Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२-१६२)
महापुराण
यथा खल्वपि गोपालः कृमिदष्टे गवां गणे । तद्योग्यमौषधं दत्वा करोत्यस्य प्रतिक्रियाम् ॥ १५३ तथैव पृथिवीपालो दुविषं स्वानुजीविनम् । विमनस्क विदित्वैनं सौचित्ये संनियोजयेत् ॥ १५४ विरक्तोऽस्यानुजीवी स्यादलब्धोचितजीवनः । प्रभोविमाननाच्चैव तस्माननं विरूक्षयेत् ॥ १५५ तद्दौर्गत्यं व्रणस्थानकृमिसम्भवसन्निभम् । विदित्वा तत्प्रतीकारमाशु कुर्याद्विशांपतिः ॥ १५६ बहुनापि न दत्तेन सौचित्त्यमनजीविनाम् । उचितात्स्वामिसंमानात् यथैषां जायते धृतिः ॥ १५७ गोपालको यथा यूथे स्वे महोक्षं भरक्षमम् । ज्ञात्वास्य नस्यकर्मादि विदध्याद्गात्रपुष्टये ॥ १५८ तथा नृपोऽपि सैन्ये स्वे योद्धारं भटसत्तमम् । ज्ञात्वेनं जोवनं प्राज्यं दत्वा संमानयेत्कृती ॥ १५९ कृतापदानं तद्योग्यः सत्कारैः प्रीणयन्प्रभुः । न मुच्यतेऽनुरक्तैः स्वैरनुजीविभिरन्वहम् ॥ १६० यथा च गोपो गोयूथं कण्टकोपलवजिते । शीतातपादिबाधाभिरुज्झिते चारयन्वने ॥ १६१ पोषयत्यतियत्नेन तथाभूपोऽप्यविप्लवे । देशे स्वानुगतं लोकं स्थापयित्वाभिरक्षयेत् ॥ १६२
जसा तो गवळी गायीना एखादा किडा चावला असता त्या वेदना नाहीशा करण्यासाठी योग्य औषध देऊन वेदनांचा प्रतीकार करतो तसेच हा राजाही आपल्या नोकराची दरिद्रावस्था पाहून व त्याची खिन्नता जाणून त्याचे मन निष्काळजीचे होईल अशी योजना करतो. त्याला समाधानात ठेवतो ॥ १५३-१५४ ।।
ज्याला योग्य उपजीविका मिळाली नाही असा तो राजसेवक राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजाविषयी विरक्त होईल म्हणून राजाने त्याला प्रेमशून्य करू नये ॥ १५५॥
__ सेवकाचा दरिद्रीपणा हा जनावराच्या व्रणाच्या ठिकाणी कीड उत्पन्न झाल्याप्रमाणे आहे असे जाणून राजाने त्याच्या दरिद्रतेचा शीघ्न प्रतीकार करावा ॥ १५६ ॥
आपल्या प्रभूने नोकरांचा योग्य संमान केल्याने जसा त्याना संतोष वाटतो तसे त्याना पुष्कळ दिल्यानेही त्यांच्या मनाला सन्तोष वाटत नाही ॥ १५७ ॥
__ जसे गवळी आपल्या खिल्लारात ओझे वाहण्याला समर्थ असा मोठा बैल बघून तो शरीराने पुष्ट व्हावा म्हणून त्याच्या नाकात तेल घालणे आदिक कार्य तो करतो ॥ १५८ ॥
तसे राजाने देखिल आपल्या सैन्यात योद्धा असा उत्कृष्ट वीर जाणून त्याला भरपूर जीवनधन द्यावे व त्याचा सत्कार करावा ॥ १५९ ।।
ज्यानीं पराक्रम गाजविला आहे अशा नोकराना वीर पुरुषाना त्यांच्या योग्य सत्कारानी संतुष्ट करणारा राजा नेहमी नोकराकडून आदरिला जातो, नोकर त्याच्यावर नेहमी प्रेम करतात व ते त्याचा कधीही त्याग करीत नाहीत ।। १६० ।।
जसे गवळी आपल्या गायीबैलांच्या कळपाला ज्या ठिकाणी काटे व दगड यानी रहित व थंडी, ऊन वारा इत्यादिकानी बाधारहित अशा ठिकाणी वनात चारतो व त्यांचे प्रयत्नाने पोषण करतो. तसे राजानेही निरुपद्रवी अशा ठिकाणी आपणास अनुसरणाऱ्या लोकानानोकाराना ठेवून त्यांचे रक्षण करावे ॥ १६१-१६२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org