्डागारादिसम्पदा । पुष्टो देशश्च तस्यैवं स्याद्धान्यराशितम्भवैः॥ १७८ स्वदेशेऽत्राक्षरम्लेच्छान्प्रजाबाधाविधायिनः । कुलशुद्धिप्रदानाद्यैः स्वसाकुर्यादुपक्रमैः ॥ १७९
जसे गवळी जेव्हा गायी विकत घेण्यास उद्युक्त होतो. तेव्हा त्यांचे दूध काढून पाहतो, त्यांची पुष्टि वगैरे पाहतो याप्रमाणे पाहून परीक्षा करून त्यांच्या गुणांची उत्कृष्टता वगैरे विचारात घेऊन व शकुन वगैरे पाहण्याविषयी तत्पर राहून त्या विकत घेतो. त्याप्रमाणे राजाने उच्चकुलीन मुलाना चांगल्या रीतीने परीक्षा करून विकत घ्यावे. वृत्तिरूपी किंमत देऊन म्हणजे पगार किंवा जमीन वगैरे देऊन विकत घेतलेल्या त्या कुमाराना योग्य समयी त्याना कार्यात योजावे. कारण ते कार्यरूपी फल राजाने सेवकाकडूनच साधावयाचे असते. जसे गायी विकत घेताना एखादा जामीन गवळी घेतो तसे नोकराना ठेवताना चांगला समर्थ जामीन राजाने घ्यावा ॥ १७०-१७३ ॥
___ एक प्रहररात्र जेव्हा उरलेली असते त्यावेळी गवळी उठून जेथे पुष्कळ पाणी व गवत आहे अशा ठिकाणी गायींना सावधगिरीने तो चारून आणतो व प्रातःकाली वासरू पिऊन राहिलेले दूध लोणी वगैरेच्या इच्छेने काढून घेतो ॥ १७४-१७५ ॥
याचप्रमाणे राजानेही आळस टाकावा व आपल्या ताब्यात घेतलेल्या गावात शेतकऱ्याना बी वगैरे देऊन त्यांच्याकडून शेतकी करवावी ।। १७६ ।।
याचप्रमाणे आपल्या सर्व देशात देखिल शेतक-याकडून चांगल्यारीतीने शेतकी करवावी. म्हणजे धान्याचा चांगला साठा होईल व त्यामुळे राजाने शेतकऱ्यापासून योग्य धान्याचा वाटा घ्यावा ॥ १७७ ॥
अशा पद्धतीने जो राजा वागेल त्याच्या भाण्डारादिकात विपुल संपत्ति होईल व त्याचे बल वाढेल. तृप्ति सुख देणाऱ्या त्या धान्यानी त्याचा देशही पुष्ट होईल ॥ १७८ ॥
____ आपल्या देशात जे कोणी अक्षरम्लेच्छ प्रजेला बाधा देणारे आहेत त्याना कुलशुद्धि देणे वगैरेनी आपल्यासारखे करावे ।। १७९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org