Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८० )
ततोऽस्य हायने पूर्णे व्युष्टिर्नाम क्रिया मता । वर्षवर्धनपर्याय शब्दवाच्या यथाश्रुतम् ॥ ९६ अत्रापि पूर्ववद्दानं जंनी पूजा व पूर्ववत् । इष्टबन्धुसमाह्वानं समाशादिश्च लक्ष्यताम् ॥ ९७ इतिव्युष्टिः । ११
केशवास्तु केशानां शुभेऽह्नि व्यपरोपणम् । क्षौरेण कर्मणा देवगुरुपूजापुरःसरम् ॥ ९८ गन्धोदकाद्रितान्कृत्वा केशान्शेषाक्षतोचितान् । मौण्डयमस्य विधेयं स्यात्स्वचूलं स्वान्वयोचितम् ॥ स्वपनोद धौताङ्गमनुलिप्तं सभूषणम् । प्रणमय्य मुनीन्पश्चाद्योजयेद्द्बन्धुताशिषा ॥ १०० चौलाख्यया प्रतीतेयं कृतपुण्याहमङ्गला । क्रियास्यामादृतो लोको यतते परया मुदा ॥ १०१ इति केशवापः । १२ ततोऽस्य पञ्चमे वर्षे प्रथमाक्षरदर्शने । ज्ञेयः क्रियाविधिर्नाम्ना लिपिसङख्यानसङग्रहः ॥ १०२ यथाविभवमत्रापि ज्ञेयः पूजापरिच्छदः । उपाध्यायपदे चास्यमतोऽधीती गृहव्रती ॥ १०३ लिपि संख्यान सङग्रहः । १३
महापुराण
यानंतर जन्मून एक वर्ष पूर्ण झाले असता व्युष्टि नांवाची क्रिया जिला वर्षवर्धनवाढदिवस म्हणतात ती शास्त्राला अनुसरून करावी. या क्रियेतही पूर्वीप्रमाणे दान देणे व जिनपूजा करणे ही क्रिया करावी. या क्रियेच्या वेळी इष्ट बंधु मित्रादिकाना बोलवावे व त्यांच्याबरोबर जेवण करणे वगैरे कार्य करावे. ही अकरावी क्रिया होय ।। ९६-९७ ।।
(३८-९६
केशवाप क्रिया - जिला जावळ काढणे म्हणतात. ही क्रिया देवपूजा, गुरुपूजा पूर्वक करावी अर्थात् शुभ दिवशी क्षीरकर्माने वस्त्र्याने केश काढावेत. प्रथमतः केश गंद्योदकाने ओले करावेत व त्यावर पुष्पाक्षता क्षेपण करावे. अर्थात् जिनपूजा करून उरलेल्या अक्षता बालकाच्या केशावर टाकाव्यात व आपल्या वंशाला योग्य अशा रीतीने शेंडी ठेवून बालकाचे केशांचे मुण्डन करावे. यानंतर त्याचे अंग स्नान योग्य पाण्याने धुवावे स्नान घालावे व नन्तर त्याला वस्त्राभूषणानी सजवावे. मुनींच्या पाया पडवून त्याला बंधुवर्गाकडून आशीर्वाद दिला जावा. पुण्याह वाचनरूपी मंगल क्रिया ज्यात आहे अशा या संस्काराला चौल क्रिया म्हणतात. ही क्रिया करण्यास लोक आनंदाने प्रवृत्त होतात. अशी ही केशवाप क्रिया बारावी आहे ।। ९८ - १०१ ॥
Jain Education International
यानंतर पाचव्या वर्षी या बालकाला प्रथमतः अक्षराचे ज्ञान व संख्यांचे ज्ञान करून देण्याकरिता लिपिसंख्यान संग्रह हा विधि करावा. आपल्या वैभवाला अनुसरून जिनपूजा विधि करावा व या मुलाच्या गुरुस्थानी अध्ययन केलेला व्रती गृहस्थ असावा. ही लिपिसंख्यान नामक १३ वी क्रिया आहे ।। १०२ - १०३ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org