Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५००)
महापुराण
(४२-१६३
राज्यादिपरिवर्तेऽस्य जनोऽयं पोड्यतेऽन्यथा। चौरर्डमरकैरन्यैरपि प्रत्यन्तनायकः ॥ १६३ प्रसह्य च तथाभूतान्वृत्तिच्छेदेन योजयेत् । कण्टकोद्धरणेनैव प्रजानां क्षेमधारणम् ॥ १६४ यथैव गोपः सञ्जातं वत्सं मात्रा सहानुगम् । दिनमेकमवस्थाप्य ततोऽन्येधुर्दयावधीः ॥ १६५ विधाय चरणे तस्य शमैर्बन्धनसन्निधिम् । नाभिनालं पुनर्गर्भनालेनापास्य यत्नतः ॥ १६६ जन्तुसम्भवशङ्कायां प्रतीकारं विधाय च । क्षीरोपयोगदानाद्यैर्वर्द्धयेत्प्रतिवासरम् ॥ १६७ भूपोऽप्येवमुपासन्नं वृत्तये स्वमुपासितुम् । यथानुरूपं संमानः स्वीकुर्यादनुजीविनम् ॥ १६८ स्वीकृतस्य च तस्योद्घजीवनाविप्रचिन्तया । योगक्षेमं प्रयुञ्जीत कृतक्लेशस्य सादरम् ॥१६९ यथैव खलु गोपालः पशून्क्रेतुं समुद्यतः । क्षीरावलोकनायेस्तान्परीक्ष्य गुणवत्तमान् ॥ १७०
योग्य ठिकाणी जर आपल्या सैन्याला राजाने ठेवले नाही तर या राजाच्या राज्याचे परिवर्तन झाले तर आपल्या लोकाना पीडा होण्याचा संभव आहे अथवा चोर, दरोडा घालणारे लोक, म्लेच्छ राजे किंवा आपल्या राज्याच्या जवळ ज्यांचे राज्य आहे अशा राजाकडून पीडा होण्याचा संभव असतो ॥ १६३ ॥
चोर वगैरे लोकावर हल्ला करून त्यांच्या उपजीविकेचा नाश करावा. कारण असले काटे काढून टाकल्यानेच प्रजांचे रक्षण होते, प्रजेचे कल्याण होते ॥ १६४ ।।
जसे ज्याचे अन्तःकरण दयाळु आहे असा गवळी आपल्या मातेबरोबर हिंडणाऱ्या वासराला एक दिवस तसेच ठेवून दुसरे दिवशी त्याचा पाय हळूच बांधतो व त्याच्या नाळीबरोबर जी वार असते ती सावधगिरीने काढून टाकतो ।। १६५ ।।
त्यात कीड उत्पन्न होईल असे त्याला वाटले तर तो त्याच्यावर इलाज करून त्या वासराला दूध पाजणे व अन्य काही अन्न चारणे वगैरेनी त्याला तो प्रतिदिवशी वाढवितो ।। १६६-१६७ ।।
राजाने देखिल उपजीविकेच्या हेतूने आपल्याजवळ आपली सेवा करण्यासाठी आलेल्या नोकरांचा त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांचा संमान करून त्यांचा स्वीकार करावा ॥ १६८ ॥
ज्यांचा स्वीकार केला आहे व आपल्यासाठी जे कष्ट सहन करतात त्यांच्याकरिता उत्तम उपजीविकेचा राजाने विचार करावा व आदराने त्यांचा योगक्षेम चालवावा ॥ १६९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org