Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६०)
महापुराण
(३७-१३४
धरारज्जुभिरानद्धा वागुरेव प्रसारिता । रोधाय पथिकणानां लुब्धकेनेव हृद्भुवा ॥ १३४ कृतावधिः प्रियोनागादगाच जलदागमः । इत्युदीक्ष्य घनान्काचिद्धृदि शून्याभवत्सती ॥ १३५ विभिन्दन्केतकीसूचीस्तन्पांसूनाकिरन्मरुत् । पान्थानां दृष्टिरोधाय धूलिक्षेपमिवाकरोत् ॥ १३६ इत्यभ्यर्णतमे तस्मिन्काले जलदमालिनि । सवासभवने रम्ये प्रियामरमयन्मुहुः ॥ १३७ आकृष्टनिचुलामोदं तद्वक्त्रामोदमाहरन् । तस्याःस्तनतटोत्सङ्गे सोऽनषीद्वार्षिकी निशाम् ॥ १३८ स रेमे शरदारम्भे विहरन्कान्तया समम् । वनेष्वभिनवोद्भिन्नसप्तच्छद सुगन्धिषु ॥ १३९ स कान्तां रमयामास हारज्योत्स्नाञ्चितस्तनीम् । शारदी निर्विशन् ज्योत्स्ना सौधोत्सङ्गेष हारिषु।। सोत्पलां कुब्जकदृब्धां मालां चूडान्तलम्बिनीम् । बालपत्युररस्यस्य स्थिता सजिघ्रति स्म सा॥
ज्या पावसाच्या धारा पडत होत्या त्या जणु प्रवासी रूपी हरिणाना पकडण्यासाठी मदनरूपी पारध्याने दोऱ्यानी पृथ्वीला बांधून तेथे जणु जाळे पसरले आहे असे वाटत होते ।। १३४ ।।
ज्याने आपल्या येण्याची दिनमर्यादा सांगितली होती असा आपला पति आला नाही आणि आता हा पावसाळा आला आहे अशा विचाराने मेघाना पाहून कोणी एक पतिव्रता स्त्री आपल्या मनात शून्य झाली. अर्थात् चिन्तेने तिची विचारशक्ति नष्ट झाली ॥१३५ ।।
केवड्याच्या कणसाना विस्कळित करून त्यातील परागाला-धुळीला इकडे तिकडे पसरणाऱ्या या वाऱ्याने प्रवासी जनांच्या डोळ्याना रोकण्यासाठी जणु धूळ उडविली आहे असे वाटत होते ॥ १३६ ॥
याप्रमाणे अगदी जवळ आलेल्या मेघपंक्तीनी युक्त अशा त्या पावसाळ्यात तो भरतराजा रम्य अशा महालात आपल्या प्रियेला वारंवार रमवित असे ॥ १३७ ।।
ज्याने पाण्यात उत्पन्न होणाऱ्या वेताचा वास ओढून आणिला आहे अशा त्या सुभद्रादेवीच्या मुखसुगंधाचे सेवन करणारा तो भरतचक्रवर्ती तिच्या स्तनतटाच्या जवळ वर्षाऋतूतील रात्र घालवीत असे ।। १३८ ॥
शरदऋतूला प्रारंभ झाला असता सात्विणी वृक्षाच्या फुलांचा सुगंध ज्यात पसरला आहे अशा वनात आपल्या सुभद्रादेवीसह विहार करीत तिच्याशी रममाण होत असे ।। १३९ ।।
मनाला हरण करणा-या प्रासादाच्या गच्चीवर शरत्कालाच्या चंद्रप्रकाशाचा अनुभव घेणारा तो चक्रवर्ती हाराच्या चांदण्याने जिचे स्तन.शोभत आहेत अशा मनोहर सुभद्रादेवीला रमवित असे ॥ १४०॥
__ जेव्हा ही सुभद्रादेवी आपल्या पतीच्या वक्षःस्थलावर निजत असे तेव्हा कंचुकींनी गुंफलेली व चक्रवर्तीच्या मस्तकापर्यन्त लांब असलेली जी कमलांची माला तिचा सुवास ती हुंगत असे ॥ १४१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org