Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४२)
महापुराण
(३६-२०५
भरतविजयलक्ष्मीर्जाज्वलच्चक्रमा यमिनमभिसरन्ती क्षत्रियाणां समक्षम् ॥ चिरतरमवधूतापत्रपापात्रमासीदधिगतगुरुमार्गः सोऽवताहोर्बली वः ॥ २०५ स जयति जयलक्ष्मीसङ्गमाशामवन्ध्यां विदधदधिकधामा सन्निधौ पार्थिवानाम् ॥ सकलजगदगारव्याप्तकोतिस्तपस्यामभजत यशसे यः सूनुराधस्य धातुः ॥ २०६ जयति भुजबलीशो बाहुवीयं स यस्य । प्रथितमभवदग्रे क्षत्रियाणां नियुद्धे ॥ भरतनृपतिनामा यस्य नामाक्षराणि । स्मृतिपथमुपयान्ति प्राणिवृन्दं पुनन्ति ॥ २०७ जयति भुजगवक्त्रोद्वान्तनिर्यद्गराग्निः । प्रशममसकृदापत्प्राप्य पादौ यदीयौ ॥ सकलभुवनमान्यः खेचरस्त्रीकराग्रोद्ग्रथितविततवीरुद्वेष्टितो दोबलीशः ॥ २०८ जयति भरतराजप्रांशुमौल्यग्ररत्नो-पललुलितनखेन्दुः स्रष्टुराद्यस्य सुनुः ॥ भुजगकुलकलापैराकुलैनाकुलत्वं । धृतिबलकलितो यो योगभन्नैव भेजे ॥ २०९
षट्खण्ड भरतक्षेत्राची जयलक्ष्मी जी प्रज्वलितचक्राच्या स्वरूपाने सर्व क्षत्रियांच्या समक्ष प्रभु अशा बाहुबलीकडे येत असता तिचा प्रभु बाहुबलीने तिरस्कार केला त्यामुळे ती दीर्घकालावधि लज्जित झाली. अर्थात् चक्रवतिलक्ष्मीचा स्वीकार बाहुबली प्रभूने केला नाही व आपल्या पित्याचा मार्ग स्वीकारला अर्थात् जिनदीक्षा घेतली. ते बाहुबलि प्रभु तुमचे रक्षण करोत ।। २०५ ॥
सर्व राजांच्या समक्ष जयलक्ष्मीची संगमाची इच्छा ज्याने सफल केली, जो अधिक तेजस्वी आहे, ज्याची कीर्ति सर्वजगतरूपी घरात व्याप्त झाली आहे व ज्याने यशासाठी तपश्चरणाचा स्वीकार केला तो आदिब्रह्मापुत्र-श्रीवृषभ जिनेश्वरपुत्र बाहुबली नेहमी विजयी आहे ॥ २०६॥
सर्व क्षत्रियांच्यापुढे मल्लयुद्धात ज्याचे बाहूचे सामर्थ्य प्रसिद्ध झाले. भरतराजाबरोबर ज्याच्या नावाची अक्षरे लोकांच्या स्मरणपथात राहून ती प्राणिसमूहाना पवित्र करतात तो प्रभु बाहुबली नेहमी विजयी आहे ।। २०७॥
ज्याच्या पायाजवळ आल्यावर भुजंगाच्या मुखातून ओकल्यामुळे बाहेर पडणारा विषरूपी अग्नि वारंवार शांत झाला. जो सगळ्या जगाला मान्य झाला आहे व ज्याच्या सर्वांगावर वेढून पसरलेले वेलीचे वेष्टन विद्याधर स्त्रियांनी आपल्या हातानी काढले आहे. ते बाहुबली मुनिराज विजयी आहेत ॥ २०८ ॥
भरतराजाच्या उंच किरीटाच्या पुढील रत्नांनी ज्याच्या पायाचे नखचन्द्र चित्र विचित्र झाले आहेत, जो धैर्य आणि बलाने-शक्तीने सम्पन्न आहे. क्रोधयुक्त झालेल्या सर्पसमुदायानी जो व्याकुळ झाला नाही घाबरला नाही, योगी असा आदिसृष्टिकर्त्याचा पुत्र बाहुबली विजयी आहे ॥ २०९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org